Tuesday 25 August 2020

अभिमान ⛳

मुंबईतील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक मंडळाच्या वतीने पहिल्यांदाच पुरस्कार देण्याचे कार्य सुरू केले आणि त्या पुरस्कारासाठी अगदी योग्य व्यक्ती शोधून त्यांना हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. रविवार दिनांक २३-०८-२०२० रोजी online हा सोहळा संपन्न झाला.
१)कर्नल‌ प्रेमचंद यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
२) शिवदुर्ग टिम लोणावळा यांना दुर्गसंवर्धन पुरस्काराने गौरविण्यात आले.
३) सूरज मालूसरे यांना शिखर सावरकर युवा साहस पुरस्काराने गौरविण्यात आले....🎉🌈
कर्नल प्रेमचंद,Suraj Malusare आणि शिवदुर्ग टिम लोणावळा,( Rohit vartak,Yogesh Umbre team) यांचे त्रिवार अभिनंदन.🎉💐👏
खरंतर या असामान्य व्यक्तिमत्त्वांविषयी आपण कितीही लिहिले तरी ते कमीच आहे.परंतु अशा साहसी लोकांचे कौतुक करणे आपल्यासाठी फार अभिमानाची गोष्ट आहे म्हणून चार शब्द लिहितेय😊 
कठीणातील कठीण सह्यकडे कमीत कमी वेळात एकट्याने सर करण्याचे विक्रम करणारे सूरज मालुसरे तुम्ही ग्रेट आहात.👏🎉
साहसी गुरूच्या साहसी शिष्याला युवा साहस पुरस्कार देवून गौरविण्यात आले.अगदी सार्थ पुरस्कार आहे हा👏💐सूरजसर,आम्हा सर्व ट्रेकर्सचा अभिमान सार्थ ठरवलात तुम्ही.🎉
आमचे ट्रेकींग मार्गदर्शक मित्र तुषार कोठावदे हे सावंतसरांबद्दल नेहमी म्हणायचे जयु तूला सावंतसरांसोबत आणि सूरज सोबत एकतरी ट्रेक घडवतो. ट्रेकींग आयुष्य सार्थकी लागेल.
तेव्हापासूनच या असामान्य माणसांच्या सोबतच्या ट्रेकींगची ओढ लागली होती. तोपर्यंत मी त्यांचे नुसते उंच कड्यांवरचे खोल दर्यांमधले फोटोच तेवढे पहात असे. तुषार सावंतसरांच्या सोबत ट्रेकला जाऊन आल्यावर त्यासंदर्भातील लेख,vlog,तसेच ट्रेकचे विडीओज यावरच मी समाधान मानत असे . खरंच ट्रेकींग या शब्दाने आयुष्य बदलून गेलेय. आम्ही कितीही वेळ कधीही या विषयावर बोलत राहिलो तरी मला कंटाळा कधीच येत नाही.ट्रेक म्हणजे माझं व्यसन झालंय हे.मरेपर्यंत असे व्यसनाधीन होणे आवडेल मला.😊😀❤️
अशा गोड गोड सवयीत रममाण असतांना सावंत सरांच्या कोकणकड्यावरील अकस्माक अपघाताची बातमी ऐकून रडू कोसळले होते.कोण कोणाचे आम्ही परंतु या सह्याद्रीने अशा साहसी माणसांचे साहस वाचण्याचे,अनुभवण्याचे वेड लावलेय.अरूण सावंतसरांच्या अपघाताच्या वेळी सावंत सरांचे लाडके शिष्य सूरज यांनी साहसाने निभावलेल्या कामगिरीविषयी ओंकार ओक यांनी लिहिलेल्या साहसी वाक्यांनी गहिवरून येते आणि खूप अभिमान वाटतो.खरंच ह्या अशा साहसी विरांसोबत किमान एक ट्रेक करावयास मिळाला तरी आम्ही स्वत:ला भाग्यवान समजू.⛳🎉💃
कोरोनाच्या काळात सह्याद्रीत इच्छा असून जाता आले नाही. त्याकाळात आपली प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी किमान चालणे,घरच्याघरी योगा,सकस आहार,फुप्पुसासाठी व्यायाम हे गरजेचे आहे ते तर करतोच आहोत.परंतु माझ्यासारख्या अनेक ट्रेकवेड्यांना immunity buster म्हणून अजून काहीतरी वेगळे खाद्य हवेच होते.ते या सह्यविरांच्या लेखातून आम्हाला मिळाले. तुषार कोठावदेंचा लेख असो,नानांचा लेख असो(संजय अम्रुतकर )सूरज मालुसरेंचा लेख असो,ओंकार ओक यांचा लेख असो,देवा घाणेकरांचा लेख असो,यातून भरपूर शिकायला मिळते,यांचे धाडस पाहून आम्हा सामान्य ट्रेकरचे धाडस वाढते.यांची भरारी पाहून मन सध्या घरी बसून देखील उंच भरारी घेते.🧗 😀
सूरज यांना अरूणसरांच्या अचानक जाण्याचे इतके मोठे दुःख असून त्यातून सावरून पुन्हा नव्याने जगण्याचे धाडस फक्त तेच करू शकतात.कोरोनाकाळात आधी केलेल्या तुफानी ट्रेकचे भन्नाट लेख लिहून,स्वत:चे सह्याद्रीतील सोलो ट्रेलचे सुंदर माहितीपूर्ण Vlog बनवून आम्हा सामान्यांची प्रतिकारशक्ती वाढवलीत.त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद.🙏असामान्य व्यक्तिमत्व असून सामान्यांना असामान्य मानणारे, सह्याद्रीतील कोणीही न गेलेल्या दर्याखोर्यात नवनवीन वाटांचा शोध घेणारे सूरज मालुसरे यांना दहा-विस मिनिटे भेटण्याचा योग आला हे आमचे अहोभाग्यच.🎉🎉आम्ही आणि आमची coffee धन्य झाली ओ😊
साधे सिंपल रहाणे,साधे बोलणे,कुठेही मोठेपणा नाही,कुठेतरी कोणाला तरी मदत करण्यासाठी मुंबई ते पुणे बाईक प्रवास करून दोन तीन तास डोंगर चढून दहाविस किलो वजनाचं ओझं स्वत:च्या पाठीवर घेवून जाणे म्हणजे कमालच आहे.👏कसं जमतं इतकं??असा प्रश्न विचारल्यावर काही नाही कठीणट्रेकमध्ये यापेक्षा जास्तीचे वजन उचलून कड्यावर नेण्याची सवय आहे म्हणे.👏सलाम तुम्हाला.अशा धाडसी गोष्टी करणारे हे असामान्य व्यक्तिमत्व यांच्याबद्दल कितीही लिहिले तरी कमीच आहे. सह्याद्रीतील अशा धाडसी व्यक्तिमत्वाला युवा साहस पुरस्कार देवून गौरविण्यात आले ते अगदी परफेक्ट आहे.मन:पूर्वक अभिनंदन.💐👏अशीच अनेक यशाची शिखरे पादाक्रांत करा आणि असेच साहसी पुरस्कार मिळवा🎉⛳💐🌟

तसेच मागच्या वर्षी लोणावळ्यातील शिवदुर्ग टिमचे शिलेदार रोहित वर्तक आणि योगेश उंबरे यांना एका ट्रेकदरम्यान भेटण्याचा योग आला होता त्यावर मी क्रुष्णसुदामा भेट ट्रेक लेख लिहिला आहे.(कृष्ण सुदामा भेट ट्रेक" https://manchali3.blogspot.com/2019/08/blog-post.html )
यांच्याविषयी कितीही लिहिले तरी कमीच आहे. जिवाची पर्वा न करता दर्याखोर्यात अडकलेल्या संकटात सापडलेल्या माणसाचा तसेच मुक्या प्राण्यांचा जीव वाचवणारे देवदूतच आहेत जणू हे.🙏कोकणकडा आणि असे अनेक कठीण सह्यकडे कठीण वाटेने सर करून विक्रम करणारे शिवदुर्ग टिमचे शिलेदार आणि या सर्व टिमचे खूपखूप अभिनंदन 🎉🌈💐💐🌟⭐🎉
सह्याद्रीत गेलेला माणूस सह्यमय होवून त्याची सगळी गर्वहरणं इथेेच गळून पडतात रे.ट्रेक न केलेल्यांनी ट्रेक करून बघा आणि ट्रेक करणार्यांनी ट्रेक सोडू नका. ट्रेकमुळे आपण घडतो,कणखर बनतो,साहसी बनतो,प्रेमळ बनतो,सक्षम बनतो,Active रहातो, सकारात्मक बनतो, कितीही संकटे,दु:खे आली तरी खचून न जाता नव्याने जगणे शिकतो,अजून काय हवे.⛳
सर्व सह्यविरांचे कौतुक, अभिनंदन आणि सर्वांना साहसी मुजरा😊💐