भैरवगड Shirpunje Ghanchakkar शिखर trek with Mountain edge adventure and waild trails pune. हे ठिकाण गिर्यारोहकांसाठी एक अतिशय प्रसिद्ध आणि साहसी trek ठिकाण आहे.
गडाच्या पायथ्याशी जी कमान आहे तिथून वरच्या खिंडीपर्यंत आणि भैरवनाथ मंदिर पर्यंत मध्ये मध्ये लोखंडी शिड्या आहेत. त्या शिड्या कश्या वर नेल्या असतील आणि कशा पद्धतीने फिक्स केल्या असतील त्या करणार्यांना सलाम आहे माझा. त्यामुळे स्थानिक आणि नवीन trekers सुधा हा bhairavgad सहज चढाई करू शकतात. आम्ही रात्री प्रवास करून पहाटे पायथ्याला पोहोचलो 1 तास पाठ टेकली. चहा न्याहारी केली आणि सकाळी लवकर trek सुरू केल्याने bhairavgad माथ्यावर लवकर पोहोचलो. स्थानिक लोक अनवाणी चढाई करताना दिसले. लहान मुल घेऊन चढाई करत होते.
काही जण नवस फेडण्यासाठी जातो असे म्हणाले.वरती माथ्यावर गुहेत भैरवनाथ मंदिर आहे तिथे गावकर्यांची गर्दी होती. स्त्रियांना आत प्रवेश नाही असे ते म्हणाले. आम्ही सगळ्यानी दुरून दर्शन घेतले आणि गडावरील टाक्या मधून पाण्याच्या बाटल्या भरून घेतल्या. मी काही drone shots घेऊन सर्वजण खिंडीतून ghanchakkar शिखरावर रवाना झालो. Ghanchakkar च्या माथ्यावर काही trekers ना शक्य नाही असे वाटल्याने एक leader त्यांच्यासोबत गावातील वाट धरून उतरले. आम्ही घनचक्करच्या माथ्यावर पोहोचलो. जाताना उन्हाचा तडाखा जाणवत होता. तरीही लीडरची नेहेमीची trick असते दहा मिनिटे राहिले 10 मिनीटे राहिली असे करत 2 तास रपेट केली आम्ही. परंतु gad माथ्यावर गेल्यावर जे विहंगम दृश्य दिसले. ते प्रत्यक्षात पहाणे म्हणजे स्वर्ग सुख.❤️
माथ्यावरून 'आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे जलाशय' म्हणजेच भांडारदरा धरणाचे विहंगम दृश्य पाहून डोळे तृप्त होतात. "Ghanchakkar"हे नाव का पडले असावे हा प्रश्न मला पडतो. शेवटच्या टप्प्यावर जाईपर्यंत आपण Ghanchakkar होऊन पोहोचतो. म्हणुन Ghanchakkar शिखर असावे का हे?जाणकारांनी कृपया सांगावे.🙏😊 शिखरावर पोहोचल्यावर "वाह, क्या बात है!"अस आपण सहज म्हणतो. इथून आजूबाजूच्या सुरेख दृश्याने आम्हा सर्वांना भुरळ घातली. मला तर drone Shot घ्यायला वेळ कमी पडतो बाबा. मी drone Shot घेई पर्यंत बाकीच्यांचे तिथे निवांत बसून होते. Photography करून होते.कोणताही group असो. बॅनर फोटो काढताना आणि भगव्या सोबत फोटो काढताना खूप अभिमान वाटतो मला.🚩
एका बाजूला gawalदेव,आजोबा gad,katrabai,रतन gad, kalsubai शिखर,A M K रेंज स्पष्ट दिसत होत्या. एका गडावरून दुसरा गडकोट पाहिल्यावर मला भारी गम्मत वाटते बुवा. अरे आपण त्या तिथे जाऊन आलो. Arey आपण त्या शिखरावर पण जाऊन आलोय. खरच गडकिल्ल्यांवर जायला मिळते हे आपले मोठे भाग्य आहे. Thanks trek leaders 🙏💯🚩
शिखरावर जाण्यासाठी साधारण २ ते ३ तास आणि उतरण्यासाठी २ तास लागतात. जवळपास 8 km ची चाल होती. जास्त नव्हती. परंतु चढाई उन्हाळ्यात जरा जास्त जाणवते. ट्रेकची सुरुवात शिरपुंजेवाडीतून होते आणि पुढे भैरवगडच्या खिंडीतून घनचक्करकडे जाणारी वाट आहे. कठीण चढणीच्या ठिकाणी सुरक्षिततेसाठी लोखंडी शिडी बसवण्यात आली आहे.शिडी मार्गाने जाताना इथे दिवसा उन्हाचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे आपल्या जवळ पुरेसे पाणी सरबत थोडा snacks असावा. टोपी gogal रुमाल stick असावी आणि proper trek shoues असावे जेणेकरून आपण घसरणार नाही. त्यामुळे रात्री किंवा पहाटे trek सुरू करावा आणि हो इथे रात्री खूप जास्त थंडी असते. पावसाळ्यात आणि हिवाळ्यात येथील निसर्ग सौंदर्य खुलून दिसते. सह्याद्री पर्वतरांगेतील घनचक्कर १,५३२ मीटर / ५,०२६ फूट इतके उंच आहे
घनचक्कर हे महाराष्ट्रातल्या सर्वांत उंच शिखरांपैकी क्रमांक तीनचे शिखर आहे. घनचक्कर शिखराकडे जाणारी वाट ही शिरपुंजेच्या भैरवगडाच्या खिंडीतून पुढे जाते. पूर्वी खिंडीत एक पाऊल बसेल एवढीच जागा होती आणि बाजूला खोल दरी पण आता लोखंडी शिड्यामुळे जोखीम कमी झाली आहे. दीड दोन तासांची पायपीट करून घनचक्कर शिखर सर केल्यावर कधीही विसरता येणार नाही असे सुंदर निसर्ग सौंदर्य पहायाला मिळते. ते नक्की पाहून यायला हरकत नाही.
आजकाल ते काजव्यांना पाहण्यासाठी जाणारे खूप आहेत ते जातात. खरे तर जायला हरकत नाही. परंतु त्यांचा प्रजनन काळ असतो त्यांना का त्रास द्यायचा जाऊन??लोक नुसतेच जात नाहीत. काजवे हातात घेऊन बघावे का वाटावे?हा मला पडलेला प्रश्न अनुत्तरीतच असतो. त्यांचे त्यांना चमकू द्यावे. निसर्गाच्या सान्निध्यात जाऊन निसर्ग अनुभवण्याचे डोळा भरून सुख घ्या कृपया. झाडे लावली जात नाही तर किमान तोडू नका. कचरा उचलून आणत नाही तर गडावर आणि निसर्गाच्या सान्निध्यात कुठेही कचरा करू नका. Plastic च्या bottlesचा ढीग पाहायला मिळतो सगळीकडे. गडावर जाताना भरलेली बाटली नेऊ शकतो मग तीच रिकामी बाटली बॅगेत आणू शकतो. असो निसर्गाच्या सान्निध्यात जा पण स्वतः ची आणि निसर्गाची काळजी घ्या.