Monday 11 January 2016

गुमतारा

गुमतारा किल्ला (घोटवडा किल्ला)
घोटगांव (वज्रेश्वरी - अंबाडी रोड)
श्रेणी: मध्यम
उंची : १९४९ फुट 


ठाणे जिल्ह्यात भिवंडी तालुक्यात घोटगांव या ठिकाणी गुमतारा किल्ला आहे. या किल्ल्यास शिवकाळात गोतारा किल्लापेशवेकाळात गुमतारा किल्ला म्हणत. सध्या या किल्ल्याच्या पायथ्याशी असणार्या घोटगांव (म्हणजे माझं जन्मगाव) या गावामुळे ह्या किल्ल्यास घोटावडे किल्ला असे म्हणतात. किल्ल्याच्या माथ्यावरून तुंगारेश्वर जंगलकामण दुर्गभिवंडी हा परिसर दिसतो किल्ल्याच्या पूर्वेस दूर माझा आवडता गड माहुलीगड दिसतो. उत्तरेला गोऱ्ह्याचा कोहोज आणि केळठणचा मंदाग्नी हे किल्ले दिसतात. या किल्ल्यांवर लक्ष ठेवता यावे म्हणून टेहेळणी साठी गुमतारा किल्ल्याचा वापर करत असावे.
भौगोलिक दृष्ट्या हा किल्ला घनदाट जंगलाच्या मधेच आहे १९४९ फुट उंची वरून दिसणारे वातावरण हे फार निसर्ग रम्य आहे.  या किल्ल्यावर निरनिराळ्या प्रकारच्या अनेक औषधी वनस्पती मोठ्या प्रमाणात आढळतात. किल्ल्यावर दगडात कोरलेल्या सात टाक्या आहेत  एका टाकीची साधारण खोली ते फुट आहेत.इतर टाक्या बुजल्या आहेत.पुढे खालच्या बुरजा जवळ दोन मोठ्या दगडांच्या मधोमध बारामहिने गोड पाण्याचा नैसर्गिक झरादेखील आहे.१८ जुलै २०१५ रोजी सह्याद्री प्रतिष्ठानने राबवलेल्या दुर्गदर्शन मोहिमेत त्यांनी झऱ्याची माहिती  काढली आहे.
हा किल्ला फारच दुर्लक्षित असल्याने सहसा पर्यटक इथे जाण्यासाठी पाठ करत असत परंतु आता आमच्यासारखे ट्रेकर्स इकडे वळले म्हणजे हा किल्ला प्रसिद्ध झालाच म्हणून समजा. सध्या गडावर कोणीही रहात नसल्याने वाटा सापडणे कठीणच किल्ल्यावर दुर्ग यात्रींचा फारसा सहवास नसल्याने हा किल्लादुर्लक्षित होता. किल्यावरील दुर्ग अवशेष नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.पुण्यापासून वज्रेश्वरी १८८ कि. मी. अंतरावर आहे.इथे पोहोचण्यास बसने अथवा कारने वेळेत पोहोचलो तर ४ तास सहज लागतात.
२०१५ हे वर्ष सरता सरता बरंच काही शिकवून गेलयं मला. त्यात काही चांगल्या बातम्या ऐकायला मिळाल्या. त्यात चांगली बातमी एक अशी की मला माझ्या शाळेच्या फ्रेंड्स सोबत ट्रेकला जायचं निमंत्रण आलं होतं आणि या संधीचं मी सोनं करणार याची मला खात्री होती.  तो ट्रेकचा भुंगा माझ्या डोक्यात घुसला होता कारणदेखील  तसंच होतं. तो ट्रेक माझ्या जन्मगावी होता आणि बालमित्र मैत्रिणींसोबत होता. आता त्यात मैत्रिणी किती येणार होत्या हे नक्की नव्हतंच कारण प्रत्येकजण नोकरी आणि संसारात इतका गुंतलाय की ट्रेक वगैरे करायला वेळच मिळत नाही. तरीही बरेच मित्रमैत्रिणी आठवड्याला ट्रेक करतात याचा मला खूप अभिमान आणि कौतुक आहे. मलादेखील ते ट्रेकर्स ट्रेकसाठी प्रोत्साहित  करीत असतात याचा आनंद आहे.

ट्रेकला जाणार हे नक्की नव्हतं नुसतं हो म्हंटलं होतं पण "जयू ने एक बार ठाण ली ना तो उसे कोई भी नहीं रोक सकता." अर्थात घरातली परवानगी मिळाली होती पण भावाला मसका मारायचा होता. चल रे भाऊ चल माझ्यासोबत ट्रेकला. तो आला तरच मला जायला परवानगी मिळणार होती आणि तो हो म्हणाला होता.  रोज तोच विषय होता गुमतारा, गुमतारा, गुमतारा, गुमतारा, गुमतारा, गुमतारा गुम….”
हो पण एक भीती होती मनात की माझा नेहमीचा फोनासोबतचा ट्रेक चुकायला नको.  जीवधनगडचा ट्रेक अजून ताजा ताजाच होता तोवर या ट्रेकचे निमंत्रण आले होते.  त्याच वेळी कळाले की  फोनाचा ट्रेक पुढच्या आठवड्यात आहे त्यामुळे जरा हायसे वाटले. ट्रेकचा दिवस जवळ आला. शेवटी फोनाफोनी झाली आणि माझं जायचं नक्की  झालं. ८ जानेवारीला संध्याकाळी आम्ही पुण्यातून निघालो माझी मुलगी प्रभा आणि मी रात्री कसेबसे ११ वाजता गावी पोहोचलो.
उगवला एकदाचा नऊ जानेवारी. पुण्यातले माझे फ्रेंड्स सकाळी पुण्यातून निघणार होते आणि सकाळी ७-८ वाजता चढाई सुरु करणार होतो. परंतु मुंबईतल्या ट्राफिकमुळे वज्रेश्वरीला पोहोचायला त्यांना थोडा उशीर झाला आणि ते १० वाजता तिथे फोहोचले परंतु बाकी ट्रेकर्स येईसतोवर  आम्ही भाऊ बहिण आणि माझी प्रभा आई देवी वज्रेश्वरीच्या मंदिरात जावून दर्शन घेऊन आलो आणि थोडीशी फोटोग्राफी सुद्धा केली. वर्षातून माहेरात एकदा जाणारी मी, माझे श्री. वज्रेश्वरी मातेच्या दर्शनाला नेहमी जाणे होत नाही. जिथे शाळा शिकलो, तिथली ओढ कायमच असते. शाळेत पुन्हा जाऊ वाटतं. शाळेला डोळ्यात भरून घेतलं.  पुण्यातल्या फ्रेंड्सने जिजाजी गणेश काबाडी यांच्याकडे आपल्या गाड्या लावल्या आणि आम्ही वज्रेश्वरीच्या बाजूने ट्रेक चढाई सुरु केली. खरंतर गुमताराच्या चारी बाजूने चढाई करता येते. घोटगांव, दुगाड, उसगांव आणि वज्रेश्वरी इत्यादी.
आम्ही वज्रेश्वरी मंदिराच्याच्या बाजूने ट्रेकला सुरुवात केली. माझा आनंद गगनात मावत नव्हता. कारण ज्या शाळेत शिकलो ज्या गावात आयुष्याचे न विसरता येणारे बालपण घालवले. शाळा शिकताना जो मोठमोठे डोंगर समोर पाहायचो परंतु तेच डोंगर किल्ले कहदी ट्रेक करून चढाई करू असे स्वप्नात देखील मला वाटले नव्हते. त्याच जागेत आम्ही ट्रेक सकाळी १०:३० वाजता ट्रेकची  सुरुवात केली. 
२-३ मेम्बर्सना तिथली माहिती होती परंतु त्याठीकाणी ट्रेकर्स अजून जास्त जात नसल्यामुळे वाट मळलेली नव्हती. आणि या वाटेने आम्ही निघालो ती त्या गडावरच जाइल याची पूर्ण खात्री नव्हती. पहिला थांबा आला तो तिथे जळणासाठी लाकडं तोडणार्या मैत्रिणी जवळ. त्या मैत्रीणीनीदेखील माझ्यासोबत अगदी आवडीने फोटोग्राफी केली.

त्यांनी आम्हाला पाहिले आणि वाट दाखवली कारण आम्ही गडाच्या मागच्या बाजूला चढाई करीत होतो आणि रानात जाणार्या वाटा अनेक आहेत. आम्ही आपले निघालो. एक डोंगर पार केल्यावर जंगलातीलच एक मित्र (गुराखी)भेटला त्याने आम्हाला योग्य  रस्ता दाखवला आणि  म्हंटला सांगतो तसंच जा म्हणजे तुम्ही बिलकुल चुकणार नाही. तो  बहुदा इकडे जंगलात गाईडचं  काम करत असावा. 
त्यांची शेती वैगेरे जंगलात असतेच शिवाय कधी सश्याची शिकार करायला तर कधी मधाच्या पोळ्याची मध काढायला ते जातच असतात. "पाऊले चालती गुमतार्याची वाट" असं आमचं चाललं होतं. अजून एक तास झाला तरी किल्ल्याचा माथा काय दिसत नव्हता. मधेच हिरवीगार शेतं दिसत होती. गारवा मात्र छानच होता. त्या हिरवळीवर तिथेच बसावं वाटत होतं परंतु त्या दिवशी फक्त एकच ध्येय होतं "गुमतारा" सर करणे. 


माची डोंगर असा पल्ला पार करत आम्ही अश्या ठिकाणी होतो जिथून गडाच्या पलीकडे एक धरण आहे त्याला तिकडे उसगावचा बंधारा असे म्हणतात. त्याचा सध्याचा आकार अगदी महाराष्ट्राच्या नकाश्यासारखा असा माझ्या नजरेला भासला.  
आम्ही  पुन्हा वाट शोधली आणि चालू लागलो. असे वाटले की  आला किल्ला. परंतु छे अजून किमान दोन तास तरी होते. माची-डोंगर-माची  असा खेळ चालू होता. एका तासाने बालेकिल्ल्याचे टोक दिसायला लागले तेव्हा कुठे आम्हाला  हायसे वाटले. 

आता मात्र पाणी आणि सरबत पिवून बोअर झालो होतो. मधेच एका बाजूला दरी आणि एकदम छोटी वाट होती माझे शूज घसरत होते किल्ल्याला अजून कुठेही रेलिंग लावलेले नाही.  पडला कोणी की डायरेक्ट मेलाच समजा. आमच्यासोबत हिमालयन ट्रेक करणारे अनुभवी ट्रेकर्स सोबत होते त्यामुळे कसलीही भीती वाटत नव्हती. माझी मुलगी प्रभा मात्र मस्त सगळ्या मामालोकांसोबत बिनधास्त चालली होती.

.दुपारी  १:३० वाजता एका ठिकाणी कपारीत नैसर्गिक पाण्याचा झरा दिसला तिथे आम्ही ३-४ जण पुढे आलो होतो तेवढे पाण्याच्या बाटल्या भरत होतो तर तो खडक ओला असल्याने माझा शूज घसरला आणि  मी मात्र जोरात आपटले तरीही हातातला फोन काही मी सोडला नाही. 




सग्गळे ट्रेकमेम्बर्स आल्यावर मात्र अजून जास्तीच्या पाण्याच्या बाटल्या भरल्या आणि आम्ही निघालो ते थेट बालेकिल्ल्याकडेच  कारण या दिवसात किल्ल्यावर पिण्याच्या पाण्याचा साठा   नव्हता. पडझड  झालेल्या प्रवेशद्वाराजवळ आम्हीपोहोचलो आणि अतिशय घसरड्या कठीण वाटेने जल्लोष करत त्या किल्ल्याच्या टोकाला जावून पोहोचलो.तिथून माझा गाव आणि घर कुठे दिसतं ते मी सर्वात आधी पहिलं. बापरे काय घसरडी जागा होती ती. पूर्ण कारवीचे जंगल आणि त्यात उतार होता.  थ्रिल होतं पण आनंद देखील तितकाच पराकोटीचा होतादिसताना सोप्पा दिसणारा किल्ला "लई कठीण व्हता"

  

पाच तासानंतर किल्ल्याच्या सर्वात उंच भागावर म्हणजे बालेकिल्लावर दुपारी :३३ ला पोहचलो. तेथून पुढे चालत गेल्यास मिनिटात उजव्या हाताच्या वळणावर पाण्याच्या टाके कोरलेले आहेत.त्यात टाकीची खोली फुट असून बाय एवढी लांब रुंद आहे.इतर टाक्या ह्या मातीने बुजल्या आहेत.त्याच्यापुढे एक आणखी एक कोरीव टाकी लागते एकूण टाक्या आहेत.एका इंग्रज कालीन घराचे भग्न अवशेषअसावेत हे अवशेष अंदाजे १२ बाय १८ एवढ्या लांबी रुंदीत पसरले आहे त्याच्या डाव्या हाताला खाली गोमुखी दरवाजा आहे त्याचे दोन्ही बुरुज(उंची २५ ते ३०फुट) पडक्या स्थितीत आहेत. दरवाज्याचा उंबरठा तेवढा शिल्लक आहे किल्ल्याची तटबंदी ही कातळी दगडात कोरीव काम करून उभी केलेली आहे. 




बालेकिल्ल्यावर आम्ही गडाच्या सगळ्यात वरच्या टोकावर पोहोचलो  जिथे पाण्याचे टाके आहेत परंतु सध्या त्यात पाणी नाही तिथे आम्ही सर्वात आधी जेवणाचे डब्बे काढून जेवण करून घेतलं. आज मला माझ्या वाहिनीने सरिताने माझ्या आवडीची भेंडीची भाजी बनवून आयता डब्बा दिला होता. असं  दुसऱ्याच्या हातचं आयतं  खाण्यामध्ये काय सुख असतं तुम क्या जाणो बाबू . मला तर फारच छान वाटलं.  त्यात अविनाश राउत उपसरपंच होते ते तिथेही समाजकार्य करत होते. डब्यातल्या भाज्या वाटून वाटून देत होते अगदी मनापसून ते हे कार्य करत होते सरपंच हे नाव त्यांना शोभत होते. तिथे फोटोग्राफी केली ओळख करून घेतली नव्या मेम्बर्स ची आणि मग बरोब्बर ४:४४ ला आम्ही उतराई सुरु केली. 
त्या गडाच्या टोकावरून तालुक्यातील सगळी गावे आम्हाला दिसत होती. एकीकडे माहुलीगड दिसला एकीकडे कोहोज आणि मंदाग्नी साद घालत होता कारण आमच्यातले काही ट्रेकर्स मंदाग्नी सर करणार होते.खरा आनंद तेव्हा झाला जेव्हा बाजूला खोल दरी आणि मधोमध माझा भगवा लावला होता आणि तो छान फडकत होता. आम्ही अगदी नंबर लावून त्या भगव्या जवळ फोटो काढले "वन बाय वन". 
त्यानंतर  मात्र पुन्हा उतरताना थ्रिल अनुभवलं ते शब्दात सांगणे अवघड आहे त्यासाठी तुम्ही गुमतारा किल्ल्याला जरूर भेट द्या. कुठेही शिडी नाही काहीही नाही.   सोप्पा गड,जवळचाच गड असल्याने आम्ही प्रॉपर रोप नेला नव्हता ही चूक केली होती.  परंतु हिमालयन ट्रेक करणारे चपळ ट्रेकर्स तुषार कोठावदे प्रशांत कोठावदे, राकेश शिवदे यांनी अतिशय उत्तमरीत्या आम्हाला उतरवण्यास सहकार्य केले.जाताना रोप आणि इतर ट्रेकिंग साहित्य जरूऱ्र  घेऊन जावे. रुपेश जाबर आणि अविनाश राउत यांच्या सोबत प्रभा बेधडक उतरली.काही ठिकाणी तर ती कुणाच्याही आधाराशिवाय उतरली.  "शी इज अ ग्रेट  चाईल्ड"

आम्ही उतराई सुरु केली परंतु चौदा जणांमध्ये आमचे तीन ग्रुप पडले होते.  हळूहळू अंधार व्हायला लागला परंतु सनसेट काय नयनरम्य दिसत होता. त्या आसमंतात  रंग उधळणार्या सूर्याला पहिले की सारा शीण निघून जातो. सूर्य जाता जाता देखील काहीं ना काही देऊनच जातो. सूर्याचा हा गुण आपण घेतला पाहिजे. तो अस्ताला जातानादेखील सोनेरी प्रकाश देऊन जातो. वाह. वाह.....

उतरताना एकमेकाला ये वो असा आवाज देत आम्ही उतरत होतो. काहींजवळ बॅटरीज होत्या आणि मोबाइल फ्लॅश लाईट होता. पण अजून आम्हाला उतराईला एक ते दीड तास लागणार होता. सग्गळेजण एकत्र आलो आणि एकमेकांच्या सोबतीने चालू लागलोअंधारात नेमकी वाट सापडत नव्हती कारण आम्ही आता दुसर्या वाटेने माझ्या गावाच्या जवळच्या एका पाड्यात उतरायचे ठरवले होते. त्यामुळे तसेच त्या फ्लॅश लाईटच्या उजेडात झपझप पावले टाकत उतरत होते. मधेच साप महाराज देखील आडवे आले.  पाय पडणार तेवढ्यात भावाच्या लक्षात आले. मग सापमहाराजांना काही हानी पोहोचवता शांतपणे जाऊ दिले आणि थोड्या वेळाने आम्ही गोठणपाड्यात पोहोचलो.आमची नाईट ट्रेकची हौसदेखील पूर्ण झाली

आम्ही गोठणपाडा या माझ्या गावाजवळच्या पाड्यात उतरलो तिथे आमचे स्वागत एक्दम प्रेमाने झाले. खरंतर लहानाचे मोट्ठे झालो घोटगाव मध्येच.  या पाड्यातुन आम्ही जंगलाच्या वाटेने शाळेत चालत जायचो तेव्हा इथे थांबून पाणी प्यायचो. पूर्वी इथली घरे कुडाची म्हणजे कारवीची असत. त्या कुडाच्या घरांना छान सारवलेले असे.शिवाय छोटी परंतु स्वच्छ घरे आजही पाहायला मिळतात.आमचे फ्रेंड्स इथल्या पाड्यातदेखील होतेच परंतु बरेचसे मित्रमैत्रिणी आता शहराच्या ठिकाणी नोकरीनिमित्त गेल्याने तेथे कोणीही भेटले नाही.माहेरच्या गेल्यावर जसे आपले स्वागत होते तसेच त्या लोकांनी आमचे स्वागत छान प्रेमाने केले.असेही माझे ते माहेरचं होते. त्यांना आम्ही गुमतारा किल्ल्याच्या पूर्ण टोकापर्यंत जाऊन आलो याची खात्री वाटत नव्हती
आम्ही त्यांना आमची किल्ल्यावरील फोटोग्राफ़ी दाखवली मगच त्यांना खरे वाटले. कारण पर्यटक फक्त पिकनिकला येतात तेव्हा एकतर ते बोकडकड्यापर्यंत जातात किंवा गुमतारा किल्ल्याच्या माचीच्या मध्यात जावून परत येतात. आमचा ट्रेक रात्री ७:३० ला संपला. गोठणपाड्यात उतरलो त्याजागी आम्ही तिथे जरा वेळ स्ट्रेचिंग केले पायांना आणि पूर्ण शरीराला खूप आराम वाटला. सरपंचांनी एक गाडी मागवून पुन्हा वज्रेश्वरीला नेवून सोडले आणि त्यानंतर आम्ही तिघे रात्री ८:३० ला माझ्या माहेरी आलो.  
चिन्मय,मंदार लेले,राजेश बोंडे गणेश काबाडी,अविनाश राउत,तुषार,प्रशांत,शिवदे,रुपेश नाबर,प्रभा आणि माझा भाऊ  रुपेश पाटील आणि ज्यांची नावे आठवली नाही ते सगळेच म्हणजे चौदा जण मिळून या सर्वांनी उत्तम ट्रेक घडवून आणला आणि थांकू रुपेश भाई माझ्यासाठी सुटी काढून तू ट्रेकला आला. माझ्यासाठी अशी सुटी काढून कोणीही आलं नाही आजपर्यंत. धन्यवाद भाय.  माझ्या आयुष्यातला आठवणीत राहणारा असा हा ट्रेक होता कारण नवे वर्ष पहिला ट्रेक तो देखील माझ्या जन्मगावी. आणि माझ्या शाळेतल्या फ्रेंड्स सोबत.… 
मित्र हो, शतशः धन्यवाद हिमालयातील कठीण आणि मोठे ट्रेक करणाऱ्या ट्रेकर्ससोबत ट्रेक करण्याची संधी दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. 

12 comments:

  1. छान फोटो !बिनधास्त मोकळ लिखाऩ! गुमतारा आता फेमस झालाच.

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद…गुमतारा आता फेमस झालाच रे…. झालाच....

      Delete
  2. ताई खरच मस्त लिखाण अणि खुप चांगला वर्णन केला आहे आपण फ़ोटो खरच छान वर्णना नुसार टाकले आहेत
    अणि खरच हा सोपा वाटनारा गड खरच कठिन आहे पण तुषार दा अणि प्रशांत दा च मार्गदर्शन राकेश सरखा सहकारी म्हणून हा गड पार केला ......

    ReplyDelete
    Replies
    1. thank you Avinash. pan tumhi saglyanni sahakarya kela mhanun ha trek uttamritya paar padla aahe.

      Delete
  3. Ye Osssssss.....
    MAST TAI.
    ANI PHOTOS KHUP SUNDAR

    ReplyDelete
    Replies
    1. Thank you Rakesh (ye ooooo)
      arey tumhi hotat mhanun aapla trek sukhrup paar padla.

      Delete
  4. Ye Osssssss.....
    MAST TAI.
    ANI PHOTOS KHUP SUNDAR

    ReplyDelete
  5. खूपच छान,या निमीत्ताने माहेरी जाण्याचा योग आला

    ReplyDelete
  6. एकदम सॉलिड ट्रेक वाचता वाचता माझा पण ट्रेक झाला👌👌 ...गर्दीपासून दूर अशा दुर्लक्षित ठिकाणी ट्रेकची मजा काही औरच असेल 😊

    ReplyDelete