Tuesday 9 August 2022

समाधान

समाधान 
jabalpur city 

जरा कुठे घरात जाळी दिसली की मला सफाईची जामच हौस बाबा, घे झाडू कर घर साफ. हाहाहा. आयुष्याची जळमटं पुर्णपणे काढताना मात्र दमछाक होते असो.तो आजचा विषय नाही.तर आज सफाई करताना सहज मोबाईलवर अर्जित सिंहला ऐकावं म्हणून मोबाईल चाळत होते.तेवढ्यात सेफ्टीडोअरच्या बाहेरील बाजूने बेल न वाजवता अचानक आवाज आला श्री स्वामी समर्थ,गुरूदेव दत्त 🙏अरे??हे कोण आलं ??म्हटलं आजतर गुरुवार नाही आणि तसंही आमच्या छोट्या अपार्टमेंट मध्ये बाहेरील फेरीवाले,साधूसंत,तोतया पोलीस,भिक्षा मागणारे यांस येणेस परवानगी नाही अशी पाटी आहे तरी असं अचानक कोण आलं म्हणून माझी सटकलीच होती. तोवर तो सुरूच झाला ताई, तुम्ही चतुर्थी करत जा हाहाहा  त्याला काय माहित माझे चतुर्थीचे किस्से?? आता पुढचं काय बोलायच्या आत म्हटलं बाबा माफ कर आणि वरच्या मजल्यावर न जाता खाली गेलात तर बरं होईल. तो काहीतरी द्या मग जातो. बरं काहीतरी म्हणजे काय द्यावं याला?? मी दारात आलेल्याला सहसा दान करायचं टाळते. कोणावर पटकन विश्वास ठेवून दार उघडलं न मुस्कटलं  मला तर ओ??एखादं म्हातारं माणूस असलं,लुळपांगळं अगतिक असेल तर मी काहीतरी खायला बांधून देते.फार तर डाळ,तांदूळ इ देवून जा बाबा तुझं तू तुझ्या घरी शिजवून खा. आज मी गडबडीत असल्याने मोबाईल हातातच घेऊनच त्यांच्याकडे रागाने कटाक्ष टाकला तर तो उलट हसून म्हंटला ताई,जे द्याल ते घेईन.त्याला मी आधीच म्हटलं माझ्याबद्दल फार काहीही सांगू नकोस मला माहित आहे माझं भूत, वर्तमान,भविष्य 😀.तो हसला व शांतपणे दारात उभा राहिला .मी आधी समोरचं दार आणि शेजारी सगळे घरात आहेत का याची खात्री केली आणि कामवाली मावशी घरात होतीच.जशी bodyguard माझी जशी.  मग मी आत जाऊन माझ्याकडे जास्तीची cash नसल्याने सुटे पैसे शोधत होते.सुटे म्हणजे एक दोन रूपये नव्हे.किमान एक वडापाव,एखादा समोसा,एक चहा तरी आला पाहिजे. असे माझे मत आहे . मी एप्रिल मध्ये मध्यप्रदेश मध्ये जंगल सफारीला गेले होते तेव्हा जबलपूर मध्ये तेथील एका सायकलवर फोटो काढतांनाच सायकलच्या मालकाला कबूल केलं की दसबिस रूपये ले लो अंकल और सायकलपर फोटोशूट करने दो. मग मी मस्त फोटोशूट केलं त्यानंतर पैसे देताना ते म्हातारे गृहस्थ म्हणाले "बच्चा, देना है तो बिसपचिस रूपिया दे दो कमसे कम एक वडापाव, एक समोसा,या एक कचोरी, या फिर अच्छी चाय तो आनी चाहिए ताकि मै पेट भरके खा सकू.वरना नाही दो तो अच्छा है,"मी विचार केला हे म्हातारे गृहस्थ मेहनत करून पोट भरतात.
jabalpur city 

भिक तर नाही मागत.जर माझ्या वीस-तीस रूपयांनी जर यांचं पोट भरत असेल तर काय हरकत आहे यांना दहा रूपयांऐवजी तीस रूपये द्यायला.???असंही मी महाराष्ट्र सोडून दुसऱ्या राज्यात जाऊन फुकट त्यांच्या cycleवर बसणे योग्य नाही. मी त्यांना ते तीस रूपये दिले पण त्या गृहस्तांच्या चेहऱ्यावरचे समाधान अवर्णनीय होतं.त्याआधीही मी एकदोन रूपये कधी कोणाला भिक मागितली तरी देत नाही.चांगल्या धडधाकट माणसांना भिक तर मी देतच नाही. भीक देणे हिची गोष्ट मला पटत नाही. त्याआधी आणि तेव्हापासून मी असा नियमच ठेवला उपाशी असलेल्या किमान पोटभर खायला मिळेल इतकं देते परमेश्वराने आपल्याला खाऊन-पिऊन सुखी केलंय. आपण जगातल्या प्रत्येकाला खुश नाही करू शकत परंतु असा छोटा आनंद देऊन आपल्यालाही समाधान मिळते.तर आजचा विषय असा की आजकाल gpay, phone pay मुळे घरात cash नसते.शोधून शोधून पंचवीस ते तीस रूपये मिळाले ते व एक सफरचंद दिलं आणि दार लावतच होते तर तो लगेच पुन्हा सुरू झाला ताई तुम्ही चतुर्थी करत जावा, तुम्ही तुमचं पुस्तक लिहून छापणार आहात, तुम्हाला खोटं जमत नाही,तुमची टिचिंग साईड आहे.तुम्ही हळव्या मनाच्या आहात पण डगमगत नाहीत.अतिरागिट आहात पण त्यापेक्षा जास्त मायाळू आहात,तुम्ही सगळ्यांचं चांगलं चिंतता, तुम्ही कोणालाच त्रास देत नाहीत.तुमच्याकडे कितीही पैसा आला तरी तुमच्या स्वभावात काहीच फरक पडत नाही. तुमच्या मनातल्या गोष्टी लवकर पुर्ण होतील. अरे,अरे?? हो, हो, बास बास,मनापासून धन्यवाद दादा. जावा आता. तुम्ही कितीही चांगलं चांगलं सांगितलंत तरी मी तुम्हाला याहून जास्त काही देवू शकणार नाही.कामं आहेत मला.असं माझ्याबद्दल चांगलं ऐकायची सवय नाही मला. तरी तो चांगलं बडबडतच गेला.
कोण होती ती तेजस्वी रूप असलेली व्यक्ती?? एखाद्या देवाच्या मुर्तीकडे पाहून वाटावं तसं तेजस्वी रूप होतं त्या व्यक्तीचं.गोरापान रंग,पांढरे स्वच्छ कपडे,भाळावर छोटुसा भगवा टिळा,पिळदार छोट्याशा मिशा,हसतमुख चेहरा होता त्या दादाचा. इतकं सुंदर रूप,वयदेखील लहान असेल आणि का हा दारोदार मागत असावा??हातात पिशवी होती की नाही याकडेदेखील माझं लक्ष नाही गेलं. कोण होता तो तेजस्वी चेहरा??फोटो काढायला हवा होता.





No comments:

Post a Comment