Sunday 7 August 2022

शांत आयुष्य हवं असेल तर..


आपल्याला शांती हवी असेल तर आणि कंटाळा आला की द्या तो मोबाईल फेकून,ठेवा बाजूला काही दिवस किंवा फोन बंद करा. काही होत नाही ओ 😊काय होईल? फार तर काम बंद राहील आपलं.😊कारण आपली आजची कामं सगळी मोबाईलवर झाल्यात.अगदी शेतकरी सुद्धा आपला माल online च विकतो.मुलंमुली आपला माल online शोधतात.😅😅😂😂 इथेच लग्न होतात,तुटतातही इथेच, किंबहुना आपले,माणसांचे प्राण्यांचे,कुत्र्यामांजरांचे व्यवहार, नोकरी,Bank,सगळ्यांचेच व्यवहार मोबाईल वरच येवून बसलेत. 😅कारण डिजिटल युग ओ दुसरं काय? आणि हो आपले लिहिणारे हात त्यांना तर सेकंदा-सेकंदाला मोबाईल काळजापेक्षा जवळचा वाटतो. 😀 मोबाईल नसेल तर काळजाचा ठोका चुकतो की काय असं होतं. तो बाजूला ठेवला तर आपल्या कामाचा जीव जातो अशी आपली समजूत आहे. पण तसं अजिबात नाही.आजही आपल्याला शांती हवी असेल तर मोबाईल बाजूला ठेवून किंबहुना चार पाच दिवस बंद ठेवून,शांत राहून जवळच्या माणसांशी, घरच्या माणसांशी बोलू शकतो त्यानिमित्ताने एकत्र येऊन जेवू शकतो,हसू शकतो.बाहेरच्या माणसांच्या कटकटी आपणच ओढवून घेतो आणि त्या मानल्या तर कटकटी ओ 😅 नाही तर घरात पण कटकटीच असत्यात 😅हे माझं मत हा😀आपलं जग आणि जगणंच बदललंय.

माझ्यासारख्या असंख्य पागल लोकांचा हाच मोबाईल कोरोनाकाळात सखासोबती होता. शाळा, colleges ,officesदेखील सगळं यावरच चालल्यान. यावर वेगळा लेख होईल😅हीच कमेंट लै मोठी झाली होती कापून कापून तीची अर्धी चड्डी केलीये.😅तर आजही आपण आपलं लिखाण मोबाईलशिवाय लिहू शकतो.घ्या वही पेन आणि लिहूयात, किमान जोपर्यंत आपल्याला शांती हवी तोपर्यंत तरी आपण हे करू शकतो.मी करते wa,Fb,insta बंद,no blog, no YT, सगळ्यांशी बोलणं बंद,फक्त writing,editing or nothing 😅जर हे सामान्य माणसाला जमतं मग तुम्हाला तर काहीही अशक्य नाही.आजही आजही हवं तसं जगता येतं.फक्त थोडं काम बाजूला ठेवायचं धैर्य हवे😅फोनमुळे मैत्री होते,भाऊबहिण,असंख्य नाती निर्माण होतात.तीच नाती आपण आपल्या सोयीनुसार दूर ठेवतो.मी नालायक तर डायरेक्ट नाती तोडून टाकते😅💃🤘 खूप दिवस या मोबाईलवर लिहायचं होतं हाताला आलेली खाज थोडी कमी झाली 😀ज्याला शांती हवी त्याने या वेड्याचं,गरीबाचं एक ऐका तो मोबाईल फेकून द्या. मी लै मोबाईल फोडलेत.🤫तुम्ही फोडू नकात बाजूला ठेवा,मोबाईल बंद ठेवून कागदावर लिहा, कामं करा.शांत रहा,सगळ्या माणसांशी बोला.स्वत:शी बोला. निसर्गात किंवा हिमालयात जाऊन बसू.

No comments:

Post a Comment