Friday 19 August 2022

छायाचित्र एक कला आणि अनेक आठवणी

leh-Ladakh tour With Mountain Edge Adventure And Wild Trails, Pune 
दिनांक जुलै २०२२ 
छायाचित्र -ज्याला फोटोग्राफीची आवड आहे त्याला प्रत्येक गोष्ट फोटोशिवाय अपुरी वाटते.फोटोमध्ये अनेक आठवणी असतात. आठवण आली की आपण आपल्या सोयीनुसार फोटो पहातो. मी एकही फोटो डिलीट करीत नाही. माझ्याकडे बाकी काही दौलत नाही. परंतु छायाचित्रांचा खजिना आहे असे समजा. एखाद्या पदार्थाचा फोटो देखील मी आवडीने काढून जपून ठेवते.कारण त्या पदार्थाने माझी भूक भागवलेली असते.एखाद्या चहाचा फोटो असेल त्या वेळेवर मिळालेल्या चहाने माझी चहाची तलप घालवलेली असते.एखाद्या ठिकाणाचा फोटो असेल त्या ठिकाणाने शांत झोप दिलेली असते.एखाद्या व्यक्तीसोबतचा फोटो असेल त्याने मला सुखदुःखात सोबत केलेली असेल. गडकिल्ल्यांवरचे अनेक फोटोज असतील त्या गडकिल्ल्यांनी तर मला घडवलंय. सगळी दुःख विसरायला मदत केलीये. गडकिल्ल्यांमुळे, सह्याद्रीमुळे माझी फोटोग्राफी आणि लेख लिहिण्याची कला विकसित केलीये. मी मला सोबत केलेल्या कोणालाही कधीही विसरू शकत नाही. माणूस कालांतराने काही गोष्टी सहज विसरून जातो परंतु जे फोटो रूपात आपल्यासमोर असते ते आपल्याला केवळ सुख आणि सुखच देते. मी प्रत्येक गोष्ट भावना जोडल्या शिवाय करू शकत नाही. फोटोग्राफीमध्ये सुद्धा भावना,कष्ट,घालवलेला वेळ,विचारांची देवाणघेवाण आणि मनाची चलबिचल बरंच काही चालू असते.फोटो टिपण्याची धडपड, त्यासाठी लागणारी शांतता,सबर,उजेड,ऊन, सावली,रात्र,दिवस अशा आवश्यक गोष्टी जुळून आल्या की थोडेफार किंवा एखादा  तरी  फोटो चांगला मनासारखा मिळतो. फोटोग्राफी न शिकता माझ्या नजरेतून मी काढलेली काही छायाचित्रे." ५०टक्केहून जास्त जनता मला फोटोग्राफर समजते विषय संपला" हे एक वाक्य विनोदाचा भाग आहे हा. नाहीतर म्हणाल की "तू स्वतःला फोटोग्राफर समजतेस की काय??" छे छे मी स्वत:ला फक्त एक साधा माणूस, ट्रेकर, ब्लॉगरच समजते. फोटोग्राफर वैगेरे बिलकुल नाहीये मी. तरीही मला फोटोग्राफीची थोडीफार अक्कल आहे आणि ती मी विकसित करण्याच्या प्रयत्नात आहे. काही जण प्रोत्साहन द्यायचं सोडून उगाच लेक्चर देतात तुला कशाला GoPro??तुला कशालाDSLR? कशाला माझ्या शेपटीवर पाय देता ?? असुद्या मला कोणी निंदा केली, डिवचलं की फायदाच होतोय. एखाद्याने मला कोणत्या गोष्टीला नाही म्हंटलं की मी ती गोष्ट काही करून शिकतेच शिकते. हा माझा एक तरी चांगला गुण आहे.हे मला स्वतःला ठाऊक आहे.  हाहाहा 
माझ्याकडे GOPRO, DSLR. वगैरे आहे परंतु सध्या तरी हा OnePlusच पुरेसा आहे. 
घोळक्यात राहून एकट्याने छायाचित्र काढली की मला मिळतात काही बरी छायाचित्रे त्यातील ही काही छायाचित्रे.  १९-०८-२०२२











No comments:

Post a Comment