Wednesday 24 October 2018

हटके ट्रेक ग्रुप,हटके ट्रेक...


हटकेश्वर ट्रेक
ठिकाण - पुणे जिल्हा
चढाई श्रेणी मध्यम-कठीण
उंची४२०० फूट
दिनांक २१ ऑक्टोबर २०१८
माऊंटन एज एडवेंचर अँड वाईल्ड ट्रेल्सचे संस्थापक श्री. मंदार थरवळश्री. मनोज राणे, श्री. रोहित नागलगाव, अनिल जाधव,  सर्पमित्र श्री. निकाळजे हे ट्रेकच्या माध्यमातून लोकांमध्ये निसर्गाची आवड निर्माण करून आरोग्यसंपन्न जीवन जगण्याचे तसेच निसर्गसंवर्धनाचे धडे अनेक वर्षे ह्या संस्थेतून तरुण तरुणींना देत आहेत..माऊंटन एज एडवेंचर अँड वाईल्ड ट्रेल्स हा आमचा ट्रेक ग्रुप सध्या अनेक वेगवेगळ्या ठिकाणच्या उत्तमोत्तम सहली करण्यात खूप मग्न आहे तरीही आमच्यासाठी महिन्याचा एक ट्रेक हा फार महत्वाचा आहे असे समजून किमान एक ट्रेक तरी आयोजित करीत असतो आणि त्यालाट्रेकर्सचा प्रतिसाद देखील उत्तम असतो आणि आहे. 
सप्टेंबर महिन्यातील ताम्हिणी घाटामधील देवकुंडट्रेकनंतर ऑक्टोबरचा हटकेश्वरट्रेकचा दिवस उजाडलादिनांक २१ ऑक्टोबर २०१८ या दिवशी माऊंटन एज एडवेंचर अँड वाईल्ड ट्रेल्स या  ग्रुपचा ९०वा ट्रेक हटकेश्वर हा आयोजित केला गेला असून तो पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात गोद्रे गावाच्या हद्दीतआहे.हटकेश्वर हे  शिखर समुद्रसपाटीपासून सुमारे ४२०० फूट उंचीवर आहे. हटकेश्वर निगडीपासून साधारण १०८ कि.मी. असून इथे पोहोचावयास अडीच ते तीन  तास लागतात. .आमच्या १५ ते ५५ वयोगटातील ६४ ट्रेकर्सच्या दोन बस आयोजित केल्या असून सकाळी  वाजता एक बस निगडीहूनव तळेगाव चाकण मार्गे निघून राजगुरूनगरला पोहोचली आणि एक बस सकाळी साडेसहाच्या सुमारास निगडी-चिंचवड-नाशिकफाटा-चाकण-राजगुरूनगरला पोहोचल्यावर एकत्र नास्ता चहा करून नवीन ट्रेकर मीनल रानडे यांच्या हस्ते नारळ फोडून,  शाहिरी करणारे प्रदीप अडागळे याने शिवगर्जना करून आमच्या बस पुन्हा पुढे नारायणगांव -अळेफाटाओतूर-डिंगोरे-बनकर फाटा-कोळेवाडीगणेश खिंड गोद्रे गाव येथे  ११च्या सुमारास पोहोचल्या.  नव्या-जुन्या ट्रेकर्सच्या धमाल अन्ताक्षरीच्या तालावर  तासाचा प्रवास केव्हा संपला ते कोणालाही समजले नाही. 
हटकेश्वर हे ठिकाण अजून फारसे प्रचलित नाहीइथे ट्रेकर्सचा अजून तरी फारसा वावर नाहीये.इथे फक्त २०० ट्रेकर्सने भेट दिली आहे त्या दोनशे ट्रेकर्समध्ये आम्ही ६० ट्रेकर्स असल्याने आम्हाला 
त्याचा खूप अभिमान आहे. आपण मराठी मातीत आणि सह्याद्रीच्या कुशीत राहतो हे आपले अहोभाग्य आहे. त्यात जुन्नर तालुका निसर्गसौंदर्याने सजलेलानटलेला आहे. .
हटकेश्वर या ४२०० फूट उंच शिखरावर स्वयंभूदुर्मिळ आणि थोडेसे दुर्लक्षित महादेवाचे मंदिर आहे यावरूनच या शिखराला हटकेश्वर हे नाव पडले आहे. लेण्याद्रीजवळ सह्याद्रीच्या पश्चिमघाट डोंगररांगेतूननिघून पूर्वेकडे प्रशस्त पसरलेल्या  वऱ्हाडया  डोंगररांगेत ४२०० फुटावर निसर्गाचा अद्भुत नैसर्गिक चमत्कार म्हणजे येथील हटकेश्वर नैसर्गिक पूल एक भौगोलिक आश्चर्य आहे. हजारो वर्षांपूर्वी वाऱ्यापावसामुळे निसर्गतः दगड मातीची झीज होऊन तयार झालेला हा पिन होल गॅप म्हणजे सह्याद्रीचे माणिकरत्नच जणू. आपण त्याला साध्या भाषेत नैसर्गिक पूल म्हणू. निलेशकुमकर वगळता आम्हीसगळे आणि लीडर्स हटकेश्वरच्या भेटीस पहिल्यांदाच जाणार असल्याने उत्सुकतेपोटी त्या नैसर्गिकपुलाचे सौंदर्य पाहण्यासाठी आमचे हुशार ट्रेक लीडर्स राणे सरमंदार सररोहित सरनिकाळजे यांनी खासदूरचा बस मार्ग अवलंबला त्यामुळे आम्हाला या अद्भुत पुलाचे सौंदर्य प्रत्यक्ष पाहता आले. .
आमचे आजचे तेथील स्थानिक मार्गदर्शक  निलेशकुमकर या अगोदर जेव्हा काही सहकारी घेऊन हटकेश्वरट्रेकला गेले तेव्हा त्यांनी ड्रोन कॅमेऱ्याने काढलेला या पुलावरील अप्रतिम फोटो इथे आपण पाहू शकतो. 
केव्हा केव्हा या अंताक्षरी आणि दमशेराजखेळासाठी सगळ्यांनाच दूरचा प्रवास हवाहवासा वाटतो परंतु एकदिवसीय ट्रेकमध्ये उन्हामुळे मात्र सकाळी जितक्या लवकर पोहोचू तितके सर्वांच्या हिताचे ठरते.कोळेवाडी सोडल्यानंतर जाताना उजवीकडे पिंपळगावजोगा धरणाचा प्रशस्त जलाशय तिरक्या नजरेने खुणावत होताजणू,"पाहुण्यांनो दुरूनच चाललात का?जावा जावा कुठेही जावा इथून तिथून मीच विस्तारलॊ आहे,माझ्याकडे पहात पाहातच जावे लागणार आहे तुम्हाला.आणि माझ्याच गारव्याने सुखावणार आहात"
गोद्रे गावात पोहोचल्यावर लीडर्सने ट्रेकविषयी सूचना दिल्या आणि  निलेशकुमकर याने हटकेश्वरविषयी थोडक्यात माहिती दिली आणि ट्रेकला सुरुवात झाली. ऑक्टोबर महिना म्हणजे उन्हाचा तडाखा किती वाढतो हे ट्रेकर्सना सांगायला नकोप्रत्येकजण हातपाय झाकलेला फुल ड्रेस,टोपीसफेद रुमालतोंडाला गुंडाळून,गरजेपुरते पाणीसरबतइलेक्ट्रॉल पावडरफळेथोडाफार सुकामेवा ट्रेक सॅक मध्ये टाकून ट्रेकच्या पूर्ण तयारीत निघाला तरीदेखील  वरची वर्हाड्या डोंगररांग पाहून हबकलाच.कारणइथे झाडे फार क्वचित दिसत होतीत्यामुळे इतक्या उन्हात झाड नसेल काय काय हाल होऊ शकतात याचा अंदाज येऊ लागला होता. एक कि. मी.चा सरळ मातीच्या रस्त्यावर चालून वॉर्म अप झाला आणि आमची खरी कसोटी दिसून तिथेच आमचा धूर निघायला सुरुवात झाली. १०ते१२ घरांचे छोटे कुडाच्या, मातीच्या  भिंती असलेले गोद्रे गाव क्षणात पार केले.
१२ते १५ बकऱ्या घेऊन जाणाऱ्या  लहान मुली आमच्यासोबत चालत होत्या पायात साधी चप्पल आणिडोक्यावर काहीही नाही. त्या मुलीचे मला फार कौतुक वाटले.  . खरंतर आपण आपल्या शरीरालाफारच लाडावून ठेवतोआपले शरीर  ऊन वारा पाऊस यापासून लपवून ठेवतो आणि डी जीवनसत्वमिळत नसल्याने माझ्यासारख्याला हाडांचे आजार जडतात.   त्यासाठी ट्रेक हा उत्तम उपाय आहे. आपण स्वतःला कितीही झाकले तरी ऊन लागतेच लागते. 
(वरील सुंदर फुलांचे फोटो रोहित याने काढले आहेत)  
उन्हाने सगळेच जण झाड शोधत होते. एखादे झाड सापडले की सगळेजण पटपट सावलीतजागापकडून उभे राहू लागलेपण हे झाड वैगेरे फक्त पायथ्याशीच आढळले. वरती शिखरचढताना"झाड वाड कुछ नहीं था". अश्यावेळी निवडुंग दिसले तरी त्याच्या कणभर सावलीत ट्रेकर्स विसावाघेत होते. कोणत्याही गोष्टीची किंमत ती नसताना कळते तसेच अश्या कडक उन्हात मात्रएक झाड की किमत भी बहोत बडी चीज होती है बाबूतुला पहाते रे ) पाणी पिऊन आणि  जवळ असलेले घरचे लिंबू सरबत पिऊन माझे पोट टम्म झाले होते परंतु तहान काय भागत नव्हती. मी ट्रेक दरम्यान कधीहीइतके पाणी पित नाहीट्रेक नियमानुसार घोटघोट पाणी पिऊन ट्रेकमध्ये पाणी पुरवून ऊर्जा वाचवूनजात असतेपरंतु या ट्रेक दरम्यान मला आत्मविश्वासच कमी होऊ लागला होता. एक ट्रेक चुकला की असे होते कधी कधी. खूप पाणी पिऊ लागल्याने पोटामधे ढवळू लागले.होतेप्रत्येक मिनिटाला फोटो काढणारी मी माझे टप्प्याटप्प्यावर फोटो काढण्याकडे बिलकुल लक्ष नव्हते. जबरदस्त डिहायड्रेशन का कायते झाले होते मला. ही  गोष्ट माझ्यासोबत असलेल्या मयुरी थरवळ आणि गीता,राहुल शिंदे यांनाच माहित होती.  नेहमी येणारा ट्रेकर बलवानच असतो असा शिक्का त्या ट्रेकरवर असतो.त्यामुळे इतर लहानमोठ्या आणिनवीन ट्रेकर्सना असा झालेला त्रास सांगितला तर त्यांचेदेखील मन खच्चीकरण होते.त्यासाठी होता होईल तेवढे मी सहन करीत गेलेत्यावेळी मयुरी,गीता,आणि राहुल शिंदे यांची मला खूप मदत झाली.छोटे झुडूप आले तरी मी बसत होते आणि डोके फक्त झुडुपात घुसवित होते. हळूहळू एक तासात एकटप्पा पार केला आणि हायसे वाटले. त्या बकऱ्या घेऊन जाणाऱ्या मुली आणि बकऱ्या एकदम शांतपणेरांगेत चालल्या होत्या. त्या बकऱ्यांच्या राज्यात आम्ही आल्याने आमच्यातील मयुरीआणि आकाशयांना बकर्यांनी वळून चांगलीच ढुमळी दिली त्यानंतर त्या बकऱ्यांच्या नादाला कोणीही गेले नाही. "आधीच उन्हाचा तडाखा त्यात ही बकरीची ढुमळी खा" इतके कोणी सांगितलेय??राणे सर आणि  निलेशकुमकरच्या म्हणण्यानुसार अजून एक ते दिडच तास ट्रेक बाकी राहिला होता. दुपारचे बारा वाजले आणि माझी गाडी आज एक तासातच पंक्चर झाली.या शिखरावर अधेमध्ये कुठेही पाण्याची सोय नाही फक्त हटकेश्वर मंदिराजवळच पाणी मिळते त्यामुळे ऊन्हाच्या ट्रेकलाजायचेअसल्यास किमान ३ लिटर पाणी घेऊन जावे. .
नवीन जुने सगळे ट्रेकर्स उन्हामुळे दमले होते. निलेशकुमकरला आणि राणे सरांना प्रत्येकाचा एकच  प्रश्न असे निलेश सर, "ट्रेक अजून किती बाकी आहे?"आणि त्यांचे दोघांचे  एकच उत्तर असे "आताफक्त २० मिनिटे बाकी आहेत".माझे पोट बिघडले आणि बीपी  झिरो होत होता त्यामुळे मला काहीही सहन होत नव्हते. सगळ्यांच्याच जवळचे पाणी संपत आले होते. २ ते सव्वादोन तासाचा ट्रेक असल्याने आणि जेवणाची सोय खाली पायथ्याच्या गावात निलेशकुमकरच्यामामाच्या आमराईमध्ये असल्याने आणि उन्हाचा अंदाज  आल्याने सगळ्यांचाच अंदाज चुकला होता.मीमयुरी अक्षरशः वरच्या टप्प्यावर आता बसणारच आणि ट्रेक पूर्ण करणार नाही या विचाराने कशीबशी चढण चढत होतो. थांबायला तर एखादे छोटेसे झुडूप सापडे त्यात आम्ही १०-ते १२ डोकी खुपसत असू इतका उन्हाचा त्रास झाला. .त्यासाठी आमच्या वर्गमित्र तुषार ट्रेकरने एकटीप दिली आहे,उन्हाळ्यात ट्रेकच्या आद्ल्यादिवसापासून भरपूर पाणी प्यावेगरज वाटली तर एक ओआरएस  लिटर बाटलीबरोबर प्यायचेआणि ट्रेकसाठी खजूर मीठ लावून न्यायचा ( मॅरेथॉन पाळणाऱ्यांची टीप आहे म्हणे ही ) या टीपचा मी नक्कीच अवलंब करणार आहे. सोबत खजूर,शक्यअसली तर ताजी फळे नाहीतर सुकलेली फळे पिंपरीत साई ड्रायफ्रूट्स वाल्याकडे मिळतात ती आणणे फारच फायद्याचे ठरते. .. ट्रेकला जाताना सोबत घरचे लिंबू सरबत बनवून ते रात्री फ्रिजमधे ठेवणे आणि सकाळी बॅगमध्ये भरणे म्हणजे उन्हाच्या वेळेला ते आपली तहान शमवतेआणि भरपूर पाणी जवळठेवावे.  तेलकट पदार्थ मी ट्रेकसाठी नेत नाही ते ट्रेकर्सने नेले तरी ते ट्रेक संपल्यावर बसमध्ये खावेतअश्या बऱ्याच गोष्टींचे पालन केले की ट्रेक त्रासदायक होत नाही आणि ऊर्जा टिकूनरहातेआणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावरच मी माझा ट्रेक पूर्ण करते तशी इच्छाशक्ती प्रत्येकाजवळ असली की ट्रेक सुफळ संपूर्ण झाला म्हणून समजा. .
मागे वळून पाहिल्यावर समजले आम्ही दोन मोठाल्या स्टिफ डोंगरांना वळसा घालून आणि चढून आलो होतो. ट्रेकची एक धुंदी असते त्या धुंदीत आम्ही चालत असतो परंतु ह्या धुंदीत कधी कधी गुंडी वळते हे विसरता काम नयेदुपारच्या एक वाजता दुसरे एक मोट्ठे पठार आले तिथे गार वाऱ्याची झुळूक येत असल्याने जरा बरे वाटले. .आम्हाला वाटले  निलेश कुमकरची एक तासापासून चाललेली २० मिनिटे संपली वाटतेपरंतु तसे काही नव्हते. तिथे थोडावेळ थांबून  निलेश कुमकर याने आजूबाजूला दिसणाऱ्या गडकिल्ल्याविषयी माहिती दिली. .जुन्नरमध्ये या परिसरात हटकेश्वर हे ठिकाण मध्यवर्ती ठिकाणी असून इथून चहूबाजूला चावंड,शिवनेरी,हडसर,निमगिरी,सिंदोळा कुंजरगडहरीशचंद्रगडलेण्याद्री गणपती हे सगळे गडकिल्ले दिसतातयेडगाव धरण येथून दिसते. एकीकडे पिंपळगावजोगा  धरणाचा अथांग जलाशय अप्रतिम भासत होता. 
पावसाळ्यात इथे खूप पाऊस पडतोसप्टेंबर,ऑक्टोबर मध्ये इथे अनेक रंगीबेरंगी फुलांची बाग फुलते. .वर्षातून एकदाच येणाऱ्यारानफुलांची मखमली चादर पसरावी तसे रंगीत वातावरण इथे असते.
आम्ही  ते  ट्रेकर्सने या पठारावर थांबायचे ठरवले खरे परंतु आमच्याकडचे पाणी संपले होते आणि निलेशच्याआणि राणे सरांच्या मते हटकेश्वर मंदिर आता २० मिनिटांच्या अंतरावर असल्याने पाण्याची२तास वाट पहात तडफडण्यापेक्षा मी असेल ती ताकद लावून पाण्याजवळ जाण्याचा निर्णय घेतला. 
निलेश ते आताफक्त २० मिनिटे राहिली हे वाक्य इतका प्रेमाने सांगत होता  की ते आम्हाला खरंच वाटे.  आता जर मंदिर आले नाही तर  निलेशकुमकरला मी ढकलून देईन असे माझे गंमतीने कितीदा म्हणून झाले. सॉरी  निलेश कुमकर. 
आता पुन्हा  टप्पे चढण आलीमग मात्र मी बसून जवळ असलेला सुकामेवा,फळे काढली आणि सोबत असलेले कवी किरण टेकवडे आणि शाहिरी करणारे प्रदीप अडागळे यांना एक गाणे किव्वा पोवाडा ऐकवावयास भाग पाडले आणि खूप एनर्जी मिळाली त्या एनर्जीच्या बळावर पुढचे  टप्पे पार केलेकारण ट्रेक पूर्ण  करणे हे माझ्या नियमात नाहीजीव गेला तरी बेहत्तर पण ट्रेक पूर्ण करणार म्हणजे करणारचशेवटी आमचे ट्रेकगुरु आहेत मंदारसरराणे सररोहित सरनिकाळजे सर. .दुपारी २च्या सुमारास २टप्पे पार केल्यावर हटकेश्वर मंदिराची पत्र्याची शेड दिसली आणि हायसे वाटून बिघडलेले पोट हळूहळू जागेवर आले. .  दुपारी अडीच वाजता हटकेश्वर मंदिरात आम्ही पोहोचलो निलेशकुमकरसहित राहुल आणि इतर तिघे आम्हा दमलेल्यांच्या पाण्याच्या बाटल्या भरून देऊ लागलेआम्ही पाणी पूण तृप्त झालो आणि मगच खाली बसलो. त्या पाण्याची चव अप्रतिम होती. आणि त्या तहानलेल्या जीवाची तहान भागविणाऱ्या पाण्याची तुलना कशासोबतही  होऊ शकत नाही. 
.
निलेशकुमारने पुन्हा मंदिराविषयी माहिती दिलीआणि वऱ्हाडया डोंगररांगेची आख्यायिका सांगितलीपुराणकाळात एक वऱ्हाड या मंदिरात दर्शनासाठी आले आणि पुढे एका डोंगररांगेत हे वऱ्हाड गायब झाले म्हणून या पुढील डोंगराला वऱ्हाडडोंगररांग असे नाव पडले असावे. सर्वात पुढचा टोकदार डोंगर म्हणजे नवरदेवाचा टोपतो अद्भुत पूल म्हणजे नवरानवरीची गाठ आणि मागचीडोंगररांग म्हणजे त्यांचे वऱ्हाड आहे अशी आख्यायिका आहे.  त्यामुळे जुन्नर भागातील लोक या डोंगराला वऱ्हाडयाडोंगर असे म्हणतात. येथील हे हटकेश्वर मंदिर स्वयंभू आहे. दगडात कोरलेले  शिवलिंग आणि शिवलिंगाच्या बाजूला एका कोपऱ्यात वर्षभर वाहणारे पाण्याचे छोटेसे कुंड आहेमंदिराच्या गाभाऱ्यात नवस म्हणून वाहिलेले दगडाचे जीर्ण असे दोनशेएक नंदी आढळले. मंदिरालगत पौराणिक महत्व लाभलेल्या गणेश आणि हटकेश्वर गुंफा ह्या पूर्वीपासून भाविकांचे श्रद्धास्थान आणि ऋषीमुनींची तपोभूमीच आहे . नवनाथ ग्रंथात या डोंगराचा सोन्याचा डोंगर असा उल्लेख आहे. हट्केहश्वराच्या दर्शनासाठी तीन वेळा गेल्याने काशी क्षेत्राला गेल्याचे पुण्य लाभते असा उल्लेख काशीखंड या ग्रंथात आहे. हटकेश्वरमंदिराजवळ अर्ध्या तासावर आम्ही कोळेवाडी गावाजवळून पाहिलेलापूल होता. 
आमच्याकडे वेळ कमी असल्याने लीडर्सने गुंफा आणि नैसर्गिक पूल यांच्यातील एकच पर्याय निवडलाआणि तो म्हणजे तोच अद्भुत पूल. आम्ही तिनच्या सुमारास पुलाजवळ पोहोचलोकाही ट्रेकर्स अजून येतच होते. हजर असलेल्या  थोड्या ट्रेकर्स मधले काही ट्रेकर्स लीडर्सच्या सूचनेनुसार सहा-सहाच्या ग्रुपने एका झुडुपाला एक रोप लावून त्या अदभूत पुलावर जाऊन पोहोचले. त्यांना पाहून आम्हालाच जास्त आनंद झाला होता. उतरताना गवतामुळे अतिशय घसरडे होते.परंतु इच्छुक स्थळी पोहोचलॊ की मग थकवा कुठे जातो आणि ऊर्जा उत्साह कुठून येतो हे कोडे मला आजतागायत उमजले नाही.  हा अद्भुत पूल साधारण ५ते  फूट रुंद आहे आणि १२ते१५ फूट लांब आहे. आपण या पुलावर उभे राहिलो की समजते आपण या अवाढव्य निसर्गापुढे किती क्षुद्र प्राणी आहोत ते. आम्ही इथे थोडीशी फोटोग्राफी केली आणि मंदार सर आल्यावर बॅनर फोटो घेऊन शिल्लक असलेला आपापल्या जवळचा थोडाखाऊ संपवून साधारण पावणेचारच्या सुमारास लगेच परतीचा मार्ग धरला. येताना हटकेश्वर मंदिरात पुन्हा पाण्याच्या बाटल्या भरून घेतल्या आणि मग मात्र सपासप पावले टाकीत निघालो. पोटात भुकेने कावळे नाही तर डोमकावळे ओरडत होते."पर ट्रेक पुरा करणे का आनंद बहोत बडी चीज होती है बाबू"
उतरताना आता उन्हाचा तडाखा संपला होता आम्ही गार वाऱ्याच्या तरंगावर उडत होतो जणू. आता प्रत्येक टप्प्यावर फोटोग्राफी सुरु होती. सूर्य हळूहळूअस्ताला निघाला होता त्यामुळे तो रंगछटांचे दर्शन लपवू शकत नव्हता. अप्रतिम रंगांची उधळण आम्ही कॅमेऱ्यात कैद करीत होतो. निवांत बसून घराकडे  जाणाऱ्या त्या वरून राजाकडे निवांत बसून बघत बसावे वाटत होते परंतु आम्हाला घराकडे जायचे होते. त्यामुळे सूर्य आणि कॅमेरा याची जुगलबंदी सुरु झाली होती. गवतफुले त्यांच्या लाटा,छटा,निसर्गाच्या हिरव्यासफेदकेशरीनिळ्यासुंदर रंगांची उधळणयेताना अनेक टप्पे पार केलेल्या डोंगमाथ्यांची वलयांच्या निळ्याधूसर छटा अप्रतिम भासत होत्या. पाहता पोटातील कावळ्यांना तसेच ओरडवत ओरडवतच संध्याकाळी साडेसहा-सातच्या सुमारास आम्ही आमच्या बसजवळ आलो. काही ट्रेकर्स पुढे येऊन आमराईत जेवण करून मस्त आराम करीत होते. आमच्यातील ४ते  ट्रेकर्सला त्रास होऊ लागल्याने लीडर रोहित सर त्यांच्यासोबत थांबले होते त्यांनी वाखाणण्याजोगी फोटोग्राफी केली. नुसता शांत बसेल तो ट्रेकर कसला??मयुरी थरवळमिपाटणकरमि.  सतीश बाबरमि. निलेश लोंढे यांच्यासोबत रोहित हे एकत्र थांबले होते. .  दुपारी जेवणाचा केलेला बेत वेळेअभावी फसला खरा परंतु निलेशकुमारच्या ओळखीच्या कुटुंबाने त्याच आमराईत संध्याकाळी -ते ८च्या दरम्यान गरम गरम बाजरीची भाकरीमासवडी,आमटी भातपापड लोणचे गुलाबजामूनच्या चविष्ट जेवणाने दुपारची जेवणाची कसर भरून काढली. खडप सरांच्या नवीन गाडीच्या पेढ्यांनी अजूनच लज्जत वाढवली.  त्यात सकाळी मयुरी थरवळ यांनी स्वतः बनवून आणलेले डिंकाचे लाडू आम्हाला सगळ्यांना खूप आवडले होते. दाणे दाणे पे लिखा है खानेवाले का नाम. अन्नदाता सुखींभव. ट्रेकर्सहो,मयुरीचा आवाजदेखील खूप गोड आहे बरं का.  
.
अश्याप्रकारे हटकेश्वरचा ट्रेक जरा हटकेच झाला उन्हामुळे सगळ्यांसाठीच हा धुरकाढू ट्रेक ठरला परंतु असा ट्रेक आपल्या शारीरिक क्षमता तपासण्यासाठी ट्रेकहवाच हवा असतो. रात्री ८च्या सुमारास आम्ही गोद्रेगावातून निघून-जुन्नर-नारायणगांव-चाकणनासिक फाटा -निगडी या रस्त्याने घर गाठलेयेताना प्रदीप अडागळे यांनी शाहीर राजू राऊत यांचा "अंधार फार झाला एक दिवा पाहिजे या देशाला जिजाऊंचा शिवा पाहिजे" हा पोवाडा खणखणीत आवाजात सादर केला. तसेच शुभांगी कुलकर्णी यांनी गॊड आणि कडक आवाजात सादर केलेले शिवबांचे दोन्ही पोवाडे ट्रेक समारोपाला चार चाँद लावून गेले. राणे सरांनी सादर केलेली "तरीही आम्ही नाराज नाही व्हायचंहे असंच चालायचं,हे असंच चालायचं ही कविता अप्रतिम आणि मजेशीर होती. .
ट्रेकच्या आघाडीच्या  जबाबदारीचा  भार राणे सर सांभाळीत होते मधला भार मंदार सर सांभाळीत होते आणि शेवटचा भाररोहित सर आणि निकाळजे सांभाळीत होतेआमचे लीडर्स एखाद्या पालकाप्रमाणे पाल्याची काळजीघेतात,होता होईल तेवढा सगळ्यांना ट्रेक कसा पूर्ण करवता येईल याकडे त्यांचा कल असतो. अगदीच कोणाला ट्रेक पूर्ण करता आला नाही तर त्यांना कोणालाही एकटे  सोडता स्वतः एक लीडरत्या शेवटच्या ट्रेकर्ससोबत थांबतात. तुमच्या कार्याला आणि संयमाला आम्हा ट्रेकर्सचा सलाम. एखाद्याने ट्रेकच्या अवघड ठिकाणी जास्तीची मस्ती केली तर वेळप्रसंगी आम्हाला ओरडा खावा लागतो परंतु त्यामागे काळजी दडलेली असते. .
९० व्या ट्रेक दरम्यान लाभलेले असंख्य उत्तम फोटोग्राफर रोहित सर,जय-मंदार थरवळ निलेशकुमकर,यश थरवळ ,राणे सरमंदार सर,राहुल शिंदेहर्षद,सलोनीभावनाऋतुजा आणि ग्रुप,आकाश,पवनकरिष्मा आणि ग्रुपप्रशांत गुंड,खडप सरप्रशांत भावसार,रेखा सुमित,शेवाळकर सर,अंबादास कदम,गीता-ख़ुशी-इर,शमा-शुभांगी आणि गृपभूषण चौधरी,किरण-प्रदीपअमृत,अतुल बांगल,अनिकेत,आदी,कौस्तुभ,आकाश चौधरी,भावना आणि इतर सर्वांचे खूप कौतुककरावेसे वाटते. भूषण चौधरी याने कि.मी. चे अचूक मोजमाप केले त्याचे विशेष कौतुक. आजच्या ट्रेकचे मार्गदर्शक  निलेशकुमकर यांनी अतिशय उपयुक्त माहिती देऊन उत्तम मार्गदर्शन केले.राणे सरांची २०च मिनिटे राहिली आहेत ही क्लुप्ती फार कामी आली. ट्रेक लीडर्स आणि  निलेशकुमकर यांना शतशः धन्यवाद. .
वेळेअभावी ओळख परेड राहून गेली आणि कवी किरण याच्या कविता ऐकता आल्या नाहीतत्यासाठी किरणने आणि सर्व ट्रेकर्सने आपली प्रत्येकाची कला सादर करण्यासाठी पुन्हा पुन्हा माऊंटन एज एडवेंचर अँड वाईल्डट्रेल्सच्या ट्रेकची मजेशीर आणि   थकवणारी वारी जरूर करावी.  
सर्व ट्रेकर्सचे उत्तम सहकार्य आणिसहभाग यामुळे जाऊन येऊन साडेसोळा किमीचा ट्रेक उन्हाचे चटके देणारा आणि चढाउ टप्प्याचे झटके देणारा परंतु फारच हटके झाला. .