भैरवगड Shirpunje Ghanchakkar शिखर trek with Mountain edge adventure and waild trails pune. हे ठिकाण गिर्यारोहकांसाठी एक अतिशय प्रसिद्ध आणि साहसी trek ठिकाण आहे.
भिंगरी.
भिंगरी … भिंगरी ह्या माझ्या ब्लॉग मध्ये मी स्वतः ट्रेक दरम्यान केलेल्या सह्याद्री च्या भटकंती चे वर्णन असणार आहे. तसेच मी स्वतः केलेली फोटोग्राफी याचा आनंद घेता येईल. मी वाचलेल्या पुस्तकांचे परीक्षण असेल. कधी माझ्या मनाला पटणाऱ्या न पटणाऱ्या गोष्टींचा उल्लेख करावा वाटला तोही असेल. हसवणूक असेल. जसे जसे जे ओघाने लिहिता येईल ते ते लिहिले जाईल.…
Monday, 13 July 2026
भैरवगड शीरपुंजे आणि घनचक्कर शिखर
भैरवगड Shirpunje Ghanchakkar शिखर trek with Mountain edge adventure and waild trails pune. हे ठिकाण गिर्यारोहकांसाठी एक अतिशय प्रसिद्ध आणि साहसी trek ठिकाण आहे.
Monday, 15 December 2025
आजोबा पर्वत ट्रेक
आजोबा पर्वत ट्रेक
ठिकाण - ठाणे जिल्हा
चढाई- मध्यम श्रेणी
दिनांक- 13 डिसेंबर 2025
उंची- 4511 फुट
ट्रेक टीम- Mountain edge Trek group
शनिवारी रात्री दहाच्या सुमारास निघालेलो आम्ही पहाटे साडेपाचच्या सुमारास डेहेणे गावात पोहोचलो. त्याठिकाणी बाळकृष्ण दादा यांच्या घरी चहा नाश्ता आणि जेवणाची सोय होती. आम्ही गेल्या गेल्या त्यांच्या वठाणात म्हणजे घराच्या मधल्या दालनात आम्हाला सतरंज्या अंथरूण ठेवल्या होत्या. काही जणांनी वामकुक्षी घेतली. काही जणांनी तर वाघाची डरकाळी फोडली. 😂😂 आम्ही फक्त विस मिनिटे पाठ सरळ केली. ब्रश करून लगेच आवरून तयार झालो.चहा नास्ता तयार झाला. थोडं खाऊन लगेच बसमध्ये बसलो. कारण ट्रेकच्या सुरूवातीच्या जागेपर्यंत बस जाते.तिथून पुढे कच्चा रस्ता आहे.
या ठिकाणी एक ग्रुप फोटो घेवून ट्रेक सुरु झाला. कोवळ्या उन्हात शांततेत हसत हसत सगळे जण फोटो काढत काढत निघालो होतो.तीन किलो मीटरची पायपीट करून वाल्मिकी ऋषींच्या आश्रमाजवळ आम्ही पोहोचलो. जाताना सोबत उगवता सूर्य शांत, स्वच्छ, सुंदर वातावरण होते. आकाश निरभ्र असल्याने डावीकडे अलंग मदन आणि कुलंगची डोंगररांग तसेच रतनगड कळसूबाई रांग साद घालत होती. माझ्या ट्रेक न केलेल्या मैत्रीणी आणि मी पहिल्यांदाच सह्याद्रीत सोबत ट्रेक करीत होतो.
माझ्या मनात ट्रेक पूर्ण होईपर्यंत धाकधूक होती की यातल्या एकीने जरी ट्रेक पूर्ण नाही केला तर मला वाईट वाटेल. त्यामुळे मी मुद्दामच सुरूवातीच्या टप्प्यात कोणाच्याही सोबत राहिले नाही. जसा ज्याचा वेग तसं चालत राहिलो. अधेमधे सोबत होतोच.बरेचसे नविन ट्रेकर्स होते. माझ्या पायाची शिर जणू फाटली होती इतकी वेदना मला होत होती. माझ्या मनात एकच विचार होता नैसर्गिक रित्या त्या नसा ताणल्या गेल्या की वेदना वाढून दुखणं पुर्ण बरे होते.
ट्रेक सुरु केल्यावर साधारण दिड तासात वाल्मिकी ऋषींच्या आश्रमाजवळ पोहोचलो येथील वातावरण अतिशय शांत आणि मनाला समाधान देणारे होते. घनदाट जंगल आणि उंच उंच झाडे यामुळे आश्रमात सावली होती. सितामाई न्हाणीघराकडे लवकुश पाळण्याकडे असे सुचना फलक नजरेस पडले.
आजोबा पर्वत हे महाराष्ट्रातील माझ्या माहेरच्या ठाणे जिल्ह्यात, शहापूरजवळ बालाघाट रांगेत असलेले एक ऐतिहासिक आणि पौराणिक ठिकाण आहे, जे लव-कुशचे जन्मस्थान मानले जाते, याठिकाणी सीतेने वाल्मिकी ऋषींच्या आश्रमात आश्रय घेतला होता.लव-कुश वाल्मिकी ऋषींना आजोबा म्हणत असत. या ठिकाणी वाल्मिकी ऋषी यांचे वास्तव्य होते. येथे वाल्मिकी आश्रम देखील आहे.त्यामुळे या गडाला आजोबा पर्वत असे म्हणतात अशी आख्यायिका आहे. हा किल्ला ट्रेकिंगसाठी लोकप्रिय असून, याच्या ३००० फुटांच्या उंच भिंतीमुळे तो साहसी गिर्यारोहकांसाठी एक आव्हान आहे आणि येथे लव-कुशच्या पादुका असलेली गुहा व पाण्याचे टाके आहेत, ज्यामुळे याला धार्मिक महत्त्वही प्राप्त झाले आहे.
Wednesday, 28 August 2024
पेब किल्ला थरारक अनुभव
| कड्याच्या गणपतीकडे जाणारी वाट इथून जाते. |
Wednesday, 14 February 2024
अग्निकर्म आणि विध्दकर्म संशोधन केंद्र
Monday, 4 December 2023
हेअर कट
Tuesday, 28 November 2023
रवळ्या जवळ्या ट्रेक
जवळ्याच्या गडमाथ्यावर तुटलेल्या अवस्थेत पायऱ्यांची वाट खडतर होती परंतु डोंगरयात्रा ( Dongaryatra Adventure Club) चे ट्रेकलिडर आणि त्या दिवसाचे ट्रेकगाईड Doctor भोजराज गायकवाड यांच्या सहाय्याने आणि ट्रेकर्सच्या सहायाने आम्ही बिनादोरानेच सर केली आणि गडमाथ्यावर पोहोचलो.
गडावर जाऊन सोबत नेलेले जेवण थेपला चटणी खाऊन गडमाथ्यावर एक फेरी टाकली. गडमाथ्यावर चार मोठी पाण्याची टाकी आहेत त्यातले पाणी पिण्यासाठी योग्य आणि स्वच्छ दिसले.
अखंड पाषाणात कोरलेल्या पायऱ्यांचा तो सुंदर जिना चढताना उतरताना कोथळी गडाच्या पाषाणात कोरलेल्या जिन्याची आठवण येते.जिना चढताना उजव्या हाताला एक शिलालेख कोरलेला आहे.
अगदीच इथे मुक्काम करायचा असेल तर पठारावरील या तीन घरामध्ये तीन चार माणसांची रहाण्याची सोय होते किंवा आपण आपला तंबू नेऊन तिथे राहू शकतो.
रवळ्या गडावर जाताना देखील तेथे रोप लावावा लागतो. सह्याद्रीतील फार एक्स्पर्ट ट्रेकर्स बिनादोरानेच जाऊ शकतात.
रवळ्या गडावर जाताना एक छोटा चिमणी क्लाइंब patch आहे त्याठिकाणी सर्वजण रोप न लावताच चढून गेले.सर्वांचे कौतुक.धन्यवाद Team Dongaryatra / डोंगरयात्रा
Manoj Vitthal Bhaleghare
Ravindra Shrirang Shedge
Pune Mumbai Trekers...
@jayuuPatil
28-11-2023











