Tuesday 23 February 2016

घनगड आणि अंधारबन ट्रेक
घनगड उंची - २५०० फूट
चढाई श्रेणी - मध्यम
ठिकाण - ताम्हिणी घाट (पुणे)
दिनांक- १४ फेब्रुवारी २०१६


भौगोलिक संदर्भ :मुळशी परिसर हा पावसाळ्यात खरंच जन्नत असते. याच मुळशी मावळच्या पश्चिमेकडे पुण्यातून जवळपास ९० किमी अंतरावर घनगड आहे. लोणावळ्यापासून जवळपास ५० किमी असून येथून रस्ता बरा आहे. घनगडाच्याजवळच तैलबैला, कैलासगड (वद्रे), सुधागड, सरसगड, कोरीगड आहेत.
येण्याजाण्याच्या वाटाघनगडावर जाण्यासाठी 'एकोले' गावातूनच वाट आहे. हे एकदम छोटे असे गाव असून जवळपास १०० लोकांची वस्ती असावी. गावातून किल्ल्यावर जाण्यासाठी मातीचा रस्ता केलेला आहे.गावात गाडी पार्क करूनही किल्ल्यावर जाता येते.एकोलेगावात पोहोचण्यासाठी पुण्यातून ताम्हीणीमार्गे जाता येते. चांदणी चौकपौड>ताम्हिणी> वद्रे>निवे> आडगाव पाझरे>एकोले. पुणे पौड मार्गे गेले तर २ ते अडीच तास लागतात बिना ट्राफिक पुण्यापासून जवळपास ९० किलोमीटर अंतरावर घनगड किल्ला आहे.
गड-किल्ले चढाईची मज्जा काही वेगळीच. त्यात काही गड असे असतात ज्यांचा इतिहास जाणून घेतल्याशिवाय चढाईची मज्जाच येत नाही, तसाच एक गड म्हणजे घनगड’. रायगड जिल्हयातील लोणावळा डोंगर रांगेतला. अशा या ऐतिहासिक गडाबद्दल..
पुणे आणि रायगड जिल्हय़ांच्या सीमेवरून पसरत गेलेली सह्याद्रीची रांग ही पर्यटकांना नेहमीच आपलंसं करणारी. या रांगेदरम्यान असणा-या किल्ल्यांना अंगाखांद्यावर खेळवत असणारा सह्याद्री जेवढा अजस्त्र भासतो, तेवढा तो जवळून अनुभवासादेखील वाटत असतो, त्यामुळेच दर्दी भटक्यांची पावलं ही लोणावळा-खंडाळ्यापेक्षाही अशाच आडवाटांवर असणा-या किल्ल्यांवर जास्त रमतात. प्लस valley आणि संधन valley च्या वेळी ताम्हिणी घाटाची  आम्ही सफर केली होती.  ताम्हिणी घाट नेहमीच मला साद घालतो. जाईन पुन्हा पुन्हा मी.

घनगड ही असाच अनवट वाटेवर विसावलेला तुमची आमची वाट पाहत असलेला. पुण्याच्या पश्चिमेस असणा-या मुळशी तालुक्यातील  सह्याद्रीच्या कुशीतल्या आणि आजूबाजूच्या गावांना कोरबारसे मावळअसं पूर्वी संबोधलं जायचं. बारा मावळांपैकीच एक मावळ म्हणजेच कोरबारसे. मुळशीचा परीसरच मुळी पर्यटकांना संपूर्णपणे मोहिनी घालणारा. पावसाळ्यात तर हा संपूर्ण परीसरच हिरवा शालू नेसून आणखी बहारदार दिसतो. अशा मुळशीच्या पश्चिमेला सहयाद्रीच्या घाट माथ्यावर दिमाखात बसलेला छोटेखानी किल्ला म्हणजे घनगड.”

घनगडचा प्रवास निजामशाहीतून आदीलशाहीकडे आणि त्यानंतर शिवशाहीत झाल्याचा उल्लेख येतो. कोकणात उतरणा-या वाटांवर नजर ठेवण्यासाठी आणि कैद्यांसाठी तुरूंग म्हणून याचा उपयोग झाल्याचं सांगितलं जातं. एवढा इतिहास वाचावा अन् मगच येथे येण्याचा बेत आखावा.
सॉरी वाचक हो…  ब्लॉग जरा उशिरा लिहित आहे. ट्रेक हून आल्यावर माझ्या हाताला मोठ्ठा कीटक चावला होता, हाताला  इजा  झाल्याने मी  लगेचच ब्लॉग नाही लिहू शकले. 
आज एक आठवडा नंतर लिहावा असा विचार आला आहे पण लगेचच ब्लॉग लिहिण्यात जी मजा आणि उत्साह असतो तो आणावा लागेल आता मला तुमच्यासाठी.

१४ फेब्रुवारी म्हणजे आजच्या युगातला प्रेमदिवस साजरा करतो आपण. पण याच दिवशी ट्रेक असणे हा योगायोगच म्हणू आता आपण. यावेळीचा ट्रेक मी स्किप करणार होते परंतु माझा क्लासमेट प्रदीप आणि त्याचे कुटुंब येणार होते ट्रेक साठी  ते ही मुंबईहून त्यामुळे मी नाही ट्रेक ला तर ते तयार नव्हते. आणि नवीन ट्रेकर्स चा उत्साह कमी नव्हता करायचा मला सो मी हो म्हंटलं होतं  खरं. पण ट्रेक पूर्ण होवून जाइस तोवर काळजी होती. तरीही वेळेवर जर त्यांनी क्यान्सल केले तर मला चिडवणारी लोकं कमी का आहेत या जगात.
उगवला १४ फेब्रुवारी, आवरले आणि निघालो ताम्हिणी घाटाकडे. बसमध्ये बसलो, बरेचसे नवीन चेहरे होते तसेच जुने चेहरे ही होतेच. व्यालेनटाईन दिवसअसल्याने सगळ्या जोड्या जोड्या बसल्या होत्या जश्या काही. माझ्या गेस्ट ला देखील मी तसंच बसवलं आणि मी, रश्मी,छोटी केतकी  बसलो. बसल्या किरण टेकवडे  ला म्हंटलं ते कानाचे मशीन काढ (हेड फोन) आणि आम्हाला कविता ऐकव आठवत असतील तर. त्याला खरच आठवतात बाबा त्याच्या स्वतःच्या कविता. एक कविता ऐकवली खास 'प्रेमदिनाची’. वाह मग आमच्या फ़र्माइशि वाढत च गेल्या.  कविता वर कविता ऐकवून घेतल्या आम्ही. शुभांगी,रश्मी ला म्हंटल आपण मागे बसू. कारण त्या खूप दिवसांनी आल्या होत्या  ट्रेक ला आणि आम्हाला बरेच दिवस गाण्याची हौस साथीने नाही पुरी करता आली त्यामुळे आज चान्स होता. पण  घनगड ला पोहोचेस्तोवर किरणच्या कविता आणि सखूचं गाणंच पुरून उरलं. सकाळी ७ वाजता आम्ही पुणे हून निघालो व्हाया पिरंगुट ताम्हिणी घाट असे गेलो मधेच एका ठिकाणी सकाळच्या न्याहारीसाठी थांबलो. त्यामुळे आम्ही १०:३० पर्यंत पोहोचलो. नाहीतर बसने ट्राफिक नसेल तर जास्तीत जास्त २ ते सव्वादोन तास लागतात.
पोहोचलो घनगड च्या पायथ्याशी.नेहमी प्रमाणे ट्रेकर्स ना माहिती दिली आणि ट्रेक सुरु झाला. गडावर गेल्यावर फोटो काढत काढत च जात असतो एकमेकांचे,गडाचे  सह्याद्रीचे.  ११च्या दरम्यान चढाई सुरु केली यावेळी ऊन होतेच नेहमीप्रमाणे.परंतु यावेळी गड छोटा असल्याने आम्ही जेवणासाठी गडाच्या पायथ्याशीच येणार होतो आणि जेवणा नंतर अंधार बन पण आम्हाला करायचे होते.  त्यामुळे फक्त पाणी घेवूनच निघालो गडावर. आईबाबांना सोडून न राहणारी केतकी आज माझ्यासोबत होती. आणि पहिला ट्रेक असून छान चढत होती. तेव्हढीच बाबाशिवाय राहायची सवय झाली.

चढाईत सोप्या श्रेणीत मोडणारा आणि एका दिवसात पाहुन होणारा हा गड म्हणजे नवशिक्या ट्रेकर्ससाठी एक चांगली सुरुवात करून देणारा आहे. या गडापर्यंत पोहोचण्यासाठी दुर्गप्रेमींनी पुणे अथवा मुंबईहुन सर्वप्रथम लोणावळा गाठावं. तिथून घुसळखांबमार्गे शहापुर-भांबुर्डे असा प्रवास करून एकोले गावात यावं. या गावातूनच नजर टाकल्यास घनगड आपल्याला त्याच्या कुशीत घेण्यास उतावीळ असल्यासारखा वाटतो. एकोले गावातूनच एक मळलेली वाट आपल्याला गडाच्या पायथ्याशी असणा-या गारजाई देवीच्या मंदिरापाशी घेऊन जाते. या मंदिरासमोरील काही भग्न शिल्पं, दीपमाळ व भला मोठा तोफगोळा पाहून आपली नजर स्थिरावते ती मंदिराशी नातं सांगणा-या, कोरलेल्या शिलालेखावर. असे शिलालेख पाहाणंच दुर्मीळ.



मंदिराजवळ पहिली छोटी विश्रांती घेतली सरबत,पाणी पिवून लगेच वाट धरली गडाची. लवकरच गाद्वार पोहोचलो फोटोग्राफी केली. आणि लगेच निघालो अर्धातास थांबून कारण वर एकही झाड नव्हते. पुन्हा ती मोठ्ठी शिडी उतरताना रांग लावली. पुन्हा फोटो पुन्हा गडाच्या पायथ्याची वाट धरली. आलो  एकोले गावात तिथे विहिरीचे थंडगार पाणी प्यायलो आणि जरा विसावलो. तिथे एका घरात माहेरवाशीणीचे डोहाळे जेवण होते  आणि सगळा स्वयंपाक बाहेर च बनवणे चालू होते वांगे बटाटेची भाजी. काय सुगंध सुटला होता. आम्ही पण जेवण बनवायला हात भर लावला फोटो पुरता का होईना.
त्यांनतर तेथील एका आश्रमशाळेत आम्ही आमचे जेवणाचे डब्बे काढले आणि जेवून घेतले. कडाडून भूक लागली होती. जेवण झाले आणि लगेच ३-३० ला आमची वरात अंधारबन ला काढली रोहित आणि मनोज राणे यांनी कारण यावेळी मंदार सर नव्हते ना. अंधारबन चा अनुभव घ्यायचा होता. पुन्हा ४एक कि. मीबस गेल्यावर आम्ही बस एका ठिकाणी लावली आणि निघालो अंधारबन ला. लगेचच एक मोट्ठे तळे दिसले तिथेच बसू वाटत होते.
परंतु अंधार व्हायच्या आत आम्हाला अंधारबन पार करून यायचे होते. फोटोग्राफी करत निघालो. भिरा dam दिसत होता तिथून जाताना. अतिशय नयनरम्य दृश्य होते ते. अंधारबन च्या मध्यात थांबून जरा ओळखी करून घेतल्या आणि आदित्यने आणलेल्या काळ्या द्राक्ष्यांवर ताव मारला. बिच्चारा छोटा आदित्याला मिळाली की नाही कुणास ठावूक.


आणि  पुन्हा अंधारबन च्या वाटेला निघालो. घनदाट जंगल अतिशय सुंदर नजारा होता तो. मधून च सूर्याची किरणे येत होती. फोटोग्राफी साठी उत्तम लोकेशन होते तिथे. एक ते दीड तास चालून गेल्यावर आम्ही एका दरीत आमची पावले थांबवली आणि तिथेच थांबलो. आणि छोटे छोटे मनोरंजनाचे कार्यक्रम सदर केले.अंधार बन च्या वाटेवर प्रत्येकामधला कलाकार जागा झाला होता. डीजेवाले बाबू ला छोटे बच्चे कंपनी ने आणला होता गाण्यातून. जशी सभा भरली होती कलाकारांची.
कारण अंधार बन जर खूप पुढे गेलो असतो तर खूपच अंधार होणार होता. आणि आम्ही मेंबर जास्त होतो. त्यामुळे सुर्य मावळायच्या आत आम्ही ट्रेकर्स तिथून निघालो. आणि परतीची वाट धरली.
आलो पुन्हा त्या तळ्याजवळ आणि मग बसपाशी. मग बसमध्ये मात्र धमाल केली. शैलेश भिडे यांनी खूप छान छान गाण्यांना सुरुवात केली आम्ही आपले कोरस देत होतो पण कधीतरी ही गाणी ऐकली आणि म्हंटली होती मी ते आठवलं. मधेच दम शेराज खेळत होतो. मधेच गाणी. काय करावा नि काय नको सुचत नव्हते. बच्चे कंपनीने तर धमाल च केली . माझ्या सोबत आलेले गेस्ट प्रदीप प्राजक्ता आणि छोटी केतकी तिने सुद्धा मराठी गाणी खूप च छान म्हंटली. आवडल बाबा आपल्याला. नवे मेंबर असून  छान मिक्स झाले तिघे पण.शेवटी आपले फ्रेंड होते. हसून हसून पोट, गाल दुखत होते त्यादिवशी. मस्त गाजत वाजत आलो घरी. यावेळी रात्री १० च्या आतच घरी आलो आम्ही.  झाला  पूर्ण ट्रेक. ट्रेक कम पिकनिक च झाली अस वाटलं. कारण नेहमीच्या ट्रेक पेक्षा जर छोटा ट्रेक होता हा. परंतु त्याला अंधारबन ची जोड मिळाल्यामुळे मोठ्ठा ट्रेक झाला.