Tuesday 14 November 2017

"फोना"टीमची धुमाकूळ दांडेली निसर्ग सफर..

दांडेली निसर्ग ट्रेक आणि सफर
ठिकाण-कर्नाटक 
दिनांक- ९ नोव्हेंबर ते १३ नोव्हेंबर २०१७

सप्टेंबर महिन्यातील “फोनाची जोग फॉल रंगीबेरंगी सहल झाल्यानंतर ऑक्टोबरच्या  दिवाळीच्या सुटीमध्ये मला कुठे बाहेर जाता  आले नाही. नोव्हेंबर मध्ये फोनाचा देवकुंडट्रेक आणि दांडेली निसर्ग ट्रिप एकाच महिन्यात आले. खरं तर मला माझ्या आरोग्यासाठी फक्त ट्रेक करणे आवडते म्हणून ट्रेक करणे जास्त महत्वाचे समजते. परंतु मी दांडेली सहल अजून केली नसल्याने आणि तेही फोनाची सहल असल्याने शेवटी शेवटी मी माझी एक सीट बुक करून ठेवली. तसे नेहमीप्रमाणे सहलीचा दिवस येईपर्यंत मला अनेक अडचणी येत असतात परंतु त्या नंतर जादूसारख्या अदृश्य होतात.
५नोव्हेंबर चा पोलंडच्या मैत्रिणीसोबतचा देवकुंड ट्रेकच्या सुखद आठवणी अजून ताज्याताज्या असतानाच  मला सहलीला जाण्याचा दुग्धशर्करा योग्य आला होता आणि मी तो गमावणार नाही यात शंका नव्हती. देवकुंड ट्रेक झाला, २,दिवसात ब्लॉग झाला आणि लगेच ९ नोव्हेंबरच्या दांडेली सहलीची तयारी सुरु ठेवली. 
मी ९ नोव्हेंबरला माझा जेवणाचा डबा तयार करून पाठीवर सॅक टाकून  चिंचवड स्टेशन गाठले. तळेगावहून ९ च्या लोकलने फोनाचे बाकीचे मेंबर येणार होते आणि तिथून आम्ही पुणे स्टेशन वरून रात्री ११च्या एल.  टी.  टी.  -हुबळी एक्सप्रेसने दांडेली येथे जाणार होतो. लोकल थोड्याश्या उशिरा आल्याने आम्ही पुणे स्टेशनला पोहोचून लगेच आमची एक्सप्रेस आली आणि आमचा दांडेलीचा प्रवास सुरु झाला. १-२ सीटचा थोडा गोंधळ झाल्याने आम्हाला सेट व्हायला थोडा वेळ लागला परंतु तोपर्यंत आम्ही मी आणलेली चटणी भाकरी खाऊन घेतली. बुक केलेल्या सीटचा गोंधळ सावरेपर्यंत  प्रतीक विवेक आणि बरेच लोक १२ वाजेपर्यंत जवळ गप्पा मारत बसले होते. मग मात्र कोण ही जयु ताई ?  असे करून आपापल्या जागी निघून गेले. जराशी गमंत हो. 😊
थोड्या वेळाने आम्ही आपापल्या जागी गप्पा मारत थंडीमध्ये कुडकुडत झोपून गेलो. नेहमीप्रमाणे पहाटे ५ चा अलार्म वाजला एक क्षण मला वाटले मी घरीच आहे. पुन्हा अलार्म बंद करून ६ च्या नंतर चहावाल्याच्या चायवाला चायवाला अश्या अवजाने जागे झालो. फ्रेश होऊन चहा घेऊन लोंडा जंक्शन यायची वाट  पाहत बसलो. शुक्रवारी सकाळी ९ वाजता लोंडा स्टेशनला पोहोचलो. ट्रेन मध्ये रात्री तर आम्ही बाहेरचा निसर्ग अनुभवू शकलो नाही आणि कॅमेऱ्यात कैद करू शकलो नाही परंतु सकाळी मात्र भरपूर फोटोग्राफी करून निसर्ग मनात आणि डोळ्यात साठवून घेतला. त्यावेळी मला जोगफॉल सहलीच्या वेळी केलेली फोटोग्राफी आणि धमाल आठवली.
पुण्यापासून दांडेली सुमारे ५६० कि.मी. अंतरावर आहे रेल्वेने गेलो तर सुमारे १०-११ तासाचा प्रवास होतो. परंतु तोच कंटाळवाणा होऊ नये यासाठी आम्ही बऱ्याच युक्त्या लढवतो. जसे अंताक्षरीदमशेराज खेळतो.   लोंडा जंक्शन वर उतरलो तेव्हा ते स्वच्छ आणि अतिशय शांत असे स्टेशन वाटले. FONAसोबत ट्रेक असो की सहल असो सगळ्या गोष्टी अगदी वेळेत असतात त्यानुसार आम्हाला दांडेलीच्या कॉटेजवर  नेण्यासाठी आमची बस तिथे आधीच येऊन थांबली होती किंबहुना ती बस रात्रीपासूनच तिथे थांबून होती. आम्ही पटापट बसमध्ये आमच्या पाठीवरच्या सॅक टाकल्या आणि प्रवासाचा थकवा घालवण्यासाठी लगेच अंताक्षरी सुरु केली. थोड्या वेळाने सुरभी हॉटेलवर आम्ही इडलीडोसाउत्तपाउडीदवडा असा नास्ता केला आणि चहा कॉफी घेऊन हॉटेलकडे निघालो. तिथे मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे त्या ठिकाणी इंग्लिश,कन्नड भाषेबरोबर मराठी,हिंदी भाषेचे सूचना फलक दिसून आले. तसेच भगवा फडकताना दिसला.तिथल्या चौकात छत्रपती शिवाजी राजेंची घोड्यावर स्वार झालेली प्रतिकृती दिसली आणि तत्काळ आम्ही भगव्याजवळ जाऊन फोटो काढलाच.
अजून आमचे राहण्याचे ठिकाण यायचे होते. पुन्हा त्या रंगीबेरंगी बसमधला प्रवास सुरु झाला. आमची सहल आयोजित करणारे फोनाचे मेंबर मंदार सररोहित सरआणि नितीन असे आमच्या सोबत होते. बसमधून जातात जाता जितके छोटे छोटे धरणाचेनदीचेदरीचे निसर्ग नजारे आम्हाला उतरवून दाखवीत होते  जेणेकरून आम्ही ते कॅमेऱ्यात आणि डोळ्यात कैद कru
आम्ही आमच्या २दिवसाच्या पाहुण्याघरी सकाळी अकरा वाजता पोहोचलो.फ्रेश होऊन जेवण होते ना होते तोवर लगेच आमच्या लीडरने सांगितले की ज्यांना रिव्हर राफ्टिंग करावयाचे असल्यास तयार राहावे.
दांडेली हे एक अभयारण्य आहे. आम्ही येथील अंबिकानगर येथे Dandeli jungle Innया ठिकाणी २ दिवसाचे पाहुणे होतो.  इथे जवळच ३०-३५ की मी च्या अंतरावर सुपा धरण आहे आणि जवळच ४-५ कि. मी. अंतरावर काली नदीचे पात्र आहे. धरणाचे पाणी सोडणार असल्यास तेथील रिव्हर राफ्टिंगचे मालक जवळपासच्या सगळ्या कॉटेज मालकांना फोन करून सांगत असतात की जेणेकरून आलेल्या यात्रेकरूंना रिव्हर राफ्टिंग करता यावे. आम्ही ३ वाजता रिव्हर राफ्टिंगसाठी तयार राहिलो. आमच्या बसने थोड्या अंतरावर गेल्यावर आम्हाला जिप्सीमध्ये शिफ्ट करण्यात आपले.
मोकळे रानघनदाट जंगलमोकळ्या जिप्सी आणि आम्ही सुद्धा मोकळे. ना आमच्याकडे मोबाईल ना आमच्याकडे सॅक ना आमच्या कडे शूज. त्यावेळी असलं भारी वाटत होत त्यावेळी आम्ही अवर्णनीय फीलिंग मोकळा असं काहीतरी झालं होतं. त्यात मी आणि बरेचसे लोक पहिल्यांदा रिव्हर राफ्टिंग करणार तो परमानंद अजून वेगळाच होता. आमच्या जिप्सी काली नदीच्या राफ्टिंगच्या बोटी असलेल्या पात्राजवळ गेल्यासंध्याकाळचे ४ चे कोवळे ऊन थोडी थंडी होती. त्यावेळी फोना टीमचे २-३ मेंबर राफ्टिंग साठी येणार नव्हते ते तिथे जवळ असलेल्या धरणावर जाणार होते. राफ्टिंग आधी जे फोटोज काढण्यात आले ते अगदी चकाकणाऱ्या सोन्यासारखे सोनेरी आले आहेत.
सेफ्टी जॅकेट हेल्मेट घालून आम्ही ७-७ मेंबर्स २ बोटी मध्ये बसलो. आमच्या बोटीचे गाईड आम्हाला सूचना करीत होते. मला मात्र पोहता येत नसल्याने मनातून खूप भीती वाटत होती. परंतु आमच्या सोबत एक गाईड आणि FONAचे पट्टीचे पोहणारे असल्यावर कसली आली भीती.. भीती कहा बीती मला समजलेच नाही. मला विश्वास बसत नव्हता की मी रिव्हर राफ्टिंग करीत आहे. रिव्हर राफ्टिंग वाल्यांनी अगोदरच सांगून ठेवले होते एका ठिकाणी कुठे तरी त्यांचा फोटोग्राफर फोटो काढणार होता कुठे ते काही माहित नव्हते. आम्ही राफ्टिंग मध्ये गुंग असताना मधेच फोटोग्राफर दिसला. मला पाण्याची प्रचंड भीती वाटत असताना फोटोसाठी पोज  देणे मात्र गरजेचेच होते जणू. फोटो कसा की येईना आम्ही रिव्हर राफ्टिंगचा मनमुराद आनंद घेत होतो.
रिव्हर राफ्टिंग मध्ये खरी गम्मत आणि थरार होता तो म्हणजे नदीमधल्या पाण्यावरच्या उतारावरचा. कारण या ठिकाणी बोट पलटी सुद्धा होऊ शकते.  एक थरार गेल्यावर जरा हायसे वाटले. मधेच आम्हाला हॉर्नबिल हा पक्षी उडताना दिसत होता. तसेच नदीच्या आजूबाजूचे दृश्य अतिशय सुंदरहिरव्या रंगाच्या अनेक छटा असलेलं असे होते. वर निळे आकाश त्यात स्वछंदी विहार करणारे पक्षीसंध्याकाळची सोनेरी किरणे पाण्यावर आणि आमच्यावर पडत होती त्यामुळे आम्ही पिवळे पिवळे पाण्यावर तरंगणारे सोनेरी पक्षी दिसत होतो.  आमची दुसरी बोट मधेच येऊन आम्हाला धडकत होती. एकमेकांच्या अंगावर राफ्टने पाणी  उडवून आणि वल्लव रे नकवा हो वल्लव रे रामा  गाणी गाऊन आम्ही आमचा राफ्टिंगचा आंनद उपभोगत होतो. मला सगळ्यात आनंद होता तो म्हणजे हे राफ्टिंग करतानाचे फोटो कसले भारी येतील याचा. राफ्टिंग करताना ते उतारावरचे थरार पॅच अप्रतिम होते. आमचा गाईड अनुप आणि  चाँद खूप छान सूचना देत होते आणि भारी राफ्टिंग शिकवीत होते.
आम्ही सुमारे ७ कि.मी त्या काली नदीच्या पाण्यावर मोठे राफ्टर असल्यासारखे राफ्ट करीत होतो. फोना टीम सोबत असल्याने
 नुसता धुमाकूळ चालू होता.आमच्या बोट मध्ये मी आणि सलोनी दोघीनीही राफ्टिंग केले.  ७ कि.मी अंतर गेल्यावर आम्ही दोघी सोडून सगळ्यांनी खोलपाण्यात  उड्या मारल्या आणि पोहोण्याचा मनसोक्त आनंद लुटला आणि आमचे राफ्टिंग पूर्ण झाले. परंतु आमच्या जिप्सी  यायला थोडा वेळ असल्याने तिथे असलेल्या स्विमिंग पूल मध्ये धुमाकु घातला. पोहोण्याच्या शर्यती सुद्धा झाल्या. जंगल सफारीला गेल्यावर पहिल्याच दिवशी वाघ पाहिल्यावर जो परमानंद होतो अगदी तोच अनुभव आम्हाला राफ्टिंग दरम्यान आला. पहिला दिवस पैसा वसूल म्हणतात तसा पार पडला.त्यात विवेकचा चष्मा एका ठिकाणी राहिला होता तो आणण्यासाठी त्याला चक्क बुलेट राईड मिळाली. ते घनदाट जंगल,मागून अंधार बुलेटवर दोघेच (पण फक्त दोन्ही मुलेच😊😊)अशा दिमाखात चष्माची वरात सातच्या आत घरात आली. नंतर जिप्सी आल्यावर आमच्या बोटी आणि आम्ही जिप्सीमध्ये बसून बरेच अंतर गेल्यावर एका ठिकाणी चहा घेऊन आम्ही आमच्या पाहुण्या घरी जाऊन मस्त गरम गरम पकोडे खाऊन पुन्हा आवरून येऊन जेवण आटोपून त्या थंडीमध्ये पेटवलेल्या शेकोटी जवळ येऊन बसलो. लीडर्सने दुसऱ्या दिवशीच्या कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली आणि सगळ्यांच्या ओळखी करून घेतल्या. म्हणता म्हणता रात्रीचे १२ वाजून गेले तरी आम्हाला समजले नाही. मला रूमपार्टनर खूप छान मिळाली  होती. अगदी मागच्या सहलीच्या वेळी नोवा आणि शोभा माझ्या रूमपार्टनर होत्या तशीच सलोनी होती.  आम्ही रोज सगळ्यांच्या अगोदर तयार होऊन बसत असायचो.
सहलीच्या दुसऱ्या दिवशी आम्ही सगळेच सकाळी लवकर आवरून तयार होऊन सिंथेरी रॉक या ठिकाणी जायला निघालो. आम्ही राहत होतो तिथून सुमाRE ३०-३५ की.मी अंतरावर हा स्पॉट होता. तास ते दीड तासात आम्ही या ठिकाणी पोहोचलो. घनदाट जंगल आणि उंचच उंच अशी झाडे. त्यात अनेक पायऱ्या असलेली दरी आम्ही उतरून त्या सिंथेरी रॉक जवळ गेलो काली नदीची उपनदी कणेरी इथून वाहते आणि त्या नदीवर ३००फुटाचा मोठाच्या मोठा असा उभा असलेला नैसर्गिक खडक म्हणजे हा सिंथेरी रॉक आहे. आम्ही सगळ्यांनी इथे मनसोक्त फोटोग्राफी केली आणि निसर्गाची खरी अनुभूती घेण्यासाठी थोडा वेळ शांत बसून ध्यानधारणा केली. पुन्हा ती दरी चढून वर आलो. तिथे एक छोटा पाचवीतील मुलगा शेव चिवडा, चणे फुटाणे विकायला बसला होता. तोच गोव्यात शिकत असून सुटीच्या काळात मामाकडे येऊन आईला मदत म्हणून हा छोटा व्यवसाय करतो त्यात त्याला दिवसाला हजार रुपये मिळतात.खूप कौतुक वाटले त्या लहान मुलाचे. 
  यावरून इथे पर्यटकांची किती येजा आहे हे समजते. कर्नाटकमध्ये सगळी पर्यटनस्थळे आणि मंदिरे तसेच एकूणच परिसर स्वच्छ दिसला.  जेवणाची वेळ झाल्याने आम्ही तिथून निघालो आणि थोड्या अंतरावर असलेल्या बसवेश्वर या संत मंदिरात जाऊन ५ मिनिटे शांत बसलो. जेवणाच्या वेळ निघून चालली असल्याने आम्ही तिथल्या अन्नछत्रालयात प्रसाद म्हणून थोडे खाऊन निघालो. सगळे जण येईस्तोवर आम्ही बिसलेरी पाणी घ्यायला गेलो तेव्हा रोहितने कर्नाटकी मसाला पान खाऊ घातले. त्यावेळी मी आठवणीने आमचे फोटोग्राफर भाऊबंद प्रतीक आणि विवेक  यांच्यासाठी सुद्धा तिथून पण घेतले. पण ते काही कोणाच्या लक्षात नाही राहिले. फोटोग्राफी सगळ्यांनाच आवडते परंतु नाव येते ते फक्त जयूचे. तरी बरे मी फास्ट असल्याने माझ्यामुळे कधीच उशीर होत नाही नाहीतर मला केव्हाही कोणी ट्रेक आणि ट्रीपला नेले नसते. एकदा कानफटी नाव पडले की मग कितीही चांगले वागले तरी कानफटी ती कानफटीच. असो. 
बसवेश्वर मंदिरातून आम्ही स्कायपॉईंट कडे निघालो. अधे मध्ये व्हॅली व्ह्यू आल्यावर आम्हाला उतरवून दाखवला जाई. आमची आपली फोटोग्राफी सुरूच होती. दुपारी ४ वाजता आमची स्काय पॉईंट जवळ पोहोचलॊ परंतु तिथे खूप कडक शिस्त असल्याने आम्हाला आत जायला काही परवानगी मिळत नव्हती. तिथे मोठे पॉवर स्टेशन होते. शेवटी आमच्यातील वकील सुरेखा पाटील आणि प्रोफेसर पाटील तसेच आमचे फोनाचे ग्रेट लीडर्स यांनी फोनाच्या सगळ्या ऍक्टिव्हिटीजचे फोटो दाखवले आणि सगळ्यांचे ओळखपत्र दाखवून मोबाईल सोबत न नेण्याच्या अटीवर आम्हाला ते पॉवर स्टेशन पाहण्यास आणि तेथील सूर्यास्त पाहण्यास अनुभवण्यास परवानगी दिली. सगळीकडे सीसी टीव्ही कॅमेरे बसविलेले दिसले. आम्ही त्या ठिकाणी गेल्यावर जे दृश्य पहिले ते अवर्णनीय होते. सूर्याचा गोळा अस्ताला जाताना किती सुंदर आणि मनमोहक दिसतो ते त्या दिवशी अनुभवले. फोटो काढण्याचा  मोह सुद्धा कोणाला झाला नाही. सह्याद्रीच्या १५-१७ डोंगररांगांच्या अनेक हिरव्या निळ्या छटा आम्ही अनुभवल्या. समुद्राच्या लाटांवर लाटा आदळाव्यात तश्याया डोंगररांगा एकमेकींवर तरंगत होत्या. आम्ही    पॉवर स्टेशन  ची माहिती घेतली. आणि आम्हाला तो अतिशय सुंदर निसर्ग पाहण्याची अनुभवण्याची  परवानगी दिल्याबद्दल त्यांचे आभार मानून आम्ही आमच्या पाहुण्या घराकडे निघालो.
परत येताना थोडेसे वेगळेपण म्हणून आम्ही कन्नड गाणी ऐकली आणि कन्नड मूवी पहिला. संध्याकाळी पाहुण्या घरी आल्यावर आम्हाला गरमागरम  कांदाभजी खायला मिळाली. थोड्यावेळाने यावरून जेवणाच्या टेबलजवळ आम्हाला  माझी रूमपार्टनर सलोनी हिने मिड ब्रेन ऍक्टिवेशन ही दोन्ही मेंदू जागरूक ठेण्यासाठीची एक ऍक्टिव्हिटी आहे तिने आम्हाला ते प्रात्यक्षिकासहित छान समजून सांगितले. थँक्यू सलोनी.त्यानंतर आम्ही जेवण करून पुन्हा कॅम्प फायर जवळ जाऊन बसलो. पाटील सरांनी छानछान जोक सांगितले. आणि लीडर्सने दुसऱ्या दिवसाची रूपरेषा सांगितली. आज आमची दांडेलीमधील शेवटची रात्र असल्याने अजून धमाल म्हणून संगीत खुर्ची खेळलो. त्यात पाडापाडी किती आणि ढाकलाढकली किती. खरंच आपण सर्वांनीच रोजच लहान होऊन जगावे. आयुष्य खूप सुंदर आहे याची अनुभूती येते. संगीत खुर्चीत आम्ही 3 मुलीच  जिंकलो. मी पहिली, गौरी दुसरी आणि वैष्णवी तिसरी असे आम्ही क्रमांक पटकावले परंतु अजून आम्हाला बक्षीस काही मिळाले  नाही परंतु बक्षीस धारकांनी बक्षीस देण्याचा वादा केला आहे खरा. बक्षिसापेक्षा संगीतखुर्ची खेळताना जी धमाल आली ती अवर्णनीय आहे हो. संगीतखुर्चीच्या वेळी आम्हाला थाळीवर पळी वाजवणारा संगीतकार ह्रिषीकेश भारी मिळाला होता. तुम्ही पळा आणि नाचा मी वाजवतो अSE म्हणणारा तो एकमेव होता. जिकलंस ह्रिषी. उत्तम फोटोग्राफी,उत्तम कॅमेराउत्तम कॅमेरा असलेला  मोबाइलउत्तम आवाज असून पूर्ण गाणे तालासुरात उत्तम गाणारा तरीही शांत बसून इतरांचे ऐकणारा. फोना  टीम मध्ये आल्यावर असा घडतो माणूस की आधीपासून या कला शिकून फोनामध्ये प्रवेश करता का रे ट्रेकरहो ??
सहलीचा तिसरा दिवस उजाडला आणि दांडेलीच्या जंगलमधला ट्रेक अनुभवण्याचा दिवस आला. सलोनी,आणि मी इतक्या थंडीमध्ये पहाटे  ५:३० वाजता तयार होऊन बसलो होतो. ६ वाजता सगळेच आले आणि चहा घेऊन ट्रेकला सुरुवात झाली. आता यात सगळेच जण ट्रेक करणारे नव्हते तरीही३ मेम्बर सोडून बाकी सगळेच ट्रेकसाठी सज्ज झाले ट्रेक सुरु झाला. आमच्यासोबत आम्ही चरण हा एक गाईड घेतला आम्ही जंगल चालायला सुरु केले निरनिराळ्या पक्षांचे मंजुळ आवाज ऐकायला येत होते, ऐकत रहावेशे वाटत होते. आम्ही पक्षांच्या आवाजाचे रेकॉर्डिंग करून ठेवले आहे. थोडे पुढे गेल्यावर अस्वलाच्या पायाचे ठसे आम्हाला पाहायला मिळाले. जंगलात एक शंकराचे मंदिर पार केल्यावर खरा ट्रेक आणि चढ सुरु झाला. काही मेंबर परत जाऊ पाहत होते. परंतु सकाळचे वातावरण खूप आल्हाददायक आणि प्रसन्न होते. त्यात ते कोवळे ऊन डी  जीवनसत्व देत होते. आम्ही तिथल्या डोंगराच्या माथ्यावर पोहोचलो आणि आणि  ओंकारचा जप केला.
योगगुरू प्रतीक बाबा आणि मंदार बाबा यांनी योगासने आणि प्राणायाम करून दाखवल्यानंतर ग्रुप फोटो घेऊन ट्रेक उतराईस सुरु केले. ते जंगल चढण्यापेक्षा उतरण्यास कठीण वाटत होते. घसरडे होते. घसारा करीत आम्ही उतरलो. उतरताना तिथे आम्हाला अंबाडीची फळे पडलेली दिसली जी चिंचेसारखी आंबट असतात. काहींनी चाखून देखील पहिली. उतरत असताना आम्हाला खारीसारखे दिसणारा शेकरू हा प्राणि दिसला. त्याचे फोटो काढण्यासाठी आम्ही एकच लगबग चालू होती शेवटी जयच्या  डी  एस एल आर कॅमेऱ्याने शेकरूला कैद केले.
त्यानंतर चिंचांचा आस्वाद घेतला. उशीर होतोय हे सगळ्यांच्या लक्षात येत होते परंतु ते जंगलच  इतके सुंदर होते की त्या जंगलातुन पाय निघत नव्हता.जंगलामध्ये ३-४ मोठं मोठी मुंग्यांची वारुळे पहावयास मिळाली.  दांडेलीमध्ये इथे या ठिकाणी   या आधी एक PAPERमील होती आता ती दुसरीकडे शिफ्ट झाली आहे.   परंतु त्या  मिलच्या  बॉयलरचा आवाज इतका भयानक प्रचंडमोठा आहे की इथे विमान उडाण होत असावे असा भास होतो. इथल्या जंगलाच्या प्राणी आणि पक्षांना आवाजाचा खूप त्रास होत असावा.  अजून एक गोष्ट जाणवली की इथल्या जंगलामधील या खेडेगावात गावात अजूनदेखील शौचालय नाही. तेथील तरुण लोकांना आम्ही सांगून आलोय आरोग्यासाठी आधी शौचालय बांधा.यावर बोलावे तेवढे  थोडे आहे.
आमचा ट्रेक ९च्या ऐवजी ११ ला संपला आणि  आमच्या लीडरचा पारा चढला असताना आम्ही पटापट नास्ता करून आमची सॅक भरूनदिलेल्या वेळेत  तयार होऊन बसलो कारण आम्हाला चेक आऊट करून मग अजून २-३ पिकनिक स्पॉट बघून मग लोंडा स्टेशन गाठायचे होते. निघताना आम्ही हॉटेल मालक सुरेश  आणि तिथे राहण्याची आणि जेवणाची वेळेवर आणि उत्तम सोय करणारे राहुल उत्पल अचल यांच्यासोबत तसेच तिथे असणारा रस्टी कुत्रा आणि एक काळी मांजर यांच्यासोबत ग्रुप फोटो घेतला आणि जड अंतःकरणाने आम्ही सगळ्यांचा निरोप घेऊन २दिवस आनंदात घालवलेल्या ठिकाणाहून निघालो.

 काली नदीच्या पात्रातील मगरीचे ठिकाण पहावया गेलो त्याठिकाणी नदीच्या पात्रालगत ज्याची बाग आणि जागा असेल तो जागेचा मालक फारच भाव खाऊन जातो. जशा काय या नदीमधील मगरी त्याच्याच मालकीच्या. एकाबाजूला शिवराज पाटील याची केळीची बाग तर दुसऱ्या बाजूला नागराज  पाटील हा त्याचाच मुलगा त्याची बाग.नागराज पाटील म्हणे काली नदीच्या ९-१०कि.मी.च्या पात्रात ८८५०मगरी आहेत. हे जरा जास्तच झाले म्हणा. आमच्या लीडर्स च्या म्हणण्यानुसार ७०-८० मगरी असाव्यात इथे. त्या मगरी पाहणायसाठी २० रुपये तिकीट होते. पर्यटकांनी यांच्याच  बागेतून  यावे आणि मगरी पाहाव्यात यासाठी मगरींना खाद्य म्हणून कोंबड्या टाकत असत  परंतु हे समजल्यावर त्यांना जेल सुद्धा झाली होती . त्यानंतर तसे कृत्य कोणी केले नाही असे तेथील स्थानिक म्हणत होते. 


आमची बस जेवण करण्यासाठी रिव्हर राफ्टिंगच्या वेळी फ्लाय कॅचरला थांबली होती तिथे आम्ही थांबलो. आणि जेवण केल्यावर तिथे सुपारीच्या बनात झोकाधनुष्य  बाण मारणे,टेबल टेनिस अशा खेळाचा थोडावेळ आनंद घेतला.
तिथे टर्की पाहिले  आणि बोटींग करण्यासाठी पुन्हा काली नदीकडे निघालो. कारण आम्ही रिव्हर राफ्टिंग केले होते परंतु आमच्यातील २-३ लोकांना किमान बोटिंगचा आनंद तरी घेता यावा यासाठी फोना लीडर्स ने ही अशी क्लुप्ती लढवली.
त्यासोबत आम्ही सगळ्यांनीच बोटिंग केले. आणि आता मात्र जरा जरी उशीर झाला तरी आम्ही पुण्याकडची रेल्वे निघून जाणार. बाइसन रिव्हर रिसॉर्ट जवळ आमची बस थांबली होती तिचे एक लहानसे शॉप होते त्याठिकाणी देखील आमची गलबल झाली.२दिवसात आम्हाला खरेदीसाठी वेळ मिळल नव्हताच आणि त्या जंगलामध्ये खरेदी करण्यासारखे असे काही नव्हते देखील. त्यामुळे या छोट्या दुकानात आम्हाला एक आठवण म्हणून काहीतरी घ्याचे होते. मी एक बांबूची फळांची टोपली घेतली आणि ३ किचेन घेतल्या आणि निघालॊ. तेवढ्यात एका झाडावर२हॉर्नबिल  पक्षी सगळ्यांना दिसले आणि त्याचे फोटो काढायला एकच गोंधळ उडाला. आमच्या कोणाच्याही मोबाईलने काढलेल्या फोटोमध्ये ते दार बसलेले पक्षी काही दिसेना शेवटी ह्रिषीच्या  डी एस एल आर ने त्या हॉर्नबिल पक्षांना कैद केले.
आणि आमची बस
  लोंडा स्टेशन कडे निघाली. लोंडा स्टेशनवर हुबळी-एल टी टी एक्सप्रेस मध्ये आम्ही संध्याकाळी ५ वाजता बसलो. प्रवास सुरु झाला आणि पाटील गॅंग आणि नाशिकचे काका काकू जवळ जवळ बसलो होतो बाकीचे सगळे एकाच बुगीत परंतु थोडेशे दूर मस्त पत्त्याचा डाव  मांडून मला सोडून खेळत  बसले होते.आम्ही बेळगाव आल्यानंतर तिथला मिळेल तेवढा  कुंदा विकत घेतला त्यानंतर दमशेराज खेळताना खूप जास्त मजा आली. आख्या  बुगीमध्ये फोना टीम चाच  कल्ला  सुरु होता.आमच्यातील धैर्यशील पाटील आणि सुनीता यांच्या अमेरिकेमध्ये असलेल्या मुलाचा वाढदिवस असल्याने त्यांनी आम्हाला जेवणासोबत स्वीट डिश म्हणून कुंदा खाऊ घातला. आम्ही सगळ्या टीम ने त्यांच्या मुलालाला हॅपी बर्थडे गाण्याचा   एक व्हिडीओ पाठवला .
इतर प्रवासी आमच्याकडे नवलाने पाहत होते. बर्थडे बॉय तर दिसत नाहीये आणि काय यांची मजा चाललीये. अशा प्रकारे आम्ही दूरदेशी राहणाऱ्या नवीन पाटील ला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि आपापल्या जागेवर जाऊन झोपण्याचा प्रयत्न केला.
    पहाटे ३ वाजता आमची बस पुणे स्टेशन ला पोहोचणार होती त्यामुळे आम्ही ११ वाजता झोपून घ्यायचा   प्रयत्न केला परंतु मला तरी झोप येत नव्हती मी २:३० चा अलार्म लावून अर्ध्या अर्ध्या तासाने मोबाईल चेक करून पाहत होते. मी २:१५ लाच उठून सगळ्यांना आवाज दिला आणि पटापट आवरावर केली. आमची गाडी २:३० वाजताच पुणे स्टेशनवर आली.
पुणे स्टेशन ला पोहोचल्यावर सगळ्यांनी ओला कॅब करून ४ ते पहाटे ५ वाजता आपापले घर गाठले. अशा प्रकारे फोनाची दांडेली निसर्ग सहल यशस्वी झाली. या सहलीला नाशिक हुन आलेल्या कुलकर्णी काकूंनी अंताक्षरी मध्ये जुनी हिंदी मराठी गाणी अतिशय सुरेख आवाजात म्हंटली. तसेच पाटील सर आणि वकील मॅडम सुरेखा पाटीलत्यांच्या मुली गौरीवैष्णवी यांनी सुद्धा मोजकी परंतु छान गाणी म्हणली तसेच न कंटाळणारे बेस्ट फोटोग्राफर रोहितमंदार सरप्रतीकह्रिषी  जयविवेकवेदांतशालाबसलोनीनितीन सर यांनी तर अंताक्षरी ला चार चाँद लगाये….  ब्लॉग लिहिताना मला एखाद्या ठिकाणचे नाव अथवा प्राण्याचे, पक्षाचे नाव आठवले नाही तर मी ग्रेट फोटोग्राफर रोहितची बरेचदा मदत घेत असते धन्यवाद रोहित. फोना leader राणे सर तुमची आम्ही सगळ्यांनी क्षणोक्षणी आठवण काढली होती. दांडेली निसर्ग सफरचे "फोना" लीडर्स श्री मंदार थरवळ, रोहित आणि नितीन पवार यांना दांडेली टीमच्या वतीने मनापासून  धन्यवाद.. अशाच उत्तमोत्तम ट्रेक आणि  सहली  आयोजित करत रहा आणि त्या अशाच यशस्वी करा. फोना रॉक्स...











9 comments:

  1. Husshh...taken long time...nicely written ... missed Dandeli ... really FONA rocks !!!

    ReplyDelete
  2. खुप सुंदर लिहला हा ब्लाॅग ताई...साऱ्या आठवणी परत जाग्या झाल्या..👌🏻👌🏻👌🏻😊

    ReplyDelete
  3. Thanx pratik ...Tu lihilela blog lavkarch wachayla milu de..😊

    ReplyDelete