ढाकोबा ट्रेक(दाऱ्या घाट)
ठिकाण- जुन्नर, पुणे
दिनांक- ६ डिसेंबर २०२०
उंची - सुमारे ४१०० फूट
किल्ल्याचा प्रकार -गिरीदुर्ग
डोंगररांग- (दुर्ग – ढाकोबा)
चढाई श्रेणी – मध्यम
“माऊंटन एज ऍडव्हेंचर अँड वाईल्ड ट्रेल्स पुणे ”
यांचा १०६वा धाकोबा ट्रेक रविवार दिनांक ६ डिसेंबर २०२० आयोजित केला होता. लॉकडाऊनच्या दहा महिन्यानंतर ग्रुपचा हा पहिला ट्रेक असल्याने कोविडची दहशत अजून आहेच परंतु किती दिवस आपण असे कमी प्राणवायू घेत आणि कोविडचे टेंशन घेऊन घरात बसणार??आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर रोजचे चालणे या व्यायामासोबत ट्रेकिंगसारखा दुसरा व्यायाम नाही. कोविड संदर्भात सर्वप्रकारची काळजी घेऊन कमीत कमी ट्रेकर्सना घेऊन आमची बस निगडी-चिंचवड-डांगेचौक-रावेत-तळेगांव-चाकण-मंचर-नारायणगांव-जुन्नरमार्गे आंबोली या गावात सकाळी साडेदहावाजता पोहोचली.
जाताना एका ठिकाणी थांबून घरून बनवून आणलेला इडलीचटणीचा नास्ता केला आणि गरमागरम चहा घेऊन बसमध्ये गाण्याची महफील रंगविली त्यात वैशाली पाटील यांनी भगतसिंग यांच्यावरील उत्तम पोवाडा सादर केला तो सर्वानाच आवडला. सायलीचे गाणे मला ऐकवत राहावेसे वाटते. रस्त्याच्या डाव्या बाजूने शिवनेरी तर उजव्या बाजूने चावंड हडसर हे किल्ले, गावातील छोटी-छोटी कौलारू घरे, गाई म्हैशी, डोंगररांगा दुरून स्मित हास्य करताना दिसले. निगडीपासून सुमारे १०३ कि मी. अंतरावर आंबोली हे गाव असून इथे पोहोचावयास जवळपास तीन तास लागले. .ब्रेकफास्ट टाइम
आंबोली गावातील हरिभाऊ मोरे नावाचे गृहस्थ वाटाड्या म्हणून सोबत घेतले आणि लीडर्सने ट्रेकविषयी सूचना देऊन ट्रेक लगेच सुरु केला. थंडगार वाऱ्यासोबत कारवीच्या घनदाट जंगलातून पानांची सळसळ ऐकत एक टेकडी पार केली. एक टेकडी पार केल्यानंतर दऱ्या घाटातील बलाढ्य खडकांच्या अभेद्य भिंती आणि खाली कोकणचा नजारा अप्रतिम होता. कोकणात खाली ठाणे जिल्हा असल्याने माझ्या मुंबईच्या गॅंगमधले गॅंगस्टर्स कोणी दिसतात का हे वाकून बघत होते परंतु सगळे फारच बिझी आहेत असे दिसले म्हंटलं चालूदे त्यांचं. आम्ही आपले धसई आणि इतर दोन छोट्या धरणांचे नयनरम्य दृश्य डोळ्यात आणि कॅमेऱ्यात साठवून पुन्हा कारवीच्या जंगलात वाट चालू लागलो. .
धसई धरण, दऱ्या घाट आणि कोकण |
कारवीचे जंगल पार केल्यावर एक रॉकपॅच आल्याने थोडीशी भीती वाटली परंतु मला तर तो खडा चढ चढताना मजा आली. थोडा जरी पाय घसरला तरी डायरेक्ट कोकणात उडी जाते. लीडर्सने सगळ्यांना सांभाळूनच सुरक्षित दुसरा टप्पा पार करवला. .दुसरा टप्पा पार केल्यावर काहीजण क्षणभर विश्रांती घेतात काहीजण फोटोग्राफी करतात आपण मात्र ना बसून विश्रांती ना उभ्याने विश्रांती घेत. स्वतःही पळतो आणि स्लोमोजसाठी इच्छुक असलेल्यांनाही सॉल्लिड पळवतो. त्या टप्प्यावरून पायथ्याची गावे, जलाशय, समोरची डोंगररांग असे एकत्र मिळून देखणे दृश्य पाहवयास मिळते.
नानाचा अंगठा आणि जीवधन गड आणि कोकण दिसत आहे. . |
आपला पहिला नशा कायम ट्रेक आहे आणि तेच रहाणार, त्यानंतर फोटोग्राफी आणि लिखाण असेल. आयुष्य जगायला आपल्या कला आणि छंद पुरेसे आहेत. आपण कितीही चांगले वागलो भारी वागलो तरी कोणाला पूर्ण समाधानी करू शकत नाही, ना कोणाचे दुःख कमी करू शकत ना कोणाला आपल्या सोबत रहाण्यासाठी फोर्स करू शकत त्यापेक्षा परमेश्वराने आपल्याला इतके सुंदर आयुष्य दिलय त्या आयुष्याला वेळ देऊ आणि स्वतःला समाधानी करू. काहींचे प्रश्न असतात की हे वेडे काय ट्रेकला जातात तेचतेच करतात???. हो तेच तेच करतो परंतु त्यातला आनंद ट्रेक न करणाऱ्याला आणि आयुष्य न जगणाऱ्याला कसा कळणार ओ???? आपला आयुष्य जगण्याचा फंडा वेगळा आहे "आपण जाऊ तिथे भाव खाऊ आणि खुश राहू"
"ये जिंदगी किसीके काम ना आयी तो बता ऐ गालिब, तुने कभी पिंजरे से आझाद हुए पंछी को उडते हुए देखा है ???
नहीं देखा??? तो आ मेरे संग एखाद ट्रेक कर फीर सब जुगाड समझमे आयेगा"
वाटाड्या हरिभाऊ मोरे |
कोणी भगव्यासोबत फोटो काढतायत, कोणी आडवे पडून कोकणकड्याच्या फील घेतायत, कुणी शांत बसून माझी स्लोमोजसाठी चाललेली धडपड बघून स्मितहास्य करतायत. मला जास्त उत्सुकता असते ती आजूबाजूच्या डोंगररांगांची इथून कोणकोणते गडकिल्ले दिसतायत ते ऐकायचं असतं आणि कॅमेऱ्यात डोळ्यात, आणि मनात साठवायचं असतं. . इथून खाली कोकणचे दृश्य रमणीय होतेच शिवाय नानाचा अंगठा, नाणेघाट, जीवधनगड ह्या डोंगररांगा स्पष्ट दिसत होत्या तर बाकीच्या डोंगररांगा धूसर दिसत होत्या. आठवण म्हणून बॅनर फोटो, भगव्यासोबत फोटो, स्लोमोज घेऊन इथून लगेच निघालो.. खरंतर इतक्या लगेच निघून माझे तर मन भरत नाही परंतु ग्रुपसोबत चुपचाप चालावे लागते ग्रुप लीडर्सच्या सूचनांचे तंतोतंत पालन करणे हे माझे आद्य कर्तव्य आहे. यावेळी आमच्या बसचा चालक कृष्णा देखील गडावर आला होता. .त्याला म्हंटलं, " लेडीज ट्रेक करतात म्हणून ट्रेकवैगेरे सगळं सोप्पे आहे असे समजू नकोस तुला ट्रेक संपल्यावर बस चालवायची आहे." तर तो नुसता गालातच हसत होता शिवाय माझ्या मोबाईल कॅमेऱ्याचा अधून मधून ताबा घेण्याची हिम्मत त्याने केली. बापुड्याने जीन्सवर आणि साध्या चप्पलवर ट्रेक पूर्ण केला हे मात्र खरे शिवाय परतीच्या वाटेला बसदेखील उत्तम चालवली. सह्याद्रीच्या कुशीत जाऊन माणूस ताजतवाना होऊनच जातो हीचतर सह्याद्रीची खरी खासियत आहे. सव्वादोनच्या सुमारास वरच्या टप्प्यावरून उजवीकडे एक ते दोन टेकडी उतरून ढाकोबा मंदिराकडे चालावे लागते पुन्हा तो खडा चढ उतरताना घसरणाऱ्या गवतावरून साखळी करून उतरल्यावर थोडे सोप्पे गेले. चालताना आजूबाजूच्या निळ्याशार डोंगररांगा मनाला शमवित होत्या. .
दुर्ग गड ,अहुपे घाट, सिद्धगड , गोरख आणि मच्छिन्द्रगडचे टोक दिसत आहे. |
पडझड झालेली नंदीची मूर्ती |
ढाकोबा मंदिरातील शिवलिंगावर स्वयंभू तयार झालेला आकार आणि भगवे शिवलिंग |
मावळतीच्या सूर्याचे रंग काही वेगळेच होते. मला सूर्योदयापेक्षा सूर्यास्त जास्त प्रिय आहे. सूर्यास्ताच्या रंगछटा खूप सुंदर असतात.
सोनेरी संध्याकाळ |
प्रेमात पडल्यावर प्रेयसी अथवा प्रियकर भेटून जाताना जास्त हवाहवासा वाटतो अगदी तसाच हा मावळतीचा सूर्य मावळू नये असेच वाटते. अस्ताला जाताना त्याच्याकडे एकटक पाहताना डोळ्यात टचकन पाणी येते. आपण कितीही नको जाऊ म्हंटले तरी हा मावळतीचा सूर्य दुसऱ्या दिवशी पुन्हा नव्याने उगवण्याची वेडी आशा लावून कोवळ्या किरणांची मखमली झालर लेवून डोंगराआड लुप्त होतो.. . .
ढाकोबा गुहा |
पावसाळ्यात आंबोली या गावी येणं म्हणजे डोळ्यांना सुखाची मेजवानीच असावी. आमचे मन लगेच पावसाळी ट्रेकच्या स्वप्नाळू दुनियेत गेले आणि या गुहेवरून पडणारा इथला धबधबा काय प्रशस्थ आणि सुंदर असेल बरे???. पुढच्या पावसात आम्ही इथे नक्की येऊ असे मनात ठरवून त्या गुहेचा निरोप घेतला. ढाकोबा दुर्ग एकदम स्वच्छ होता. आमच्यातील चार ट्रेकर्स त्या कारवीच्या जंगलातून एक वाट दुसरीकडे गेले परंतु ते हाकेच्या अंतरावर असल्याने आणि गडाचा पायथा अगदी अर्ध्या तासावर असल्याने ते दुसऱ्या वाटेने उतरले परंतु त्यांनी सुंदर अशी गुहा पाहणे चुकवले. या ट्रेक दरम्यान मनुष्यवस्ती जवळपास नाहीच परंतु घनदाट रान, उंच डोंगर, भन्नाट गारगार वारा, पानांची सळसळ, पक्षांचा किलबिलाट आणि रानकिड्यांची किणकिण यात आपण रमून जातो पायवाटाही आपल्यासावलीशी बोलत असतात जणू. ट्रेक कधी संपतो हेदेखील समजत नाही. .हे गुपित मात्र आपल्याला ट्रेकला आल्यावरच समजेल बरं का मित्र हो. जवळपास १३ कि. मी. ची पायपीट संपवून साडेसहाच्या सुमारास हरिभाऊ मोरे वाटाडयाच्या घराजवळ पोहोचलो तिथे एका आजींच्या हातचा चहा पिऊन ट्रेक संपून परतीच्या वाटेला निघालो.अंधार झाला होता परंतु घनदाट जंगलातील त्या खेडेगावामधील लाईटचे दिवे काजव्यांप्रमाणे चममकताना भासले. कमी ट्रेकर्स असल्याने ट्रेक अजूनच लक्षात राहिला. लॉकडाऊन नंतर वेगळा आणि उत्तम ट्रेक आयोजित केल्याने ट्रेकलिडर्सना मनापासून धन्यवाद. बिबवेवाडी आणि कोथरूड वरून ट्रेकसाठी आलेल्यांना माझा सलाम. सर्वांनी केलेले छायाचित्रण उत्तम होते भेटू पुढच्या ट्रेकमध्ये गडावर कुठेही जेवणाची सोय नाही. पायथ्याच्या गावात स्थानिक गावकऱ्यांना आधी सांगितले तर जेवणाची व्यवस्था होऊ शकते. मे महिना सोडला तर ढाकोबा मंदिराजवळील विहिरीत पिण्याचे पाणी उपलब्ध होते.घनदाट जंगलातून जाताना कायम फूल बाहीचे टीशर्ट आणि ट्रॅकपँट सर्वात उत्तम, ट्रेकचे ग्रीपवाले बूट गरजेचे आहेत. जेवणाच्या डब्यासोबत किमान तीन लिटर पाणी सरबत जवळ असलेले चांगले. घनदाट जंगल आहे आणि काही ठिकाणी घसारा होतो त्यासाठी डोक्यावर टोपी, रुमाल आणि हातात एक काठी असावी प्रत्येकाकडे किमान पाच फुटी रोप आणि हेड टॉर्च सोबत असावा एक दिवसाचा ट्रेक असला तरी अंधार झाल्यास खूप उपयुक्त आहे. (टीप - आमचे रेगुलर ट्रेकर दिनेश यांना त्यांचा वाढदिवस ट्रेकदरम्यान साजरा करायचा होता काही कारणास्तव ते येऊ शकले नाहीत त्यामुळे कविता, दिनेश, बोहल्यावर चढायला गेलेला प्रतीकदादा, हर्षदा, राहुल, निलेश टीम, अतिउत्साही श्री श्री शेवाळकर सर, सर्वांना खुप उचक्या असतील. कारण आमचे न सांगता फोटो काढणारे मेंबर्स आहात तुम्ही.
अप्रतिम वर्णन!!ट्रेक पुन्हा अनभुवता आला.अविस्मरणीय ट्रेकिंग 👌👌✌
ReplyDeleteThanx a lot dear ❤️keep treking ❤️
DeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteVery nice Jayu!
ReplyDeleteThanx a lot dear ❤️ ☺️
Deleteअप्रतिम वर्णन!! घरी बसून ट्रेक करून आल्यासारखे वाटले
ReplyDeleteThanx a lot dear harshu ❤️keep trekking ❤️
DeleteJayu ek number. Khup chan vatale vachun. Missing you and nature.
ReplyDeleteThanx a lot dear ❤️ keep treking ❤️
Deleteतुमच्या लिखाणातून आमचा हरवलेला (मिस झालेला) ट्रेक गवसला!
ReplyDeleteLong live Jayuu! 👍
Thanks a lot 😊
DeleteEk number.. Blog bhari aahe!
ReplyDeleteThank you so much 😊
DeleteExcellent decrisption...very well written...
ReplyDeleteThanks a lot 😊
Delete