आजोबा पर्वत ट्रेक
ठिकाण ठाणे जिल्हा
चढाई मध्यम श्रेणी
दिनांक 13 डिसेंबर 2025
ट्रेक टीम Mountain edge Trek group
आजोबा पर्वत Trek Mountain edge आणि adventure pune यांच्या सोबत...🚩
शनिवारी रात्री दहा च्या सुमारास निघालेलो आम्ही पहाटे साडेपाच च्या सुमारास डेहेणे गावात पोहोचलो. त्याठिकाणी बाळकृष्ण दादा यांच्या घरी चहा नाश्ता आणि जेवणाची सोय होती. आम्ही गेल्या गेल्या त्यांच्या वठाणात म्हणजे घराच्या मधल्या दालनात आम्हाला सतरंज्या अंथरूण ठेवल्या होत्या. काही जणांनी वामकुक्षी घेतली. काही जणांनी तर वाघाची डरकाळी फोडली. 😂😂 आम्ही फक्त विस मिनिटे पाठ सरळ केली. ब्रश करून लगेच आवरून तयार झालो.चहा नास्ता तयार झाला. थोडं खाऊन लगेच बसमध्ये बसलो. कारण ट्रेकच्या सुरूवातीच्या जागेपर्यंत बस जाते.तिथून पुढे कच्चा रस्ता आहे. या ठिकाणी एक ग्रुप फोटो घेवून ट्रेक सुरु झाला. कोवळ्या उन्हात शांततेत हसत हसत सगळे जण फोटो काढत काढत निघालो होतो.तीन किलो मीटरची पायपीट करून वाल्मिकी ऋषींच्या आश्रमाजवळ आम्ही पोहोचलो. जाताना सोबत उगवता सूर्य शांत, स्वच्छ, सुंदर वातावरण होते. आकाश निरभ्र असल्याने डावीकडे अलंग मदन आणि कुलंगची डोंगररांग तसेच रतनगड कळसूबाई रांग साद घालत होती. माझ्या ट्रेक न केलेल्या मैत्रीणी आणि मी पहिल्यांदाच सह्याद्रीत सोबत ट्रेक करीत होतो. माझ्या मनात ट्रेक पूर्ण होईपर्यंत धाकधूक होती की यातल्या एकीने जरी ट्रेक पूर्ण नाही केला तर मला वाईट वाटेल. त्यामुळे मी मुद्दामच सुरूवातीच्या टप्प्यात कोणाच्याही सोबत राहिले नाही. जसा ज्याचा वेग तसं चालत राहिलो. अधेमधे सोबत होतोच.बरेचसे नविन ट्रेकर्स होते. माझ्या पायाची शिर जणू फाटली होती इतकी वेदना मला होत होती. माझ्या मनात एकच विचार होता नैसर्गिक रित्या त्या नसा ताणल्या गेल्या की वेदना वाढून दुखणं पुर्ण बरे होते.
ट्रेक सुरु केल्यावर साधारण दिड तासात वाल्मिकी ऋषींच्या आश्रमाजवळ पोहोचलो येथील वातावरण अतिशय शांत आणि मनाला समाधान देणारे होते. घनदाट जंगल आणि उंच उंच झाडे यामुळे आश्रमात सावली होती. सितामाई न्हाणीघराकडे लवकुश पाळण्याकडे असे सुचना फलक नजरेस पडले. रामायण महाभारतातील प्रसंग आपण पुस्तकात वाचले आणि दुरदर्शनवर आपण हे प्रसंग मालिकांमध्ये पाहिलेत परंतु प्रत्यक्षात सितामाता या ठिकाणी काही काळ वास्तव्यास होत्या अशी आख्यायिका आहे.सितामाता यांचा पादस्पर्श झालेल्या जागी आपण आलोय यात खूप मोठे समाधान आहे. वाल्मिकी ऋषींनी समाधी घेतली ते स्थळ येथे आहे. मदीराच्या आवारात विरगळी आहेत. थोडा वेळ थांबून आम्ही आजोबा पर्वत च्या वरच्या बाजूला निघालो. पायवाट होती पण ती कशी? तर जिथून धबधबा पडतो तशी दगडधोंड्यांची वाट. खडा चढ होता आणि माझ्या पायाच्या वेदनेने मी अक्षरशः रेटत रेटत तो पाय ओढत तो खडा चढ चढत होते. अधे मधे माझ्या मैत्रिणींच्याकडे माझं लक्ष होतेच.
आजोबा पर्वत हे महाराष्ट्रातील माझ्या माहेरच्या ठाणे जिल्ह्यात, शहापूरजवळ बालाघाट रांगेत असलेले एक ऐतिहासिक आणि पौराणिक ठिकाण आहे, जे लव-कुशचे जन्मस्थान मानले जाते, याठिकाणी सीतेने वाल्मिकी ऋषींच्या आश्रमात आश्रय घेतला होता.लव-कुश वाल्मिकी ऋषींना आजोबा म्हणत असत. या ठिकाणी वाल्मिकी ऋषी यांचे वास्तव्य होते. येथे वाल्मिकी आश्रम देखील आहे.त्यामुळे या गडाला आजोबा पर्वत असे म्हणतात अशी आख्यायिका आहे. हा किल्ला ट्रेकिंगसाठी लोकप्रिय असून, याच्या ३००० फुटांच्या उंच भिंतीमुळे तो साहसी गिर्यारोहकांसाठी एक आव्हान आहे आणि येथे लव-कुशच्या पादुका असलेली गुहा व पाण्याचे टाके आहेत, ज्यामुळे याला धार्मिक महत्त्वही प्राप्त झाले आहे.
आजोबा पर्वताची प्रमुख वैशिष्ट्ये थोडक्यात खालील प्रमाणे आहेत.
पौराणिक महत्त्व विचारात घेता रामायणातील लव आणि कुश यांचा जन्म याच पर्वतावर झाला, म्हणून याला 'लव-कुश जन्मस्थान' म्हणतात.आजोबा पर्वतचे भौगोलिक स्थान पहाता हा आजोबा पर्वत रतनगड आणि हरिश्चंद्रगड यांच्यामध्ये बालाघाट रांगेत येतो.ट्रेकिंगसाठी मध्यम श्रेणीचा ट्रेक असून, पूर्वेकडून किंवा पश्चिमेकडून दोन्ही बाजूने चढाई करता येते, पूर्वेकडील मार्ग जवळपास 7 ते आठ तास फक्त जाण्यासाठी लागतात. वर जेवणाची सोय आपली आपण करून. रात्री विश्रांती घेऊन सकाळी परतीचा मार्ग धरून दुपारी पायथ्याच्या गावात येता येते. म्हणजे काय ?तर आजोबा टॉपपर्यंत जावयास दीड दिवसाची वेळ पाहिजे.
आमचा ट्रेक फक्त सितामाईच्या लव-कुश पाळणा असलेली गुहा इतकाच होता. तो एक दिवसात पूर्ण होतो. परंतु त्यासाठी पुण्यावरून रात्री 10 ते 11 च्या सुमारास निघालो तर आपण पहाटे पोहोचून सकाळी चहा नाश्ता केला की लगेच ट्रेक सुरू केला तरच हा ट्रेक एक दिवसात पूर्ण होतो.
डेहेणे गावातून निघाल्यावर वाल्मीकी आश्रमात पर्यन्त जावयास जवळपास दीड तास लागतो. आणि तिथून सितामाई च्या लवकुश पाळण्यापर्यंतच्या गुहेत पोहोचण्यास सुमारे दीड तास लागतो.
माझ्या ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यापासून सुमारे ४८ किमी अंतरावर डेहेणे गाव आहे.इथून आजोबा पर्वत ला'आजा पर्वत' किंवा 'आजोबा गड' असेही म्हणतात. आजोबा पर्वत हा ट्रेकर्स आणि निसर्गप्रेमींसाठी एक उत्तम ठिकाण आहे, जिथे इतिहास, पौराणिक कथा आणि निसर्गाचा सुंदर संगम पाहायला मिळतो. आजोबा किल्ल्याची ऊंची समुद्रसपाटीपासून सुमारे ४५११ फुट इतकी आहे. किल्ल्याचा प्रकार गिरीदुर्ग आहे.
काही दिवसांपूर्वी थेरपी योगा क्लाससाठी जाताना एक मांजर माझ्या वेग असलेल्या activa खाली आली मांजरीला वाचवण्यासाठी गाडी खूप धडपडली. ब्रेक दाबून जागेवरच गोल फिरून आपटली. मांजर वाचली आणि घाबरून पळून गेली. त्यावेळी पायाला जबरदस्त मुका मार लागला. काळानिळा झाला होता पाय. त्यानंतर ती नस दुखायला लागली बसता येत नाही.असा काहीसा प्रकार होता मी पुणे ते आजोबा पर्वत प्रवास आणि ट्रेक कसा पूर्ण केला हे माझं मला ठाऊक. असो.
10 वर्षापासून या ट्रेकमुळे मी Arthritis वर मात केली त्यामुळे अजून तरी ट्रेक सोडणार नाही. किंबहुना यावेळी ट्रेकमध्ये 60 te 70 वर्षांची तरुण मंडळी आल्यामुळे मला तर जास्त छान प्रेरणा मिळाली. शिवाय यावेळी माझ्या नॉन ट्रेकर्स मैत्रिणी होत्या म्हणुन ट्रेक कॅन्सल केला नाही. आपण एकमेकांन कडून अशा चांगल्या प्रेरणा घेत राहिलो तर आयुष्यभर आनंदी राहू आणि सुदृढ राहु असे माझे मत आहे. जगाचा निरोप घेईपर्यंत फिट रहायचे असेल आणि आजारी पडायचे नसेल तर आपल्याला जो व्यायाम जमेल तो करायलाच पाहिजे. मला सह्याद्री आवडतो म्हणून मी ट्रेक करते.😅. मला हे सर्व सांगायला गरजेचे का वाटले. कधी कधी लोकांना वाटते ही Jayuu नुसता ट्रेक, तो कॅमेरा, photography यातच असते. पण यामागची मेहनत कष्ट कसरत आपल्याला ठाऊक असते. मला स्वतःला जे आवडते त्यासाठी मेहनत केलीच पाहिजे. आपोआप काहीही मिळत नसते. माझी कधीच कोणाशी स्पर्धा नसते. की मी हा कॅमेरा घेतला तो कॅमेरा घेतला वैगेरे. Photography ची आवड होती ट्रेकला जाऊन photography मध्ये सुधारणा होऊन सराव होऊन वेगळा कॅमेरा घेऊन सह्याद्रीच्या पाऊलखुणा टिपण्याचा प्रयत्न करते.
दहाच्या सुमारास लवकुश पाळणा असलेली गुहा आहे तेथे आम्ही सर्वजण पोहोचलो तेथे लवकुश पाळणा आहे तेथे असलेले पाण्याचे टाके ओलांडून पुढे टोकाजवळ गेले की महाराष्ट्रातील सर्वात कठीण समजले जाणारे Alang मदन आणि कुलंग हे त्रिकूट दिसते. तसेच Ratangad खुटा kalsubai शिखर, Sandan दरी ही रांग आकाश निरभ्र असेल तर स्पष्ट दिसते. आम्हाला दिसली. Trek Leader राणे sir यानी अतिशय सुंदर रित्या स्पष्टीकरण सहित माहिती दिली. आजोबा पर्वतला जोडून कात्राबाई शिखर आहे. तो देखील भन्नाट ट्रेक आहे. आमच्या सोबत गावातील वाटाड्या बाळकृष्ण दादा होते त्यांनी अचूक मार्ग दाखवून उत्तम माहिती दिली. त्यांनी trek दरम्यान chakram hikers आणि आमचे मार्गदर्शक Tushar Kothawade आणि chakram hikers चे इतर members च्या trek आठवणींना उजाळा दिला.
"छत्रपती शिवाजी महाराज की जय"🚩 शिवगारद करून मी माझा ड्रोन बाहेर काढून जमतील तसे चांगले शूट घेतले. ब्यानर फोटो घेवून लवकुश पाळण्याकडे गेलो. आम्ही स्त्रियांनी पाळणा गायला आणि साडेअकराच्या सुमारास परतीच्या प्रवासाला निघालो.कारण जेवण डेहणे गावात होते.
सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही trekers youngsters 60 te 70 वर्षाचे होते त्यांनी उत्तम रित्या trek पूर्ण केला. त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे. वय हे फक्त आकडा असतो. धमक इच्छा आपल्या मनात असावी लागते.आपण अशा प्रेरणादायी व्यक्तींकडून प्रेरणा घेत असतो.
आम्ही काही ट्रेकर्स पुढे आलेल्यांनी valmiki आश्रमात विश्रांती घेतली सितामाईचे न्हाणीघर आणि सितामाईचा हात या ठिकाणाला भेट दिली आणि दुपारी अडीचच्या सुमारास सर्व ट्रेकर्स आले. आमची बस गावात निघाली गावात बाळकृष्ण dada यांच्या घरी veg non veg जेवणाचा आस्वाद घेतला. बाकीच्याचे जेवण उरकत होते तोपर्यंत मी गावातून आजूबाजूच्या डोंगर रांगेचा drone शॉट घेऊन परतीच्या वाटेला निघालो कर्जत मार्गे सुसाट निघालो वाटेत राणे कॉर्नर मध्ये चहा घेऊन रात्री 11.30 दरम्यान घरी पोहोचलो. मनापासून धन्यवाद ट्रेक Leader आणि सर्व टीम.
उत्तम छायाचित्रण केले सर्वांनीच.
जाताना रात्रीच्या प्रवासात सगळ्यांनी विश्रांती घेतली आणि निघाल्यावर दमल्यामुळे सगळेच शांत होते त्यामुळे तोंडाची गाणी वाजली नाहीत. गडावर एक पाळणा गायला आणि सायलीच 1 गाणं ऐकलं तेवढेच कानाला आणि मनाला समाधान. 😅♥️
भेटू पुन्हा सह्याद्री मध्ये. 🚩🙏
जय जिजाऊ 🚩🙏
जय शिवराय 🚩🙏
जय शंभू राजे 🚩🙏
.
.
.
Patil Jayuu