Wednesday 2 March 2022

आपुन रूकेगा नहीं और झुकेगा नहीं साला...


व. पु. काळे म्हणतात,"खूप शांत राहिले की ती शांतता बोलायला भाग पाडते."
आपलं कोण आहे? हे आपण आयुष्यात थोडंसं पुढे गेल्यावर समजतं😀 
अहो कसलं काय???आपण घंटा पुढे गेलोय😀😀तसं काही नाही.
एक वन डे ट्रेकग्रुप सोडून (तो ही ग्रुप सोडला नाही अजून अर्थात कोरोनामुळे दोन वर्षे ट्रेक बंद होते म्हणून दुसरा ग्रुप शोधला. तेही माणसं आम्ही जयु पाटीलला ओळखत नाही म्हणतात 😂😂कमाल आहे. तरी बी आपुन रूकेगा नहीं साला😂) वेगवेगळ्या ट्रेकग्रुप सोबत गेलो तर हजारो मित्रमंडळी बोलायची बंद झाली.हातामुळे फुडपोस्ट फुड लेख,food recipes videoनाही बनवू शकत तर लाईक कमेंट शेअर थांबलेच.वेळेअभावी सगळ्यांच्या पोस्ट वर मोठमोठ्या कमेंट करता येत नाही तर सगळंच बदललं. उलट लेख video editing,लेख, vlog सगळंच तर थांबलंय यापेक्षा किती अधोगती बघायची आहे कोणाला???😂 तरीही आपण आपलं कोणाच्याही सपोर्ट शिवाय सगळं सहज चालू ठेवलं की सगळं सोपं जातं. कोण मैत्रिण मित्र काही नको.दगडी ह्रदय झालं की कसलंच वाईट वाटत नाही.आपण माणूस आहोत  एका क्षणाला वाटतं आपण प्रेमाशिवाय जगू शकत नाही. पण आजच्या जगातलं प्रेम म्हणजे मी तुला काय देतो तू मला काय देतो.माझ्या पोस्टवर तू किती कमेंट लाईक करतो तरच मी तुझ्या पोस्ट वर कमेंट करणार. 😀😀😂हे फार क्षुल्लक आहे रे.यापलिकडे खूप जग आहे. एखादाच असतो जो या पलीकडे तुम्हाला सल्ला देतो, आपल्यातील चुका समजावून स्वतः साठी चांगले काय त्यांची अक्कल देतो.
आपण आपल्यासाठी किती सपोर्ट करतो ते जास्त महत्वाचं असतं.सगळं क्षणभंगुर आहे. कोरोनाकाळात टाईमपास म्हणून सुरू केलेले you tube channel चालू आहेत बंद नाही पडणार पण फार जोरदार चालणार पण नाही हे माहीत आहे तरी आपटुन पण आपुन रूकेगा नहीं साला😂😂 जेवण बनवणे आणि channel चालवणं माझी ती आवड कधीच नाहीये. हाताला चव आहे म्हणून सगळं जेवण, बनवलेले पदार्थ उत्तम होतात इतकंच. ❤️
आपली आवड ट्रेक, फोटोग्राफी,लेखन करणे, विनोदी टिचकी लेखन करणे(इतरांच्या भाषेत त्याला टोमणे म्हणतात 😂😂)हे आहे. ट्रेकींगमध्ये वेगळं काही करता येईल का?याकडे माझं लक्ष असतं.त्यासाठी बिघडलेली शारीरिक क्षमता विकसित करण्यासाठी प्रयत्न असतात.त्यावर लक्ष केंद्रित करून आयुष्याला फोडणी द्यायचं काम चालू आहे.या जन्मात काही चूक झाली असेल तर परमेश्वराने हाताचं दुखणं लावून माझी लेखणी बंद केलीये परंतु पखांतलं बळ आणि मनातलं बळ नाही तो हिरावून घेवू शकत.परमेश्वराने स्रुष्टी निर्माण केलीये तोच सगळा कर्ता करविता असतो. नाही तर त्या देवावरचा विश्वास उडत चाललाय. आपण फक्त कर्म आणि प्रयत्न करत रहायचं.
अगं जयु तुला घट्ट केस बांध तरच चांगले दिसेल...
अगं मोकळे केस सोड तरच चांगले दिसेल...
साडीतच छान दिसतेस तू.. 😀साडी घालणेच सोडून देते.. 😂
अगं ड्रेस असा का घातलास??? ड्रेस विकून टाकते.. 😂
Shirt pant चांगला नाही दिसत.आता अर्धी चड्डीच घालून बिचवर फिरते 😂😂😂
इतके फोटो काढून काय करता ओ जयु पाटील? तरी बरं त्यांचे सगळ्यात जास्त आणि चांगले फोटो माझ्याकडेच असतात. 😀
तुम्ही ब्लॉग नका लिहू विडीओ बनवा तोपण असाच बनवा तसाच बनवा. विडीओ एडींटींगच बंद करते.नाहीतरी स्वतः त्यात असल्याशिवाय कोणी लाईक कमेंट शेअर करतच नाही.. 😂
खूप बोलता ओ तुम्ही madam. 😀 का ??तुमची बोलती बंद होते म्हणून????😂
एकाच ग्रुप सोबत ट्रेकला जात जा,फेसबुक बंद कर.अरे कोण आहे मी ??? आणि तुम्ही कोण ???😂इन्स्टाग्रामवर जास्त असता ओ. जास्त नाही पडीक असते म्हणून तर तुमचे जास्त लाईक कमेंट व शेअर होते हे विसरू नका😀😀
घरात कुठं कमी नाही सगळी कामं आपणच करतो. चकाचक असतं माझं घर येवून बघा😀
तरी जेवण तिखट जास्त नको बनवूस गं.असं बनव तसं बनव. कोणाला शिकवताय तुम्ही??ज्याच्या वाट्याला आवडत नसताना व इच्छा नसताना फक्त जेवण बनवणं आलंय त्याला?? माझ्या हातचं कधीतरी जेवणारा बोटं चाटत रहातो आणि माझ्या हातचं फक्त एकदा जेवणारा शाबासकी देऊन जातो कौतुक करतो आणि उगाच शिकवणारे घरात काय शिकवता मला??? हे असं बनव न ते तसं बनव. 😭😭
अरे जनता काहीच चांगलं नाही का माझ्यात????
किती नावं ठेवता???
तुम्हाला जसं मी गप्प राहिले की hurt होतं तसं मला देखील Hurt होतं रे 😭😭😭
मी पण माणूसच आहे 😭😭😭
आपण आहोत तसे स्वीकारणारी जगात एकही व्यक्ती नसते का????
तरी आपुन रूकेगा नहीं साला.... 😂😂
इकडं लावला ट्रेक हा करायचा,जीव चालला तरी हा ट्रेक करायचा तो ट्रेक करायचा...❤️