Monday 18 February 2019

माहुलीगड ट्रेक.....माहेरघर 😍


माहुलीगड ट्रेक
ठिकाण - ठाणे जिल्हा
चढाई श्रेणी - मध्यम कठीण
उंची - २७८५ फूट
दिनांक - १७ फेब्रुवारी २०१९

माहुलीगड थोडक्यात माहिती- माहुलीगड हा आपल्या भारतातील, माझ्या महाराष्ट्रातील, माझ्या जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात सह्याद्रीडोंगररांगेत वसला आहे. चढाईश्रेणी मध्यम-कठीण असलेला हा गड गिरीदुर्ग प्रकारातील आहे. गडाची उंची समुद्रसपाटीपासून २७८५ फूटइतकी आहे. भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक १९ मार्च, .. १९१० रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे.आसनगाव या रेल्वेस्थानकापासून हा किल्ला कि.मी. अंतरावर आहे. या किल्ल्यावर शिवाजी महाराजांचे बराच काळ (जवळपास ६ वर्षे वास्तव्य होते) असे सांगितले जाते. किल्ल्याजवळून भारंगी नदी वाहते.ही नदी भातसई नदीची उपनदी आहे.माहुली-भंडारगड आणि पळसगड मिळून एक दुर्गत्रिकुट तयार झाले आहे. खास जाऊन पहावे असे हे ठिकाण कोणाही निसर्गप्रेमी ट्रेकर्सना आपल्या निसर्गसौंदर्याने वेड लावते. अनेक सुळके असलेला लांबलचक असा हा डोंगर माहुली नावाने ओळखला जातो. माहुलीचे दोन निसर्गतः तीन भाग पडले आहेत.  आसनगावच्या बाजूने गेले असता डावीकडे भंडारगड, मधला माहुलीगड, उजवीकडचा पळसगड आहे.

माऊंटन एज ऍडव्हेंचर अँड वाईल्ड ट्रेल्स पुणे यांचा ९३ वा माहुलीगड ट्रेक दिनांक १७फेब्रुवारी२०१९ या तारखेला आयोजित करण्यात आला होतापुण्यापासून सुमारे १८४ कि.मीअंतरावरअसून   थांबता बिनट्रॅफिक इथे पोहोचण्यास जवळपास साडेचार तास लागतात.दिनांक १६ फेब्रुवारीला रात्री ११ वाजता आमची २० ट्रेकर्सची बस नेहमीप्रमाणे शुभारंभाचा नारळ वाढवून निगडी-देहूरोडतळेगाव-लोणावळा-ठाणे -कल्याणफाटा आसनगावमार्गे माहुली गावात पहाटे साडेतीनच्या सुमारास पोहोचलीमाहुली गावातील मार्गदर्शक गुरु आगिवले याने पहिल्या फोनच्या रिंगला लगेच प्रतिसाद दिला  हे जास्त महत्वाचेआहेखूप सारे ट्रेकर्स पहाटे इथे पोहोचत असल्याने ट्रेकर्सना रस्ता दाखवण्यासाठी आणखी एक मुलगा बाईकवर जात होता आम्ही चुकू नये यासाठी त्याने गुरूच्या घराचा अचूक रस्ता दाखवला. तेवढ्या रात्री गुरु देखील घराबाहेर येऊन थांबला होताउतरल्या उतरल्या वेळ  घालवता आम्हाला त्याच्या घरात त्याने नुसते राहावयास  सांगितले नाही तर सतरंज्याअंथरून ठेवून पांघराण्यासाठी चादरी ठेवल्या होत्या. माणुसकीचा माणूस होता तो. दोन दिवस कमी झालेली थंडी त्या पहाटे अचानक वाढली होती.आम्ही  ते साडेपाच  पर्यंत  पांघरूण असून कुडकुडत थोडावेळ पाठ सरळ केली मला झोप काही लागली नाही.  हॉलमधले आमचे ट्रेकर्स मात्र बहुत घोर रहे थेट्रेकच्या आधी अशी थोड़ीतरी झोपलागली पाहिजेतरच ट्रेकचा  थकवा जाणवत नाहीआम्हाला कुडकुडताना  बघून पहाटे ५वाजता गुरूच्या बायकोने दोन मोठी ब्लॅंकेटे आमच्या चार जणींच्या अंगावर टाकली त्यावेळी मस्त झोपून राहावेसे वाटत होतेगावाकडची माणसे फारच प्रेमळ असतात.गुरुने आणि त्याच्या घरच्यांनी पहाटे ५लाउठून पोहे बनवून चहा तयार करून आम्हाला उठविलेगरमागरम पोहे आणि चहा पोटात गेल्यावर सकाळी  वाजतालगेच ट्रेकला सुरुवात झालीआमच्याबसचालकाने माहुली गावातून माहुलीच्या पायथ्याशी आम्हाला सोडले आणि तो आराम करण्यास गुरुच्या घरी गेला
तानसा अभयारण्यातील खर्डी वनपरिक्षेत्राचे पश्चिम सीमेवर शहापूर गावाचे उत्तरेस माहुली हे ठिकाण वसलेले आहेअभयारण्याचे क्षेत्रात माहुली हा प्रसिद्ध गड असूनगडाभोवती चांगल्या प्रतीचे राखीव वनक्षेत्र आहेभंडारगड,पळसगड अश्या दोन गडांसह हा माहुलीगड आजआपल्या गतवैभवाच्या तुरळक खुणा दाखवत उभा आहे.


ट्रेनने जाणाऱ्यांनी मुंबई-नाशिक लोहमार्गावरील आसनगाव गाठावे. इथून कि.मी. अंतरावरील गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या माहुली या गावी पायी अथवा रिक्षाने जाता येते. गडाच्या पायथ्याशी महादेवाचे सुंदर मंदिर आहे. रात्री तेथे राहण्याची सोय होते. इथून उजवीकडे एक ओढा पार करून पुढे ट्रेक सुरु करता येतो .आमचा ट्रेक उत्साहात सुरु झाला तो शुद्ध प्राणवायू, ती थंड हवा, तो हिरवागार निसर्ग मनाला मोहवीत होता. सकाळी गडाचा चढाव  असला तरी एकदा वॉर्म अप झाला की उत्साह आल्याने ट्रेकला आणि फोटोग्राफ़ीला रंग चढतो. जसेजसे आम्ही गड चढत होतो तसतस सूर्यदेव देखील आमच्यासोबत वर येताना दिसू लागला. ते क्षण फ्रेम करण्यासारखेच होते.
हळूहळू क्षमतेनुसार ट्रेकर्स थोडेफार मागेपुढे होत राहिले पण ट्रेक करत राहिलो. थोडा पठाराचा भाग आला की हायसे वाटायचे. उजेड आल्यांनतर माहुलीगड लखाकला गेला. त्यासोबाबत आमचे कॅमेरेदेखील फोटोसाठी सज्ज होऊन लखाकू लागले, नुसताच ढोरासारखा ट्रेक करायचा म्हणून करत राहणे माऊंटन एज ट्रेकर्सच्या स्वभावात नाही. कितीही मोठा ग्रुप असो. फोटोग्राफी आणि मजा करीतच ट्रेक केला की ट्रेकमध्ये चार चाँद लागतात. आम्ही मध्याहुन थोडे पुढे पोहोचलो त्यावेळी काही ट्रेकर्स माहुलीच्या माथ्यावर पोहोचले होते. आम्ही सगळेच ट्रेकर्स तीन तासात माहुली गडावर पोहोचलो. पोहोचताच भगव्यासोबत आणि बॅनर सोबत फोटो काढून माहुली गडावर असलेली ठिकाणे पहावयास  निघालो. गुरु गाईड सोबत असल्याने तो व्यवस्थित वाट दाखवून माहिती देत होता.

जातायेताना आम्ही साग, पळस, आंबा यासोबत खवले असलेले झाड क्रोकोडाईल ट्री,  रात्री अंधारात चमकणारे घोस्ट ट्री आम्ही पहिले. लहानपणी खाल्लेली आसानीच्या फळांची झाडे आढळली. मोहाची झाडे आणि अनेक औषधी झाडे पहावयास  मिळाली.मोहाच्या फळांपासून भाजी बनवतात तर मोहाच्या फुलांपासून दारू बनवतात हे दारू डोळ्यांच्या आरोग्यासाठी चांगली असते.असे ऐकले एकाच  झाडाचे एक ना अनेक उपयोग करणे हे येथील जंगलात रहाणाऱ्या लोकांनाच ठाऊक असतात. घनदाट कारवीचे जंगल आहेच शिवाय या जंगलात रानमेवा खूप आहे.उन्हाळ्यात जांभळे करवंदे भरपूर प्रमाणात असतात. तसेच पावसात येथील सौदर्य काही वेगळेच असते.  गडावर प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या आढळल्या. आमच्यातील ट्रेकर मंजुळ याने काही प्लास्टिक बाटल्या जमा करून खाली आणल्या. प्लास्टिकचे प्रमाण नष्टच व्हावे.

भगव्यासोबत ग्रुप फोटो घेऊन आजूबाजूच्या परिसराची माहिती घेऊन आम्ही गुरु मागे आम्ही जाऊ लागलो किल्ल्यावर आल्यावर समोरच एक पाण्याचे टाके आहे. हिरवी गर्द झाडी आहे वाटेमधले छोटे दगड चुन्याने सुशोभित केल्याने वाट स्पष्ट आणि छान दिसत होती. उजवीकडे गेल्यावर खाली पहारेकऱ्यांच्या देवड्या आहेत. समोरच ढासळलेल्या अवस्थेतला महादरवाजा आहे. इथून अलंग, मदन, कुलंग कळसूबाई पर्वतरांग दिसते. तर पूर्वेला हरिश्चंद्रगड, आजोबा, दक्षिणेपूर्वेला माथेरान रांग, दक्षिणपश्चिमेला आख्या मुंबई शहराला पाणीपुरवठा करणारा तानसा तलाव आणि तानसा खोरे, तुंगारेश्वर आणि माझा माहेरचा किल्ला गुमतारा आणि इतर मुलुख दिसतो.
मागील वर्षी "कुणबी प्रतिष्ठाण वासिंद" यांच्या तर्फे किल्ल्यावर शिवाजी महाराजांच्या मूर्तीची स्थापना केली..
माहुली किल्ल्याच्या मध्यभागात आले की उत्तरेकडे गडाचे महाद्वार आहे. मप्रतीमफ या एकाच शब्दात वर्णांन करावे असे हे महाद्वार शिरोभागी भग्न झालेले आहे. पूर्वेकडील त्याचा जुना मार्ग ब्रिटिशांनी तोफा लावून उद्वस्थ करून टाकलेला आहे. दरवाज्यातच एक कोरीव शिळा उभी असून तिच्यावर शर्माचे सुंदर शिल्प कोरलेले आहे. दरवाज्याच्या आत वाळवळणांचा मार्ग असून दोन्हीकडे सुंदर ओवऱ्यांची रचना केली आहे. उत्तरेकडील छोट्या ओढ्यात महादेवाची सुरेख कोरीव पिंड आहे. इथेही पूर्वी शिवमंदिर असावे. येथून पुढे बांबूच्या बनातून पळसगाडचा मार्ग जातो. रम्य वनश्रीतला अर्धा तासाचा मार्ग चालून गेल्यावर आपण उत्तर टोकावर येतो. इथेही मुख्य भूभागापासून तुटलेली गडाची तीन अरुंद पठारे आहेत . मुंबईला पाणीपुरवठा करणारा तानसा तलाव येथून छान दिसतो. या पळसगडाचा उपयोग पूर्वी टेहळणीसाठी केला जात असे. पुरंदरच्या तहात किल्ले माहुली मोघलांना दिल्यानंतर . . १६७० च्या फेब्रुवारी महिन्यात हा किल्ला पुन्हा जिंकण्यासाठी खुद्द शिवाजी राज्यांनी जोरदार धडक येथे मारली होती परंतु अपयश आले. त्यांनतर १६जून रोजी लगेचच मोरोपंत पिंगळ्यांनी इथे पुन्हा हल्ला केला हा गड स्वराज्यात आणला. पळसगडची ही माहिती माहुलीच्या पायथ्याशी असलेल्या माहिती फलकावर आढळते.
आम्ही पुढे गेल्यावर डावीकडे जंगलात एक वाट जाते. वाटेतच सतीशिळा पुण्यराजसदर आहे इथे जिजाउंचे बाळंतपण झाले असे म्हणतात. गडाच्या मध्यभागी आल्यावर भंडारगड पळसगड एकमेकांच्या विरुद्ध दिशेला तीनतीन कि.मी. लांबीच्या माच्या वर आहेत. या दोन्ही टोकांवर जाऊन यायला सुमारे अडीच तास सहज लागतात.  भंडारगडाकडे जाताना दाट झाडी ओलांडून उघड्यावर येताच स्वच्छ आकाशाखाली भग्न समाध्या वृंदावने दिसतात. पुढे गेल्यावर उध्वस्त झालेले जुन्या काळातील श्री माहुलेश्वर शंकराचे मंदिर दिसते .त्याच्या चौथऱ्याचे कोरीव दगड शिल्लक राहिलेल्या भिंतीतील कोनाडे, महिरपी, कोरीव पिंड, नक्षीकाम वेधक आहे. दगडात कोरलेला गणपती आणि शिवलिंग आहे.  शिवमंदिरासमोरच  पाण्याचा फार मोठा तलाव आहे. सध्या हे पाणी आटले आहे. 
पुढे गेल्यावर पडक्या  वाड्याचे अवशेष तसेच पडक्या धान्यकोठारामध्ये  फुटलेले रांजणाचे अवशेष आढळले.इथे जवळच सावलीत बसून आम्ही सोबत आणलेला एनर्जी खाऊ खाल्ला.  त्यात खाकरा, मोसंबी, केळी, पौष्टिक लाडू, खारे  शेंगदाणे, किवी कँडी,मसाला काजू, ड्रायफ्रूट्स, कॅनडाचे एनर्जीबार,खजूर, भाकरवडी, किवी सारखी सुकवलेली फळे, शेव चिवडा, बिस्कीट असा सगळा खाऊ   मिनिटांमध्ये फस्त केला. शिवाय राणे सरने घेतलेल्या नव्या कारचे पेढे आम्ही खाल्ले. आम्हा सर्वांकडून अभिनंदन राणे सर. (खास न आलेल्या ट्रेकर्ससाठी ही जळाऊ टीप आहे हाहाहा ) भूक लागल्यावर काहीही असले तरी गोडच  लागते.

गुरु अधून मधून त्याला माहित असलेली माहिती देत होता. पुढे गेल्यावर जांभळाचे रान लागते. ही वाट खिंडीत जाऊन पोहोचते. ही खिंड म्हणजे माहुली आणि भंडारगड दरम्यानची खिंड आहे. खिंडीच्या थोडे वर गेल्यावर उजव्या बाजूस ५०० ते ६०० फुट खाली उतरल्यावर कड्यालगतच कल्याण दरवाजा आहे. या दरवाज्यातून गडावर यायचे झाल्यास प्रस्तरारोहणाची गरज पडते.  वाटेने वर चढत गेल्यावर झाडीमध्ये बारमाही पाण्याचे भुयारी टाके आहे. येथून पुढे जाणारी वाट गडाच्या दक्षिण टोकापाशी म्हणजेच भंडारगडावर घेऊन जाते.
भंडारगडावर रहाण्याची कोणतीही सोय नाही. किल्ले माहुलीवर रहाण्यासाठी पहारेकऱ्यांच्या देवड्या आहेत, पण शक्यतो हा ट्रेक एक दिवसाचाच करावा. किल्ल्यावर जेवणाची सोय आपणच करावी लागते.किल्ले माहुलीवर पहारेकऱ्यांच्या देवड्यासमोर पाण्याचे टाके आहे. येथील पाणी पिण्यासाठी उपयुक्त आहे. भंडारगडावर पिण्याच्या पाण्याची सोय नाही. त्यामुळे तेथे असताना पाण्याचा साठा जवळ ठेवावा. किल्ल्यावर जाण्यासाठी आसनगाव मार्गे दोन तास तर कल्याण दरवाजामार्गे ते तास लागतात.
भंडारगडावरून समोरच उभे असणारे भटोबा, नवरा नवरीचे सुळके दिसतात. काहीजण या तीन सुळक्यांना नवरा नवरी आणि करवली असे म्हणतात. पळसगडावरील  सुळक्यांना माहुली गावातील मार्गदर्शक गुरु आगिवले याचे नाव दिले आहे. इथून उजवीकडे असणाऱ्या डोंगररांगेवर वजीरचा सुळका दिसतो. सभोवतालच्या परिसराचे दृश्य अतिशय रमणीय असते. काल  धूसर वातावरण असल्याने आजूबाजूचे सगळेच गड स्पष्ट दिसत नव्हते. परंतु त्या छोट्या टेकड्यावर धुक्याची वलये अप्रतिम भासत होती. प्रत्येक दृश्य अगदी फ्रेम करावे असे होते.

ट्रेकिंग करतो म्हणतो नेमके काय करतो त्याचे हे समर्पक उत्तर आहे. हा मानसिक आनंद ह्या सुंदर निसर्गाच्या आठवणी,गार वारा, त्या उंचावरून दिसणारे अभिमानाने उभे असलेले आजूबाजूचे सुळके, हिरवेगार, निळेशार डोंगर, त्या मनाचा थांग लागणाऱ्या खोल दर्या, उत्तम आरोग्यासाठी ताजा आणि शुद्ध, प्राणवायू, चांगले सवंगडी, ट्रेक लीडर्सचा कणखरपणा,संयम,नियोजन,खिलाडू वृत्त्ती तसेच एकदोन अवली ट्रेकर्सचा आगावूपणा, बसमधल्या गाण्यांच्या भेंड्या, दमशेराज  हे असं सगळं भारी घरी बसून आपण अनुभवू शकत नाही. आपली स्वतःची कुवत तपासण्यासाठी आणि वाढवण्यासाठीच तर ट्रेक करायचा असतो.
गडावर २तास फिरून माहिती घेऊन साडेअकराच्या सुमारास गड उतरण्यास सुरुवात केली. जाताना जसे दोन तीन ग्रुप मध्ये विभाजन होते तसेच क्षमतेनुसार उतराई करताना देखील दोन तीन ग्रुपने उतरले जाते. मला तर उतरतानाच जास्त पाय दुखत असतात आणि गुडघ्यावर ताण येतो. एकदा ट्रेक संपला की हळूहळू सगळं ठीक होत असत. दुपारी दीडच्या सुमारास आम्ही सात-आठ ट्रेकर्स माहुलीच्या पायथ्याशी उतरलो.बस पायथ्याशी येऊन थांबली होतीच.  बाकीचे ट्रेकर्स येईस्तोवर आम्ही एका टेम्पोमध्ये बसून गुरूच्या घरापर्यंत पोहोचलो.आमची टेम्पो सफारी झाली. मी खेड्यात वाढल्याने मला लहानपणी असे टेम्पोमध्ये कधीतरी बसल्याची आठवण झाली. गुरूच्या घरी पोचल्यावर तांदळाची उकडीची भाकरी दोन भाज्या वरणभात, लोणचे पापड अश्या स्वादिष्ट आणि  गरमागरम जेवणाचा आस्वाद घेतला आणि गुरूचा निरोप घेऊन आम्ही पुणेकडे निघालो.
ठाणे जिल्हा माझे माहेर असल्याने ठाणे जिल्ह्यातील गड किल्ल्यांची ठिकाणे म्हणजे माझे माहेरघरच आहे. शहापूरमध्ये रहात असलेले शाळेतले  आमचे दोन- तीन फ्रेंड भेटायला येणार होते.आम्हाला कमी वेळ असल्याने आमचा वर्गमित्र सुनील कोळी त्याच्या मिसेस सहित आम्हाला वेळात वेळ कडून भेटायला आला आणि सर्वांना उसाचा रस पाजून आम्हाला गार केले. थोड्या गप्पा करून आमची बस पुणेकडे रवाना झाली. दहावीनंतर इतक्या वर्षांनी शालेय दोस्त भेटलो की फारच भारी वाटते. लहापणी अक्कल नसते तेव्हा आपण फ्रेंडसोबत आणि सगळ्यांसोबत भांडत असतो आणि सगळे दूरवर  गेले की मग शोधत बसतो, रडत बसतो. आपण मानव प्राणी असेच आहोत.असो.  
 
माऊंटन एज ऍडव्हेंचर अँड वाईल्ड ट्रेल्सचा ९३ वा ९कि.मी चा  ट्रेक अप्रतिम,  अफलातून झाला. ट्रेकसाठी गुरू आगिवलेच फोन नंबर देणारा आमचा शालेय ट्रेक फ्रेंड बेस्ट ट्रेकर ब्लॉगर राकेश शिवदे, गुरूजवळ आनन्द शिंदे सरांचा निरोप द्यायला सांगणारा आमचा बेस्ट ट्रेकर् ब्लॉगर वर्गमित्र  तुषार कोठावदे आणि गुरु गाईड च्या घरी स्वतः जाऊन चौकशी करणारा आमचा पी.  एच.  डी. करणारा, वर्गमित्र ट्रेकर, शिक्षक सुनील कोळी यांचे खूप खूप आभार.(गुरु आगिवलेचा फोननंबर-९२६०५९८५३३.)   ट्रेकर्स हो तुमची मोलाची मदत खूप कामाला आली.माहेरच्या ट्रेकला गेल्यावर खरोखर माहेरची वागणूक मिळाली.  तुमच्यामुळे आमचा ट्रेक सुखरूप पार पडला. इतक्या दूर ट्रेक असून कोणतीही अडचण आम्हाला आली नाही. संध्याकाळी चहाच्या तलपेच्या वेळी आम्हा चारपाच जणांना मीनल कडून मिळालेला चहा जरा जास्तच गोड लागला मीनल थँक्स. 
आमचे ग्रेट लीडर्स मनोज राणे सर. रोहित सर, निकाळजे, आलेले मंदार थरवळ, अनिल जाधव लीडर्स हो, ट्रेकचे उत्तम नियोजन सर्वकाही वेळेवर आणि उत्तमरीत्या, शांततेत पार पाडण्यात तुम्हा लोकांचा मोलाचा वाटा आहे.  उत्तम सहकार्य आणि उत्तम फोटोग्राफी करणारे ट्रेकर्स रोहित,राणे सर, ट्रेक किमी.ची  अचूक मोजणी करणारा भूषण चौधरी, हुरहुन्नरी कलाकार, आमचे आघाडीचे गायक शेवाळकर सर,  दिनेश,कविता, देव दीक्षित, मंजुळ, रजत,हर्षद ,रणजीत, आणि मीनल माधुरी सहित इतर नवे जुने नावे माहिती नसलेले सर्व ट्रेकर्सहो सर्वांचे खूप कौतुक आणि अभिनंदन. आते रहो ट्रेक करते रहो. माऊंटन एज ऍडव्हेंचर अँड वाईल्ड ट्रेल्स रॉक्स