केळवा - माहीमचा समुद्र आणि किल्ला
ठिकाण- ठाणे जिल्हा
अंतर - पुणे पासून 231 कि.मी.
उन्हाळ्यात एखाद्या तरी समुद्रावर गेलंच
पाहिजे आणि सर्वानुमते एखाद्या बीचला जायचं असं ठरतं पण नक्की कोणत्या बीचवर जायचं
हे ठरत नाही. कारण जुहु समुद्र हा एकमेव
मुंबईतला समुद्र बऱ्याचजणांना माहीत असतो. गोराई बीच, केळवे माहिम बीच, शिरगाव बीच असे मुंबईतले आणि मुंबईच्या
जवळचे समुद्रकिनारे वन डे पिकनिकसाठी चांगला ऑप्शन आहे. जेवणाची व्यवस्था आधी ऑर्डर दिली असता
तिथल्या स्थानिक लोकांकडून केली जाते. कोकणातले अलिबाग आणि त्या किनारपट्टीवरील सगळे
समुद्र किनारे माहित आहेत आपल्याला. किमान अलिबाग तर प्रसिद्ध समुद्र किनारा आहे.
परंतु पश्चिम किनारपट्टीवरील समुद्र किनारे सगळ्यांनाच जास्त माहितीचे नाहीत.
ठाणे जिल्ह्य़ातला केळवे माहीम बीच हा
किनारपट्टीवरील एक मोठा बीच आहे. पालघर आणि सफाळे
हे जवळचं रेल्वेस्थानक आहे. पालघर तालुक्यात असलेल्या केळवा बीच येथे मुंबई, ठाणे ,तसेच राज्याच्या काना कोप-यातुन पर्यटक
हजेरी लावत असतात. पश्चिम रेल्वेच्या केळवे स्टेशन पासून ९ कि. मि. पालघर
स्टेशन पासून १७ कि.मी. अंतरावर आहे बोरिवली, विरार स्थानकातून पालघरला जाण्यासाठी
शटल सेवाआहेत. पालघरवरून बीचला जाण्यासाठी टमटम आहेत. स्वतःच्या वाहनाने
मुंबई-अहमदाबाद हायवे वरील वरई फाट्यापासून ३२ कि. मि. अंतर आहे. मुंबईपासून हे
अंतर ८० कि.मी. आहे सध्या या परिसरात रिसोर्ट असल्याने राहण्याची जेवणाची उत्तम
सोय होते. सुरुच्या झाडांमुळे हा बीच खूपच सुंदर दिसतो. शहरापासून दुर असल्यामुळे
इथे पर्यटकांची वर्दळही कमी असते. जवळच केळव्याचा किल्ला आहे. या परिसरला ऐतिहासिक
किनार ही आहे. समुद्रमार्गे येणाऱ्या शत्रुंवर लक्ष ठेवण्यासाठी शिवाजी महाराज या
किल्ल्याचा उपयोग करत असत. थेट गगनाला गवसणी घालणाऱ्या सुरुच्या झाडांची लागलेली
रांगच रांग, बाजूला
पसरलेला अथांग स्वच्छ, सुंदर समुद्र किनारा, सितलादेवीचे मंदिर, दात झाडांनी बहरलेल्या वाड्या, आणि सुखद अल्हाददायक वातावरण अश्या एक
न अनेक खुबी असलेल्या केळवा-माहीम बीच पर्यटकांचे आकर्षण ठरला आहे.
शितळादेवीच्या मंदिरामुळे हा बिच प्रसिद्ध आहे.
केली,पानवेली,नारळी-पोफळी, याच बरोबर मोगरा, जाई-जूई, सायली अश्या विविध झाडा-फुलांनी
बहरलेल्या वाड्यांनी केळवा-माहीम परिसर अगदी न्हावून गेलाय. निसर्गाने भरभरून
दिलेल्या परीसरातून थेट समुद्रकिनारा गाठला की सुरुच्या लांबसडक रांगा आणि
त्यापलीकडचा अथांग सागर नजरेस पडतो. इथे प्रत्येकासाठी मनोरंजन आहे. “खेळा, भटका, फिरा, देवीच्या मंदिरात नतमस्तक व्हा”. सुरुच्या बागेत आणि समुद्रात दोन
किल्ले आहेत. समोरच रामकुंड आहे. इथे श्री राम येवून गेल्याची आख्यायिका आहे.
माहीम ते केळवे अंतर फक्त ३ किमी आहे. हॉटेल तसेच रिसोर्ट यांची येथे कमी नाही. बीचवर जाणाऱ्या दिशेने उजवीकडे थोड्या अंतरावर चालत गेल्यास केळव्याचा चौकीवजा किल्ला तुम्हास दिसतो. सध्या किल्ला हा अर्धवट वाळूत गाडला गेला आहे. त्यामुळे त्याच्या प्रवेशद्वारात प्रवेश करताना वाकूनच शिरावे लागते. किल्ल्याच्या चार टोकांना चार वैशिष्ट्यपूर्ण त्रिकोणाकृती बुरुज आहेत. या बुरुजांमध्ये तोफा ठेवण्यासाठी झरोके व जंग्या आहेत.हा किल्ला गतकाळी मोठा असावा तसेच लष्करीदृष्ट्याहि त्याला खूप महत्व असावे हे दिसून येते. किल्ल्याचा इतिहास फक्त एवढाच की इ.स १७३९च्या वसई मोहिमेत माहिम किल्ल्यावरील विजयानंतर जानेवारी १७३९ केळवे किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला. थोडक्यात सांगायचे झाल्यास मराठ्यांनी पोर्तुगीजांकडील उत्तरेकडील गड कमी दिवसात जिंकून घेतल्याचे दिसून येते. १०-१५ मिनिटात गड पाहून होतो. दांडा खाडीच्या बरोबर मध्यभागी हा पाणकोट किल्ला पोर्तुगीजांनी जकात वसुलीसाठी तसेच टेहळणीसाठी बांधला होता. केळवे किल्ल्यासोबत हा पाणकोट किल्लादेखील मराठ्यांनी फेब्रुवारी १७३९ मध्ये जिंकून घेतला असा उल्लेख आढळतो.ऐतिहासिक आणि निसर्गाची जाण असलेल्या पर्यटकांसाठी हा किल्ला महत्वाचा ठरतो.

समुद्र मला मनापासून आवडतो लहानपणापासूनच आणि
फिरणे त्याहून जास्त आवडते. काही दिवस झाले माझी तब्बेत जरा मला साथ देत नाहीये
मला तरी मी मिळालेल्या संधीचे सोने करते हे काही तुम्हाला सांगायला नको. ट्रेक
निमित्त महिन्यातून एकदा का होईना गड फिरून येते. पण कित्त्येक नातेवाईक
मित्रमैत्रिणी यांच्याकडे माझे जाणे होत नाहीये. त्यामुळे बरीच लोक माझ्यावर
रागवून आहेत. मी ट्रेक ला जाते आणि आमच्याकडे येत येत नाही का अशी विचारणा करतात.
मला पण चेंज हवाच आहे रे पण पूर्वीसारखे गावाला सुद्धा मला जाता येत नाही खूप
दिवसांसाठी. गावची मज काही वेगळीच असते. गावचे साधे जेवण आणि साधी, साधी माणसं, राहणीमाण मला कायम आवडते. माझ्यावर मनापासून मनापासून
प्रेम करणारी माणसे गावचीच. न सांगता माझ्यासाठी स्वत:हून काही करणारी माणसें ही
गावीच मिलतत. मग ते गाव कोकण असो की कराड, सांगली
असो की नासिक असो.
या महिन्यात कुठे प्रवास करावा एव्हढी टाकत च
नव्हती शरीरात. तो माझ्या हाताला चावलेला कीटक त्याने मला खूप दमवले यावेळी.
डॉक्टर ने दिलेली भरमसाट इंजेक्शन्स,उगाच
ओव्हर डोस झाला गोळ्या औषधांचा आणि मी बोर झाले.
त्यामुळे कुठे फिरायला जायची इच्छा नव्हती, खावे दोन घास नि आराम करावा एवढेच ठरवून होते. परंतु माझ्या एका मैत्रिणीचे (शीतल)सासूसासरे आणि
मित्राचे(हेमंत)आईवडील ४ दिवसाच्या अंतरात वारले. मला ऐकून धक्का बसला होता. पण
लगेचच जाणे शक्य नव्हते. मी मुंबईत जाते तेव्हा काही आमचे भेटणे होत नाही.एखाद
दिवस एशियाड ने जावून यावे मुंबईत आणि गावी पटकन असं ठरवलंच त्याच वेळी कुटुंबातील एका लग्नाच्या कार्यासाठी
मला जाण्याचे निमंत्रण आले. आमच्याकडे नवर्याची उष्टी हळद आणि उंबरमेढ घेवून जायची
पद्धत आहे. त्यामुळे हे काम माझ्याच कडे देतात शक्यतोवर. पण दोन्ही कार्यक्रम
परस्पर विरोधी आले. त्यामुळे एक दिवस विचार करून मग आम्ही हो म्हंटले. पण
माझ्यासाठी दोन्ही कामे महत्वाची होती. पण मुलांचे शाळेचे काही प्रोजेक्ट करायचे
असल्या कारणाने ते येवू शकत नव्हते त्यामुळे पुन्हा सगळी तयारी करून जाणे आले. मग शनिवारी सकाळी पहाटे उठून सगळे जेवण ते बनवून आम्ही सकाळी ६
वाजता घर सोडले. त्या लग्नघरी जावून ती उंबरमेढ आणि नवरीची साडी ओटी घेवून ६:३० ला
पुणे सोडले. त्यांनी आमच्यासाठी इको गाडी ड्रायवर आणि बोनस म्हणजे त्या ड्रायवर ची
बायको आणि दोन लहान मुले दिली ते खूप छान केले. गाडी सुटली आणि ती लहान मुले एकदम
चिडीचूप होती.
मी आपले नेहमी प्रमाणे विचारलं अरे पोरांनो नवे सांगा तुमची. असे गप्प का रे ? तर त्यांची आई म्हणते ते दोघे खूप बोलतात त्यामुळे त्यांना त्यांच्या बाबांनी गप्प बसायला सांगितले आहे. कारण का तर ती ड्रायवर ची मुले होती न असा त्यांचा समज असावा. ह्या मालकाच्या लोकांना काही आवडलं नाही तर घरी जावून त्या ड्रायवर च्या बायको ला आणि मुलांना ओरडा खावा लागायचा अशा अर्थाने ती शीतल (ड्रायवर ची बायको)मला सांगत होती. मला राग पण आला आणि नवल ही वाटले की मी गप्प बसू शकत नाही तर या लहान मुलांनी का गप्प बसायचे? मी म्हंटल असला काही नियम आज तरी पाळायचा नाही. भरपूर बोलु, गप्पा मारू आणि जे गप्प आहेत त्यांना बोलायला लावू. ती मुले बोलू लागली. मस्त रमली माझ्यासोबत. पुणे पासून विरार ७० कि. मी. आहे आणि विरार ते केळवा बीच ७० कि. मी. आहे म्हणजे किमान १४० कि.मी. अंतर होतेच. आम्हाला जवळजवळ ५-६ तासाचा प्रवास करायचा होता आणि असे गप्प राहून मला तरी जमणार नाही. एक्स्प्रेस वे ने आम्ही जाताना मस्त गरम गरम वडापाव चा नास्ता केला आणि निघालो मुंबईकडे. लोणावळा घाटात आम्हाला घाट जाम असल्याचे दिसले. जर भीती वाटली आधी कारण आम्हाला दोन तीन कामे करून घरी परत यायचे होते. आणि सध्या घाटात दुरुस्ती कामे चालू असल्याने ट्राफिक जाम होत आहे चार-चार पाच- पाच तास. पण सुदैवाने आम्हाला त्यावेळी घाट मोकळा मिळाला पण पुण्याकडे येण्याचा रस्ता मात्र जाम होता कारण घाटात एक ट्रक बंद पडला होता नेमका अमृतांजन पुलाजवळच. आणि त्या बाजूची मोठ्ठी मोठ्ठी वाहने या बाजूने, उलट्या बाजूने म्हणजे आम्ही जात होतो त्या बाजूने यायला सुरु झाले. धन्य ते लोक जे अशा चार पदरी रस्त्यावर उलटे येत होते.

आम्ही मुंबईतून जाताना माझ्या भावाला येताना
पाच मिनिटे भेटू असे आश्वासन देवून मुंबई सोडली आणि तिथून पुढे सफाळे कडे रवाना
जाहलो. आणि सफाळे हून आम्हाला उसरणी या गावी जायचे होते. केळवा बीच पासून उसरणी हे
गाव ३-४ की.मी अंतरावर आहे त्या समुद्रावर आम्हाला जाण्याचा योग आला. परंतु केळवा
बीच ची सफर या आधी आम्ही खूपदा केली आहे आणि मनसोक्त फोटोग्राफी सुद्धा केली आहे. उसरणीला आम्ही ११ वाजता पोहोचलो.
तिथला तो उंबर मेढीचा कार्यक्रम आवरला जेवलो आणि निघणार. तेव्हढ्यात तिथली मंडळी
आम्हाला म्हणाली की अरे समुद्र पाठीमागेच आहे जावून या न थोडा वेळ. मग आम्ही कशाला
कोणाची वाट बघतो. दुपारचे २ वाजले होते. आम्ही तसल्या कडक उन्हात समुद्राकडे
निघालो. ड्रायवर ने गाडी लावली आणि आम्ही सुसाट धावत च समुद्र गाठला. दुपारची वेळ
असल्याने ओहोटीची वेळ होती त्यामुळे पायाला पाणी लावण्यासाठी आणि फोटो काढण्यासाठी
जरा जास्त चालावे लागले.
पण त्या भर उन्हात सुधा समुद्र हवा हवासा वाटत
होता. कशाचे भान नव्हते. त्यात त्या ड्रायवर च्या मुलीने समुद्र पहिलाच नव्हता. ती
खूप खुश होती. मग आम्ही आपल्या उड्या मारून फोटो काढायचा आनंद लुटला. मुले
माझ्यासोबत खूप रमली. आम्ही पहिल्यांदा भेटलो असे वाटलेच नाही.
आणि मग अर्ध्या तासाने तिथून
बळजबरीने निघालो. कारण अजून दोन कामे करून पुणे गाठायचे होते. तिथे गाडी लावली
होती त्या घरात जावून आम्ही मिठाच्या पाण्याचे हात पाय धुतले आणि ३ वाजता निघालो. खरे तर इकडे इतके नातेवाईक आहेत की नेहमीच वेळ कमी पडतो. यावेळी फक्त
एका मामांकडे १० मिनिटांसाठी जावून आलो की तितक्या दुरून आम्हाला भेटायला पुण्यात
येतात. तिथून निघाल्यावर विरार ला वळलो की ज्यासाठी मी हा सगळा प्रोग्राम आखला
होता. त्या फ्रेंड्स ना चार दिवसाच्या अंतरावर आईवडील दोघेही गेल्यामुळे घर रिकामे
रिकामे जाहले होते. भेटलो बोलो त्यांच्याशी तेव्हा त्यांना आणि आम्हाला बरे वाटले. नंतर
माझा भाऊ की जो मला भेटायला त्याच्या ऑफिस पासून ८ कि.मी. अंतरावर येवून थांबला
होता नालासोपारा फाट्यावर त्याला भेटलो १५ मिनिटे आणि मग निघालो पुण्याच्या
वाटेला. घोडबंदर रस्त्याला ट्राफिक लागला आम्हाला. गाडीत ती छोटी मुले कंटाळून
गेली होती आता. मग आम्ही
जरा गाण्यांच्या भेंड्या खेळलो
मग जरा रमली ती मुले आणि इतका वेळ गप्प असलेली त्या ड्रायवरची बायको शीतल
आपल्यासारखीच छान छान गाणी म्हणून लागली तिच्या छान आवाजातच. मला आवडला तिचा आवाज.
आणि ती सुद्धा. आम्हाला
सारखे फोन मेसेजेस आले की अरे घाट जाम असणार आहे तुम्ही अडकाल. आणि घाटाच्या
सुरुवातीला ट्राफिक लागलाच होता पण तो एका ट्रक चा अपघात झाल्यामुळे. त्यानंतर
मात्र आम्हला रस्ता मोकळा मिळाला आणि आम्ही रात्री १० वाजता त्या लग्नघरी पोहोचलो
तिथे आमचे बाकीचे मेम्बर्स उपस्थित होते. आणि ब्यान्जो च्या आवाजाने अंगात नाच येत
होता पण मुले घरी वाट पाहून थकली होती. त्यामुळे तिथून निघालो बाहेरून वेज फ्राईड
राइस पार्सल घेतला आणि मुलांसोबत जेवण केले. आणि संपला तो धावपळीचा दिवस. पण यात लक्षात राहिली ती म्हणजे मैत्रिणीची, भावाची, मामींची भेट आणि त्या समुद्रावर छोट्या मुलांसोबत घालवलेली दुपार........
.........
So sensitive... Proud...u jayu
ReplyDeleteThank you sunil..
ReplyDeleteThank you sunil..
ReplyDeletemastch re
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteGood to know about your sharing,caring,optimistic nature.
ReplyDelete