Monday 15 August 2022

उर्जा

एक किरण..
एक प्रकाशकिरण मग तो सुर्यकिरण असेल, एखाद्या बल्बचा उजेड असेल, एखाद्या batteryचा उजेड, किंवा आपल्या आयुष्यात अचानक उगवलेली व्यक्तीकिरण असेल. यात कोणीही छोटा मोठा नसतो.प्रत्येक किरणात तिच शक्ती असते. ज्या उजेडात आपण लख्ख दिपून जातो. आतून प्रखर तेजोमय होतो त्या उजेडात राहून आपण आपली प्रतिमा उमटविण्याची हिंमत कधी करू नये. मी तसे कधीच करीत नाही.सावलीची प्रतिमा कधीच होत नाही आणि प्रतिमेची सावली कधीच साथ सोडत नाही.आपण त्या उजेडाचे कधीही ऋणी रहावे असे माझे मत. जेव्हा मोठमोठ्या आकाशमालेतील मोठ्या शक्ती जसे चंद्र सूर्य, तारे दिसेनासे होतात तेव्हा हीच छोटी battery आपल्याला कठीणातील कठीण वाट सोपी करून दाखवते किंबहुना वाटेतील काटेकुटे,खाचखळगे आपल्या निदर्शनास आणून देते.त्यातून चालायचं की नाही ते आपण ठरवतो.माझ्या आयुष्यातील छोट्या किरणाची देखील मी सदैव ऋणी असते,असेन‌. तुमच्या आयुष्यात असा एक जरी किरण असेल तर तो तुमचं आयुष्य प्रकाशमानच करेल.
-@jayuu

No comments:

Post a Comment