Sunday 27 December 2020

सह्याद्री❤️

"#कितीदा #नव्याने #तुला #आठवावे #डोळ्यातील #पाणी #नव्याने #वहावे,"🏞️
मनापासून कधी प्रेम होईल असं वाटलं नव्हतं मला.🤔
सहज म्हणून एकदा भेटायला गेले आणि त्याच्या प्रेमातच पडले❤️ त्याने जे न मागता दिलं ते कधीच कोणाकडून मिळालं नाही त्यामुळे त्याचीच ओढ कायम असते😀
घरातील मंडळी,नातेवाईक, मित्रमंडळी, शेजारी हे (काही बोटावर मोजण्याउतके सोडले तर ) आपण दोनशे टक्के प्रेम दिलं तर ते १०टक्के प्रेम देतात😂माणसाचा नियम आहे तो त्यात नविन काहीच नाही.😀😂
संसार,घर, नातेवाईक यात अडकलो आणि आयुष्य बरबाद झालं होतं,संपायला आलं होतं. सह्याद्रीमुळे या वेदनेतून बाहेर पडता आले.🏞️ज्यांना यातच अडकायचं आहे त्याने त्यातच अडकून रहा आणि माझ्यापासून दूरच रहा 🙏🙏आपलं काहीच म्हणणं नाही.😂😂कामाचा अतिलोड,अतीताण,अतीविचार, अतिप्रेम या सर्वांचा आयुष्यावर घातक परिणाम मी अनुभवला आहे. नकोच ते ट्रेकपुर्वीचं जगणं.😭 🙏🙏
परंतु याला भेटल्यावर कोणाकडून कसलीही अपेक्षा राहिलीच नाही. अपेक्षाचं ओझंच संपलं.कोणाशी कधी स्पर्धा नव्हतीच आणि राहिली नाही. #खरं #सांगायचं #तर #कोणावर #प्रेमही #राहिलं #नाही😀🙏उगाच कधीतरी formalities असतात. 😀😂
प्रत्येकाच्या जगण्याच्या व्याख्याच वेगवेगळ्या आहेत.माझ्या  व्याख्या फार वेगळ्या आहेत.ज्याला पटल्या तो राहिला ज्याला नाही पटल्या तो फुटला. उदाहरण द्यायचे झाले तर आई-वडीलांना शर्ट-प्यांट घालून मुलगी नाही आवडत,short hair cut वाली मुलगी नाही आवडत. सासरी अजून वेगळंच असतं.चोवीस तास ड्युटी केली तरी आपण कुठे ना कुठे  कमीच पडतो.🙄😔😔 मग का इतकं करत रहा झटत रहा आणि रोज मरत रहा???😊
प्रत्येक गोष्ट आता गरजेपुरती,आवश्यक तितकीच करायची हा आता माझा नियम आहे 🙏 मित्रमंडळींचं अजून वेगळंच असतं.सगळ्यांच्या मतानुसार वागायला मी काय कटपुतली आहे ??की चावीवाली बाहुली आहे?? की रोबोट आहे??😔😔
आपल्याला जे आवडतं,जे शोभतं तेच करायचं.
या बदलत्या दुनियेत मात्र स्वतः वर प्रेम करायला शिकले.स्वत:ला वेळ द्यायला शिकले.जगाची चिंता सोडायला यानेच शिकवलं❤️ दुसऱ्याच्या आनंदासाठी न जगता स्वतःच्या आनंदासाठी जगते.💃🎸
याने जे मित्र दिलेत तेही जगावेगळेच आहेत. Smit च्या भाषेत सांगायचं तर  माझ्या जातकुळीत बसणारेच आहेत❤️.मला जे हवं ते याला भेटल्यावरच मिळते. या महिन्यात दोनदा भेटायला जायचे ठरवले परंतु कसेबसे एकदाच भेटणे झाले. 🏞️तुला जपणं आम्ही आमचे कर्तव्य समजतो आणि जमेल तसं पार पाडतो जिवलगा,😍तूझे हे सह्यकडे,दरी,खोरे,जंगल सदैव असेच अबाधित राहो,🏞️
मला पुन्हा पुन्हा बागडण्यासाठी काया तुझी,💃
शांतपणे विसाव्यासाठी कुस तुझी,🏞️ बाहुपाशात घेण्यासाठी अजस्त्र बाहू तुझे 😍😍भळभळणार्या/घळघळणार्या वेदनेत सतत कुरवाळणारी माया तुझी💃🥰 
तुझ्याविषयी किती लिहावे तेवढे कमीच रे, तुझ्याविषयी लिहिण्या लेखनी तोकडी माझी☺️ तूच रे तूच माझा सह्याद्री.‌तुझ्यासारखा दुसरा कुणीच नाही.समुद्र आणि सह्याद्रीची ही ओढ कधीही न संपणारी निरंतर.............❤️❤️
भेटू लवकरच 😊💃🎹🎵🎶🎸

5 comments: